Jump to content

स्थवीर

थेरो किंवा स्थवीर ही बौद्ध भिक्खूची तर भिक्खुणीसाठी थेरी ही सन्माननीय संज्ञा आहे. ज्या भिक्खूच्या उपसंपदेला दहा वर्ष पूर्ण झालेली असतात त्यांना स्थवीर किंवा थेरो म्हणले जाते. तर भिक्खूणीला थेरी म्हणले जाते. ज्या भिक्खूच्या उपसंपदेला वीस वर्ष पूर्ण झाली आहेत त्या भिक्खूला महास्थवीर किंवा महाथेरो म्हणतात.