Jump to content

स्वर्ण मंदिर मेल

गोल्डन टेम्पल मेल
माहिती
सेवा प्रकारभारतीय रेल्वेची अतिजलद प्रवासी सेवा
प्रदेशमहाराष्ट्र, गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेश, हरयाणा, दिल्ली, पंजाब
चालक कंपनी पश्चिम रेल्वे
मार्ग
सुरुवातमुंबई सेंट्रल
थांबे २५
शेवट अमृतसर
अप क्रमांक १२९०३
डाउन क्रमांक १२९०४
साधारण प्रवासवेळ ३१ तास ४० मिनिटे
प्रवासीसेवा
तांत्रिक माहिती
गेज ब्रॉडगेज

१२९०३ /१२९०४ गोल्डन टेम्पल मेल ही भारतीय रेल्वेची एक सुपरफास्ट एक्सप्रेस रेल्वेगाडी आहे. ही गाडी रोज महाराष्ट्रातील मुंबई सेंट्रल (MMCT) आणि पंजाबमधील अमृतसर जंक्शन (ASR) दरम्यान धावते. या गाडीला अमृतसर मधील सुवर्ण मंदिराचे नाव दिले गेले आहे. या गाडीला १९२८ ते १९९६ दरम्यान या काळात ''फ्रंटियर मेल'' असे नाव होते. भारताच्या फाळणीपूर्वी ही गाडी मुंबईतील बॅलार्ड पियर पासून सध्याच्या पाकिस्तानमधील पेशावर शहरापर्यंत धावत असे. []

रचना

या गाडीला १ वातानुकुलीत प्रथम वर्ग आणि २ टियर, २ वातानुकुलीत २ टियर, ५ वातानुकुलीत ३ टायर, १ द्वितिय वर्गाचे शयनयान, २ साधारण डबे तसेच २ साधारण+सामानाचे डबे लावले जातात. याशिवाय गाडीला १ रेल्वे मेल सेवा कोच, १ खानपान सेवा आणि १ उच्च क्षमतेचा सामानडबा देखील जोडले जातात.

ही गाडी १५ सप्टेंबर २०२० पासून एलएचबी डब्यांनिशी धावते.

चित्रदालन

संदर्भ आणि नोंदी