स्वतंत्र पक्ष
स्वतंत्र पक्ष | |
---|---|
स्थापना | ऑगस्ट, १९५९ |
राजकीय तत्त्वे | उदारमतवाद |
स्वतंत्र पक्ष हा चक्रवर्ती राजगोपालचारी आणि एन.जी. रंगा व इतर राजकरण्यांनी स्थापन केलेला उदारमतवादी पक्ष होता.[१] या पक्षाचा नेहरुंच्या समाजवादी धोरणांना व लायसन्स राजला विरोध होता. [२]
स्वतंत्र पक्ष स्थापनेनंतरच्या पहिल्या निवडणुकीत ६.८% मते आणि तिसऱ्या लोकसभेत १८ जागा मिळवू शकला. बिहार, राजस्थान, गुजरात आणि ओरीसा या राज्यात तो मुख्य विरोधी पक्ष म्हणून पुढे आला. या पक्षाने चौथ्या लोकसभेच्या निवडणुकीत ८.७% मते आणि ४४ जागा मिळवल्या. पण इ.स. १९७१ मधील निवडणूकीत ३% मते व ८ जागाच मिळवू शकला.[३] राजाजींच्या निधनानंतर पक्ष लगेचच अस्तास गेला व शेवटी चरण सिंगांच्या भारतीय क्रांती दलात विलीन झाला.
महत्त्वाचे नेते आणि निगडित व्यक्ती
- गायत्री देवी (महाराणी)
- मिनू मसानी
- के.एम. मुन्शी
संदर्भ
- ^ राजमोहन गांधी. "C. Rajgopalchari and the birth of the Swatantra Party" (इंग्रजी भाषेत). ३१ ऑक्टोबर २०१२ रोजी पाहिले.
- ^ "The 21 Principles of the Swatantra Party (1959)" (इंग्रजी भाषेत). 2022-12-26 रोजी मूळ पान पासून संग्रहित. ३१ ऑक्टोबर २०१२ रोजी पाहिले.[ ]
- ^ Chandra, Bipan & others (2000). India after Independence 1947-2000, New Delhi:Penguin Books, ISBN 0-14-027825-7, p.214
बाह्य दुवे
- C. Rajagopalachari : Save freedom Archived 2009-08-06 at the Wayback Machine.. Why Swatantra, 1960
- Minoo Masani: To provide A Democratic Alternative Archived 2009-08-06 at the Wayback Machine.. Why Swatantra, 1960
- K.M. Munshi: To Restore Fundamental Rights Archived 2009-08-06 at the Wayback Machine.. Why Swatantra, 1960
- N.G. Ranga: To Preserve Family Economy Archived 2009-08-06 at the Wayback Machine.. Why Swatantra, 1960
- A number of links at sabhlokcity.com Archived 2009-08-06 at the Wayback Machine.
- Revive the Swatantra Party
- Minoo Masani And The Swatantra Party Archived 2009-06-10 at the Wayback Machine.