Jump to content

स्पॅनिश साम्राज्य

स्पॅनिश साम्राज्य
Flag of स्पॅनिश साम्राज्य
Location of स्पॅनिश साम्राज्य
Location of स्पॅनिश साम्राज्य
एके काळी स्पॅनिश साम्राज्याचा हिस्सा असलेले जगातील भूभाग
  आयबेरियन संघामधील पोर्तुगीज साम्राज्याचे भूभाग (इ.स. १५८१ - १६४०).
  उट्रेक्त-बादेन तहादरम्यान गमावलेले भूभाग (इ.स. १७१३ - १७१४).
  स्पॅनिश अमेरिकन स्वातंत्र्य युद्धांदरम्यान गमावलेले भूभाग (इ.स. १८११ - १८२८).
  स्पॅनिश-अमेरिकन युद्धामध्ये हरलेले भूभाग (इ.स. १८९८ - १८९९).
  स्वातंत्र्य मिळालेल्या आफ्रिकन वसाहती (इ.स. १९५६ - १९७६).
  स्पेनच्या अधिपत्याखालील सद्य भूभाग.

स्पॅनिश साम्राज्य (स्पॅनिश: Imperio Español) हे इतिहासातील स्पेन व त्याच्या अधिपत्याखाली असलेल्या युरोप, आफ्रिका, अमेरिकाओशनिया खंडांमधील अनेक वसाहती व भूभाग ह्यांपासून बनले होते. शोध युगादरम्यान स्थापन झालेले व एके काळी जगात सर्वात बलशाली असलेले स्पॅनिश साम्राज्य इतिहासातील प्रथम जागतिक साम्राज्यांपैकी एक मानले जाते.

ख्रिस्तोफर कोलंबसने अमेरिका खंडाचा शोध लावल्यानंतर स्पेनने तेथे व कॅरिबियनमधील अनेक बेटांवर वसाहती स्थापन केल्या. तसेच आफ्रिका खंडामधील अनेक भूभाग व आग्नेय आशियामधील स्पॅनिश ईस्ट इंडीजवर स्पेनची सत्ता होती. ह्या शिवाय पश्चिम युरोपातील मोठा भूभाग स्पॅनिश साम्राज्याच्या अधिपत्याखाली होता.