Jump to content

स्पिरुलीना (शेवाळ शेती)

स्पीरुलीना हे हिरवे-निळे शेवाळ आहे. हे शेवाळ हौदामध्ये तयार केले जाते.

जागा - १ ते २ गुंठे (हा प्रकल्प फक्त शेतावर करावा असे बंधन नाही अगदी शहरी भागात मोकळ्या प्लॉट मध्ये ; घराजवळील मोकळ्या जागेत हा प्रकल्प सूरू करता येईल).

उत्पादन खर्च- प्रति किलो १०००-१५०० रुपये.

शेवाळाचा नक्की उपयोग – विविध आजारांवर प्रभावी औषध म्हणून वापरले जाते.शक्तिवर्धक आहे.नासाने यास सर्वोत्तम अन्न म्हणून घोषित केले आहे.

प्रकल्प उभारणीचा खर्च - १ ते १.५ लाख

मजूर, पाणी लागते का ? पाणी सारखे लागत नाही. घरातील प्रशिक्षित व्यक्ती हे काम एकटेसुद्धा करू शकते

बाजारभाव - थेट स्वतः विक्री केल्यास अंदाजे रु. ५००० ते ६०००/- किलो.

बाजारात कुठे विकले जाते? कंपन्या मार्केटमध्ये विकत घेण्यास तयार आहेत तसेच लोकल मार्केट मध्ये विक्री करणे शक्य आहे.

बँक कर्ज व शासकीय योजना - यास शासनातर्फे प्रयत्न केल्यास प्रोत्साहनपर अनुदान मिळू शकते तसेच पत पाहून बँक कर्ज उपलब्ध होऊ शकेल. सुरुवातीस ५० हजार ते १ लाख खर्च करून उद्योग सुरू केल्यास जास्त फायदा होईल.

महिला बचत गटाने एकञ येऊन आपल्या राहत्या घराच्या शेजारच्या मोकळ्या जागेत सुद्धा छोटा प्रकल्प सुरू करता येईल. सुशिषित बेरोजगार तरुणांसाठी हा उद्योग म्हणजे एक सर्वात मोठी संधी म्हणायला हरकत नाही. हा व्यवसाय सुरू केल्यास कमी भांडवल, कमी मनुष्यबळ, सोपे तंत्र आणि भरपूर नफा असे या व्यवसायाचे सूत्र आहे.

संदर्भ

http://sataragoatfarm.npage.de/empty(3).html Archived 2018-04-29 at the Wayback Machine.