Jump to content

स्तरमेघ


इंग्रजी नाव - Stratus Cloud

इंग्रजी खुण - St

मेघतळ पातळी निम्न

भूपृष्ठ ते २००० मीटर

आढळसर्वत्र जगभर पण पर्वत माथ्यावर  आणि समुद्र किनाऱ्यावर जास्त प्रमाणात
काळसंपूर्ण वर्षभर

स्तरमेघ हे निम्न पातळीवरचे आकारहीन पण एखाद्या पडद्यासारखे सारख्या जाडीचे  दूरवर पसरलेले ढग असतात. त्यांचा रंग हा पांढरा शुभ्र ते दाट काळसर अशा वेगवेगळ्या छटांचा असू शकतो. ह्यातील घटक म्हणजे उदा. हिमकण, अतिशीत जलबिंदू किंवा जलबिंदू  त्याच्या आसपासच्या वातावरणाच्या तापमानावर अवलंबून असतात. ह्या ढगांच्या तळाचा आकार अनिश्चित असतो. हे ढग सूर्याच्या आड आले तरी त्यातून सूर्याची तबकडी दिसू शकते. आकाशात चंद्र असताना रात्री मध्ये हे ढग आल्यास चंद्राभोवती खळे दिसते[].

हिवाळ्याच्या सुरुवातीला भूपृष्ठावर आढळणारे धुके म्हणजे एक प्रकारचे स्तरमेघच होत. असे धुके मात्र फार काळ टिकत नाही. सूर्योदयानंतर ह्यातील जलबिंदूची वाफ होऊन  हे ढग नाहीसे होतात. किंवा वाऱ्याबरोबर वाहात गेल्याने त्यांची शकले होऊन ते नाहीसे होतात.[]

ह्या ढगातून हलकीशी पावसाची किंवा हिमकणांची वृष्टी होऊ शकते.[]

  1. ^ प्रा. वसंत पांडुरंग नेने (२००६). ढगांचे विज्ञान. पुणे: पुणे विद्यार्थी गृह प्रकाशन. p. 14.
  2. ^ a b मेघ -स्तरमेघ. मराठी विश्वकोश.