Jump to content

स्मार्ट सिटी मिशन

स्मार्ट सिटीज मिशन हा भारत सरकारचा नागरी पुनर्नवीकरण आणि सुधारणा कार्यक्रम असून यात संपूर्ण देशात नागरिकस्नेही, स्थायी स्वरूपात  १०० शहरे विकसित करण्याचे उद्दीष्ट ठेवण्यात आले. त्या त्या शहरांच्या राज्य सरकारांच्या सहकार्याने केंद्रीय नागरी विकास मंत्रालयाने हे मिशन राबवायचे आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारत सरकारने देशात शंभर शहरे ही मोठ्या शहरांची उपशहरे म्हणून विकसित करण्याचे किंवा मध्यम आकारांच्या शहरांचे आधुनिकीकरण करण्याचे ध्येय ठेवले आहे. 

यात पहिल्या टप्प्याचा निकष म्हणून राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांनी १०० संभाव्य शहरांची नामांकने केली. स्मार्ट सिटी म्हणून त्यांच्या विकासाच्या नियोजनाचे मूल्यांकन नागरी विकास मंत्रालयाच्या सर्वोच्च समितीने स्पर्धेच्या दुसऱ्या टप्प्यात केले आणि गुणांवर आधारित पहिल्या २० शहरांची निवड २०१५-१६ या आर्थिक वर्षात वित्तपुरवठ्यासाठी केली. इतर शहरांना नियोजनात आढळलेल्या त्रुटी दूर करून पुढच्या दोन टप्प्यांत स्पर्धेत सहभागी होण्यास सांगण्यात आले. पुढच्या दोन्ही टप्प्यात प्रत्येकी ४० शहरे वित्तपुरवठा करण्यासाठी निवडली जातील.

इतिहास

जून २०१५ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्मार्ट सिटीज मिशनचा प्रारंभ केला..[]

वैशिष्ट्ये

स्मार्ट शहरे पायाभूत सुविधानी युक्त असतील असे ठरविण्यात आले असून स्मार्ट उपायांद्वारे चांगल्या प्रतीचे जीवनमान ती देऊ शकतील. निश्चित पाणी आणि वीजपुरवठा, निःसारण आणि घनकचरा व्यवस्थापन, कार्यक्षम नागरी वाहतूक, आय़टी कनेक्टिव्हिटी, इ-प्रशासन आणि नागरिकांचा सहभाग त्याप्रमाणे नागरिकांची सुरक्षिततात ही स्मार्ट शहरांची काही वैशिष्ट्ये असतील[]

राज्यांनुसार स्मार्ट शहरांची यादी

राज्यांधली स्मार्टसिटीसाठी निवडलेली ९८ शहरे .[][][]

अ.क्र. राज्य/केंद्रशासित प्रदेशाचे नाव
निवडलेल्या शहरांची नावे
महाराष्ट्रबृहन्मुंबई, ठाणे , कल्याण-डोंबिवली,नवी मुंबई,नाशिक, अमरावती, सोलापूर, नागपूर, पुणे, औरंगाबाद
पश्चिम बंगालन्यू टाऊन कोलकाता, बिधाननगर, दुर्गापूर,  हल्दिया
 गुजरातगांधीनगर, अहमदाबाद , सूरत, वडोदरा, राजकोट, दाहोद,
मध्य प्रदेशभोपाळ, इंदूर, ग्वाल्हेर, जबलपूर, सतना, उज्जैन, सागर
तमिळनाडूकोइंबतूर, चेन्नै, मदुरै, तिरुचिरापल्ली, वेल्लूर, सेलम, इरोड, तिरूपुर, तंजावूर , तिरूनरवली, दिंडुक्कल, तूतुकूडी,
कर्नाटकमंगळूर, बेळगाव, शिमोगा, हुबळी- धारवाड , तुमकूर,दावणगेरे
केरळकोची
तेलंगण वारंगळ, करीमनगर
आंध्रप्रदेश विशाखापट्टणम, तिरूपती, काकीनाडा
१० उत्तर प्रदेशमोरादाबाद, अलीगढ, सहारनपूर, बरैली, झांसी, कानपूर, अलाहाबाद,लखनौ, वाराणसी, गाझियाबाद, आग्रा, रामपूर
११ राजस्थानजयपूर , उदयपूर , कोटा , अजमेर
१२ पंजाबलुधियाना , जलंधर , अमृतसर
१३ बिहारमुझफ्फरपूर , भागलपूर , बिहार शरीफ
१४ हरियाणा करनाल , फरीदाबाद
१५ आसामगुवाहाटी
१६ ओडिशाभुवनेश्वर, रूरकेला
१७ हिमाचल प्रदेशधरमशाला
१८ उत्तराखंडदेहरादून
१९ झारखंडरांची
२० सिक्किम नामची
२१ मणिपूरइम्फाल
२२ अंदमान आणि निकोबार पोर्ट ब्लेअर
२३ अरुणाचल प्रदेशपासीघाट
२४ चंदिगढ चंदिगढ
२५ छत्तीसगढरायपूर ,बिलासपूर
२६ दादरा आणि नगर- हवेली सिल्वासा
२७ दमण आणि दीवदीव
२८ दिल्लीदिल्ली
२९ गोवापणजी
३० लक्षद्वीपकवरती
३१ मेघालयशिलाँग
३२ मिझोरमऐझॉल
३३ नागालँडकोहिमा
३४ पुदुच्चेरी औल्गरेत
३५ त्रिपुराअगरतला
  • जम्मू आणि काश्मीरने संभाव्य स्मार्ट सिटीचा निर्णय करण्यासाठी अधिक वेळ मागितला आहे.
  • उत्तर प्रदेशला १३ शहरांची जागा दिली होती, त्यापैकी त्यांनी १२ शहरांची संक्षिप्तयादी दिली आहे.

संदर्भ

  1. ^ "Narendra Modi launches smart city projects in Pune", Live Mint, 25 June 2016 
  2. ^ "Bhubaneswar leads Govt’s Smart City list, Rs 50,802 crore to be invested over five years", The Indian Express (नवी दिल्ली), 29 January 2016 
  3. ^ List of 98 Smart Cities, The Times of India 
  4. ^ "Centre unveils list of 98 smart cities; UP, TN strike it rich". The Hindu. 28 August 2015.
  5. ^ http://indianexpress.com/article/india/india-news-india/india-20-smart-cities-list/


बाह्य दुवे