स्टॉर्मी डॅनियल्स
स्टॉर्मी डॅनियल्स | |
---|---|
जन्म | स्टेफनी ग्रेगोरी क्लिफर्ड बॅटन रूज, लुईझियाना, अमेरिका |
उर्फ | स्टॉर्मी वॉटर्स, स्टॉर्मी |
स्टॉर्मी डॅनियल्स तथा स्टॉर्मी वॉटर्स (१७ मार्च, इ.स. १९७९:बॅटन रूज, लुईझियाना, अमेरिका - ही एक अमेरिकन रतिअभिनेत्री आहे.
२०१८मध्ये डॅनियल्स आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डॉनल्ड ट्रम्प तसेच ट्रम्पचा वकील मायकेल कोहेन यांच्यात वाद झाला. ट्रम्प आणि डॅनियल्समधील २००६ च्या सुमारासचे अनैतिक लैंगिक संबंध छुपे ठेवण्यासाठी ट्रम्प आणि त्यांच्या हस्तकांनी डॅनियल्सला पैसे देऊ केल्याचे आरोप आहेत आणि त्याबद्दल डॅनियल्सने कोठे वाच्यता करू नये म्हणून तिच्याकडून पैशाच्या बदल्यात कायदेशीर प्रतिबंध घातल्याची कागदपत्रे पुढे आलेली आहेत. ट्रम्प व त्याच्या प्रवक्त्यांनी असे संबंध असल्याचे नाकारले आहे.[१][२]
संदर्भ आणि नोंदी
- ^ Nelson, Louis. "White House on Stormy Daniels: Trump 'denied all these allegations'". पोलिटिको. March 14, 2018 रोजी पाहिले.
- ^ "Donald Trump denies affair with adult star Stormy Daniels, says White House". Business Standard. March 7, 2018. March 14, 2018 रोजी पाहिले.