Jump to content

स्टॅन वावरिंका

स्टॅन वावरिंका
देशस्वित्झर्लंड
वास्तव्य सेंत बार्थेलेमी, व्हो, स्वित्झर्लंड
जन्म २८ मार्च, १९८५ (1985-03-28) (वय: ३९)
लोझान, स्वित्झर्लंड
उंची १.८३ मी (६ फु ० इं)
सुरुवात २००२
शैली उजव्या हाताने
बक्षिस मिळकत $२,६४,७५,२६४
एकेरी
प्रदर्शन 570–353
अजिंक्यपदे १५
क्रमवारीमधील
सर्वोच्च स्थान
क्र. ३ (२७ जानेवारी २०१४)
क्रमवारीमधील सद्य स्थान क्र. ३
ग्रँड स्लॅम एकेरी
ऑस्ट्रेलियन ओपनविजयी (२०१४)
फ्रेंच ओपनविजयी (२०१५)
विंबल्डन उपांत्यपूर्व फेरी (२०१४)
यू.एस. ओपनविजयी (२०१६)
दुहेरी
प्रदर्शन 81–105
अजिंक्यपदे
क्रमवारीमधील
सर्वोच्च स्थान
क्र. ९०
शेवटचा बदल: सप्टेंबर २०१६.


ऑलिंपिक पदक माहिती
स्वित्झर्लंडस्वित्झर्लंड या देशासाठी खेळतांंना
पुरूष टेनिस
सुवर्ण२००८ बीजिंगपुरूष दुहेरी

स्तानिस्लास वावरिंका (जर्मन: Stanislas Wawrinka; २८ मार्च १९८५) हा एक व्यावसायिक स्विस टेनिसपटू आहे. २००२ सालापासून व्यावसायिक टेनिस खेळत असलेल्या वावरिंकाने २००८ उन्हाळी ऑलिंपिक स्पर्धेत रॉजर फेडरर सोबत पुरूष दुहेरी टेनिससाठी सुवर्णपदक पटकावले.

२०१४ सालच्या ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेमध्ये त्याने एकेरीमध्ये रफायेल नदालला पराभूत करून आपले पहिले ग्रँड स्लॅम अजिंक्यपद मिळवले. २०१५ साली त्याने फ्रेंच ओपन स्पर्धेत विजय मिळवून दुसरे तर २०१६ यू.एस. ओपन जिंकून तिसरे ग्रँड स्लॅम अजिंक्यपद मिळवले.

वावरिंका आजवर एकूण ११ प्रमुख स्पर्धांच्या अंतिम फेरीत पोचला असून त्याने प्रत्येक वेळी विजय मिळवला आहे.

कारकीर्द

ग्रँड स्लॅम स्पर्धा एकेरी अंतिम फेऱ्या: ३ (३ - ०)

निकाल वर्ष स्पर्धा कोर्ट प्रकार प्रतिस्पर्धी स्कोअर
विजयी२०१४ऑस्ट्रेलियन ओपनहार्डस्पेन रफायेल नदाल6–3, 6–2, 3–6, 6–3
विजयी२०१५फ्रेंच ओपनक्लेसर्बिया नोव्हाक जोकोविच4–6, 6–4, 6–3, 6–4
विजयी२०१६यू.एस. ओपनहार्डसर्बिया नोव्हाक जोकोविच6–7(1–7), 6–4, 7–5, 6–3

ऑलिंपिक स्पर्धा

पुरुष दुहेरी: १ (१–०)

निकाल वर्ष स्पर्धा कोर्ट प्रकार सहकारी प्रतिस्पर्धी स्कोअर
सुवर्णपदक२००८चीन बीजिंगहार्ड स्वित्झर्लंड रॉजर फेडररस्वीडन सायमन ॲस्पेलिन
स्वीडन थॉमस योहान्सन
6–3, 6–4, 6–7(4–7), 6–3

बाह्य दुवे