स्टार ट्रेक:द नेक्स्ट जनरेशन
विशेष लेख: हा लेख मराठी विकिपिडीयावरील २५,०००वा लेख आहे. |
---|
स्टार ट्रेक:द नेक्सट जनरेशन | |
---|---|
स्टार ट्रेक:द नेक्स्ट जनरेशन मालिकेचे शीर्षक चित्र | |
उपशीर्षक | स्टार ट्रेक:द नेक्स्ट जनरेशन |
प्रकार | विज्ञान कथा |
कलाकार | पॅट्रिक स्टुअर्ट जॉनाथन फ्रेक्स ब्रेंट स्पायनर लेव्हार बर्टन मरिना सिर्टिस मायकेल डॉर्न गेट्स मॅकफॅडेन डेनिस क्रॉस्बी विल व्हीटन |
शीर्षकगीत | जेरी गोल्डस्मिथ अलेक्झांडर करेज |
अंतिम संगीत | जेरी गोल्डस्मिथ |
देश | अमेरिका |
भाषा | इंग्लिश |
वर्ष संख्या | ७ |
एपिसोड संख्या | १७८ ({{{मालिकेतील भागांची यादी}}}) |
निर्मिती माहिती | |
कार्यकारी निर्माता | जीन रॉडेनबेरी रिक बर्मॅन मायकल पिलार जेरी टेलर |
प्रसारणाची वेळ | ४५ मिनिटे प्रत्येक भाग. |
प्रसारण माहिती | |
वाहिनी | यु.पी.यन. वाहिनी |
चित्र प्रकार | एन.टि.एस.सी ४८० आय |
ध्वनी प्रकार | डॉल्बी एस आर ध्वनी |
पहिला भाग | एनकाउंटर ऍट फारपॉइंट |
प्रथम प्रसारण | सप्टेंबर २८, १९८७ – मे २३, १९९४ |
अधिक माहिती | |
आधी | स्टार ट्रेक:द ऍनिमेटेड सिरीझ |
नंतर | स्टार ट्रेक:डीप स्पेस नाईन |
स्टार ट्रेक:द नेक्स्ट जनरेशन ही जीन रॉडेनबेरी यांच्या स्टार ट्रेक कथानकावर आधारीत स्टार ट्रेक या दूरचित्र शृंखलेतील मालिका आहे. जीन रॉडेनबेरी यांनी १९६० मध्ये स्टार ट्रेक या नावाने, एका काल्पनिक ब्रह्मांडाची रचना केली व या कल्पनेवर त्यांनी काही दूरचित्रमालिका बनवल्या. स्टार ट्रेक शृंखेलेतील पहिली दूरचित्र मालिका १९६० मध्ये त्यांनी बनवली व प्रक्षेपित केली. स्टार ट्रेक शृंखेलेतील या सर्व मालिका विज्ञान कथेवर आधारीत आहेत. विज्ञान कथा हे साहित्यातील एक प्रकार आहे.
स्टार ट्रेक:द नेक्स्ट जनरेशन कथानक २४व्या शतकात वर्तविलेले आहे, ज्या मध्ये स्टारफ्लीट या पृथ्वीवरील संस्थेच्या, यु.एस.एस. एंटरप्राइझ नावाच्या अंतराळ जहाजाच्या, विविध कामगिऱ्या व मोहिमांच्या वेळेत घडलेल्या गोष्टीं बद्द्लचे वर्णन आहे. हे कथानक स्टार ट्रेकच्या शृंखेलेतील पहिली दूरचित्र मालिका, स्टार ट्रेक:द ओरिजीनल सिरीझच्या ७१ वर्षानंतर वर्तविलेले आहे. ह्या मालीकेचे सुरुवात व प्रथम प्रसारण सप्टेंबर २८, १९८७ रोजी, एनकाउंटर ऍट फारपॉइंट ह्या २-तासांच्या भागापासून झाली. त्या दिवशी हा भाग २.७ कोटी लोकांना प्रसारीत झाला होता[१]. ह्या मालिकेत १७८ भाग होते जे ७ पर्वांमध्ये प्रसारीत झाले व यामुळे ही मालिका स्टार ट्रेक शृंखलेतील मालिकांमध्ये सर्वात मोठी मालिका ठरली. ह्या मालिकेचे शेवटचे प्रसारण मे २३, १९९४ रोजी ऑल गुड थिंग्स ह्या भागाने झाले.
स्टार ट्रेक:द नेक्स्ट जनरेशन मालिकेचे विविध वाहिन्यांवर, विविध वेळेत प्रसारण झाले, व ही मालिका अत्यंत लोकप्रिय ठरली. स्टार ट्रेक शृंखलेतील सर्व मालीकांमधील ही पहिली मालिका होती जिच्या लोकप्रियते मुळे स्टार ट्रेकच्या सर्व मालिकांच्या भागांचे पुनर्प्रसारण २००५ पर्यंत चालले. स्टार ट्रेक:द नेक्स्ट जनरेशन मालिकेला १८ एमी पुरस्कार मिळाले, व प्रसारणाच्या सातव्या पर्वात ही मालिका, अशी पहीली मालिका झाली जी एमी फॉर बेस्ट ड्रामॅटीक सीरीझ या पुरस्कारासाठी नामांकित झाली. ही मालिका ३ ह्युगो पुरस्कारासाठी सुद्धा नामांकित झाली व त्यापैकी २ ह्युगो ह्या मालिकेने पटकावले. पहिल्या पर्वातील द बिग गुडबाय ह्या भागाला एकसेलंस इन टेलीवीझन प्रोग्रामींग हा पीबॉडी पुरस्कार सुद्धा मिळाला. ह्या मालिकेच्या लोकप्रियते मुळे होऊन स्टार ट्रेक शृंखेलेतील चार चित्रपट बनवण्यात आले. स्टार ट्रेक:जनरेशन्स, स्टार ट्रेक:फर्स्ट काँटॅक्ट, स्टार ट्रेक:इनसरेक्शन व स्टार ट्रेक:नेमेसीस हे ते चित्रपट.
