Jump to content

स्टिकर (मेसेजिंग)


स्टिकर हे कार्टून आणि जपानी स्मायली सारख्या " इमोजी " चे मिश्रण आहे जे इन्स्टंट मेसेजिंग व्यासपीठावरून पाठवले जाते. कागदावर चिकटवल्या जाणाऱ्या गोष्टींना "स्टिकर्स" म्हणतात. त्यावरूनच ह्या शब्दाची उत्पत्ती झालेली आहे. ते एखाद्या पात्राचे तपशीलवार चित्रण किंवा एखाद्या भावना किंवा कृतीचे प्रतिनिधित्व असू शकते. त्यांच्यात इमोटिकॉनपेक्षा अधिक वैविध्य आहे. स्टिकर्स हे विस्तृत, वर्ण-चालित इमोटिकॉन आहेत आणि लोकांना अ‍ॅनिमेशनद्वारे सहज संवाद साधण्याचे माध्यम देतात. []

वापर आणि स्वरूप

फेसबुक, इंस्टाग्राम, व्हॉट्सॲप, टेलिग्राम, स्नॅपचॅट इत्यादी समाजमाध्यमांवर स्टिकर्स मोठ्या प्रमाणात वापरले जातात. प्रत्येक व्यासपिठावर त्यांचे स्वरूप वेगळे असू शकते, मात्र त्यांचा हेतू समान असतो. ह्या समाजमाध्यमांवर स्टिकर्स किंवा त्यांचे संच हे ईमोजी, इमोटिकॉन ह्याप्रमाणे अंगीभूतरित्या उपलब्ध असतात. तसेच काही ॲप्सच्या सुविधा वापरून वापरकर्ते स्वनिर्मित किंवा परनिर्मित (सेल्फ मेड किंवा कस्टम-मेड) स्टिकर्स वापरू शकतात. स्टिकर्सचा इंटरनेटवर प्रसार हा मिम्स(memes), जिफ(gif), इमोटिकॉन, इमोजी ह्यांच्याप्रमाणे नैसर्गिकरित्या होत असतो.

स्टिकर्स हे गोंडस किंवा विनोदी चित्रे, मिम्स अश्या विविध स्वरूपाची असतात. वेगवेगळ्या शैलीत (फाँट्स) असलेले शब्द अथवा शब्दसमूह ह्यांचे सुद्धा स्टिकर्स बनू शकतात. स्टिकर्सला विषयांचे बंधन नसते.

स्टिकर्स सामान्यतः फुकट वापरता येतात, परंतु सूक्ष्म व्यवहार वापरून काही सेवा ह्या अधिमूल्य पर्याय देऊ शकतात. त्याचे वर्णन "सेवा म्हणून स्टिकर्स" म्हणून केले जाते. स्टिकर्सचे संच हे विशिष्ट कल्पना, पात्रे, तसेच हॅलो किट्टी, साय, आणि मिनियन्स ऑफ डिस्पिकेबल मी सारख्या लोकप्रिय ब्रँड आणि मीडिया फ्रँचायझींना समर्पित असू शकतात. [] []

हे सुद्धा पहा

संदर्भ

  1. ^ a b Van, Jennifer (2013-07-02). "Facebook affixes stickers to messages on Web | Internet & Media - CNET News". News.cnet.com. 2013-08-16 रोजी पाहिले. चुका उधृत करा: अवैध <ref> tag; नाव "autogenerated1" वेगवेगळ्या मजकूराशी अनेकदा जोडलेले आहे
  2. ^ Constine, Josh (2013-06-27). "Facebook Launches First Branded Stickers, Previewing A Potential Sponsorship Biz". TechCrunch. 2013-08-16 रोजी पाहिले.