Jump to content

स्मिता तळवलकर

स्मिता तळवलकर
जन्मस्मिता तळवलकर
५ सप्टेंबर १९५५
मृत्यू ६ ऑगस्ट २०१४
मुंबई
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र अभिनय
भाषामराठी

स्मिता तळवलकर (माहेरच्या स्मिता गोविलकर) ( ५ सप्टेंबर, इ.स.१९५५ - ६ ऑगस्ट २०१४) []) ह्या मराठी चित्रपट, नाट्य आणि दूरचित्रवाणी अभिनेत्री, निर्मात्या आणि दिग्दर्शक होत्या. दूरदर्शनच्या मुंबई केंद्रावर त्या १७ वर्षे वृत्तनिवेदिका होत्या.

स्मिता तळवलकर यांनी अस्मिता चित्र ॲकॅडमीची स्थापना केली होती. या ॲकॅडमीत मुलांना वयाच्या पाचव्या वर्षापासून नाट्य-चित्रपटाचे प्रशिक्षण घेता येते.

स्मिता तळवलकर या तळवलकर जिम्नॅशियमचे संस्थापक-चालक यांच्या कुटुंबातल्या एक होत्या. त्यांचा मुलगा अंबर हा जिम्नॅशियमचा एक निर्देशक आहे.

वैयक्तिक जीवन

तळवलकर यांचे वयाच्या १७ व्या वर्षी लग्न झाले.[] तिचा मुलगा अंबर तळवलकर, तळवलकर या भारतातील हेल्थ क्लबची प्रमुख शृंखला असलेल्या संचालकांपैकी एक आहे. अंबरचे लग्न अभिनेत्री सुलेखा तळवलकर हिच्याशी झाले आहे.[] स्मिताची दुसरी सून म्हणजे दूरदर्शन अभिनेत्री पूर्णिमा तळवलकर, औपचारिकपणे पूर्णिमा भावे म्हणून ओळखली जाते.

स्मिता तळवलकर यांची भूमिका असलेले चित्रपट

  • अडगुलं मडगुलं
  • एक होती वाडी
  • गडबड घोटाळा
  • चेकमेट
  • चौकट राजा (राष्ट्रीय पुरस्कारविजेता चित्रपट)
  • जन्म
  • टोपी घाला रे
  • तू सौभाग्यवती हो
  • धाकटी सून
  • प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं
  • या गोल गोल डब्यातला
  • शिवरायांची सून ताराराणी (भूमिका - येसूबाई)
  • श्यामचे वडील

स्मिता तळवलकर यांची भूमिका असलेले नाटक

  • गोविंद घ्या कुणी गोपाळ घ्या (भूमिकेचे नाव - जनाबाई)

स्मिता तळवलकर यांची निर्मिती असलेले चित्रपट

  • आनंदाचे झाड
  • कळत नकळत (१९८९) (राष्ट्रीय पुरस्कारविजेता चित्रपट)
  • चौकट राजा (राष्ट्रीय पुरस्कारविजेता चित्रपट)
  • तू तिथे मी (१९९८) (राष्ट्रीय पुरस्कारविजेता चित्रपट)
  • सवत माझी लाडकी (महाराष्ट्र राज्य पुरस्कारविजेता चित्रपट)
  • सातच्या आत घरात

स्मिता तळवलकर यांनी दिग्दर्शित केलेले चित्रपट

  • सवत माझी लाडकी (महाराष्ट्र राज्य पुरस्कारविजेता चित्रपट)

स्मिता तळवलकर यांची निर्मिती असलेल्या दूरचित्रवाणी मालिका

  • अर्धांगिनी
  • अवंतिका
  • उंच माझा झोका
  • ऊनपाऊस
  • कथा एक आनंदीची
  • घरकुल
  • पेशवाई
  • सुवासिनी (स्टार प्रवाह पुरस्कारप्राप्त)

मिळालेले पुरस्कार

  • राष्ट्रीय पुरस्कार – कळत नकळत
  • राष्ट्रीय पुरस्कार – तू तिथे मी
  • महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार – सवत माझी लाडकी (१९९२) – दुसऱ्या क्रमांकाचा उत्कृष्ट चित्रपट
  • महाराष्ट्र कामगार साहित्य परिषदेचा ग.दि.मा. पुरस्कार – तू तिथे मी
  • महाराष्ट्र शासनाचा व्ही.शांताराम विशेष योगदान पुरस्कार (२०१०)
  • मटा सन्मान- उत्कृष्ट मालिका - सुवासिनी (२०१२)
  • स्टार प्रवाह पुरस्कार - सुवासिनी

मृत्यू

२०१० मध्ये स्मिता तळवलकर यांना गर्भाशयाच्या कर्करोगाचे निदान झाले आणि त्यांच्यावर केमोथेरपीने उपचार करण्यात आले.[][] ६ ऑगस्ट २०१४ रोजी मुंबईच्या जसलोक हॉस्पिटलमध्ये वयाच्या ५९ व्या वर्षी तिचे निधन झाले.[][]

संदर्भ

  1. ^ http://prahaar.in/mahamumbai/237264 Archived 2015-10-22 at the Wayback Machine. या दुव्याची वेबॅक मशिनवरील आवृत्ती (संदर्भित दुव्यात त्रुटी जाणवल्याने वेबॅक मशिन वापरुन ही आवृत्ती मिळवलेली आहे.)
  2. ^ "Smita Talwalkar: Live wire of positive energy | iGoa". web.archive.org. 2014-04-06. रोजी मूळ पानापासून संग्रहित2014-04-06. 2024-04-11 रोजी पाहिले.CS1 maint: BOT: original-url status unknown (link)
  3. ^ "This is how you do it". www.dnaindia.com (इंग्रजी भाषेत). 2024-04-11 रोजी पाहिले.
  4. ^ "Cancer patients speak of benefit of homeopathy treatment - Times Of India". web.archive.org. 2011-09-10. 2011-09-10 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2024-04-11 रोजी पाहिले.
  5. ^ Mirror, Pune (१८ फेब्रुवारी २०१३). "Words of the Wise". Pune mirror. रोजी मूळ पानापासून संग्रहित2013-02-18. 2024-04-11 रोजी पाहिले.CS1 maint: BOT: original-url status unknown (link)
  6. ^ "Veteran Marathi actress Smita Talwalkar passed away" (इंग्रजी भाषेत). 2014-08-06. ISSN 0971-751X.
  7. ^ "Veteran Marathi actress Smita Talwalkar passes away at 59". DNA India (इंग्रजी भाषेत). 2024-04-11 रोजी पाहिले.