कथानक
स्टार ट्रेक:द नेक्स्ट जनरेशनच्या प्रत्येक भागाची सुरुवात, पॅट्रिक स्टुअर्टच्या आवाजात खालील पटापासुन होते.
“ | अंतराळ, शेवटची सीमा.... | ” |
स्टार ट्रेक शृंखलेचा पहिल्या व अत्यंत लोकप्रिय स्टार ट्रेक:द ओरिजीनल सिरीझ ह्या मालिकेचा नमूना वापरून, स्टार ट्रेक:द नेक्स्ट जनरेशन मालीकेच्या सर्व भागांची सुरुवात पॅट्रिक स्टुअर्टच्या आवाजने केली गेली.
स्टार ट्रेक:द नेक्स्ट जनरेशनच्या कथानकातील ब्रह्मांडाची कालावधी, स्टार ट्रेक:द ओरिजीनल सिरीझच्या १०० वर्षे पुढे होती. या मालिकेत एक नवीन काळ दाखवला गेला, ज्याच्यात क्लिंगॉन आणि स्टारफ्लीट एकजूट होतात व रॉम्यूलन त्यांचे शत्रू असतात. या मालिकेत स्टारफ्लीटला फिरंगी प्रजातीच्या प्राण्यांपासून धोका निर्माण होतो. स्टारफ्लीटला अजून इतर नवीन धोके सुद्धा निर्माण होतात ज्याच्यात कारडॅसियन आणि बॉर्ग प्रजात्यांचा समावेश असतो.
हि मालीका गॅलॅक्सी जातीच्या यु.एस.एस. एंटरप्राइझ अंतराळ जहाजतील सर्व खलाश्यांच्या विविध साहसी व धाडसी कथांचे व कामगिरीचे विवरण आहे. एंटरप्राइझ अंतराळ जहाज हे युनायटेड फेडरेशन ऑफ प्लानेट्सचे सर्वात मुख्य जहाज आहे व हे जहाज अंतरळातील संशोधन व अंतर-ग्रहीय संबंध हाताळण्यासाठी तैनात करण्यात आले होते. गरज पडल्यावर हे जहाज युद्धात सुद्धा सामील होण्यात समर्थ होते.
कलाकार
प्रमुख कलाकार
- कॅप्टन जॉन-लूक पिकार्डच्या भुमीकेत पॅट्रिक स्टुअर्ट.
- कमांडर विलियम रायकरच्या भुमीकेत जॉनाथन फ्रेक्स.
- लेफ्टनेंट कमांडर डेटाच्या भुमीकेत ब्रेंट स्पायनर.
- जहाजाचा मुख्य तंत्रज्ञ जोर्डी ल-फोर्जच्या भुमीकेत लेव्हार बर्टन.
- जहाजाची समुपदेशक, लेफ्टनेंट कमांडर डीयाना ट्रॉयच्या भुमीकेत मरिना सिर्टिस.
- जहाजचा सुरक्षा प्रमुख, वॉर्फच्या भुमीकेत मायकेल डॉर्न.
- जहाजाची मुख्य डॉक्टर, कमांडर बेव्हर्ली क्रशरच्या भुमीकेत गेट्स मॅकफॅडेन
- जहाजची सुरक्षा प्रमुख, लेफ्टनेंट ताशा यारच्या भुमीकेत डेनिस क्रॉस्बी.
- बेव्हर्ली क्रशरचा मुलगा वेस्ली क्रशरच्या भुमीकेत विल व्हीटन.
निर्मिती
हे सुद्धा बघा
- स्टार ट्रेक
- स्टार ट्रेक:द ओरिजीनल सिरीझ
- स्टार ट्रेक:द ऍनिमेटेड सिरीझ
- स्टार ट्रेक:डिप स्पेस नाईन
- स्टार ट्रेक:व्हॉयेजर
- स्टार ट्रेक:एंटरप्राइझ
संदर्भ
- ^ "सप्टेंबर २४, २००७ रोजी एन्टरटेनमेंट वीकली या मासिकातील स्टार ट्रेक द नेक्स्ट जनरेशन: ऍन ओरल हिस्टोरी ह्या लेखातील संदर्भ". 2010-01-06 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2009-10-07 रोजी पाहिले.
बाह्य दुवे
- स्टार ट्रेक द नेक्स्ट जनरेशन - मेमोरी-आल्फा वेबसाईटवर
- स्टार ट्रेक द नेक्स्ट जनरेशन - स्टार ट्रेक वेबसाईटवर Archived 2010-07-08 at the Wayback Machine.