स्कॉटलंडचा चौथा माल्कम
माल्कम चौथा (इ.स. ११४१-डिसेंबर ९, इ.स. ११६५:जेडबर्ग, स्कॉटलंड) हा इ.स. १९५३ ते मृत्यूपर्यंत स्कॉटलंडचा राजा होता.
हा हेन्री तिसरा व एडा डि वॉरेनेचा सगळ्यात मोठा मुलगा होता. याचे जन्मतः नाव माएल कोलुइम मॅक इनरिक असे होते.
वडिलांच्या मृत्यूनंतर माल्कम युवराजपदी आला व इ.स. ११५३मध्ये त्याच्या आजोबा डेव्हिड पहिल्याच्या मृत्यूनंतर राजा झाला. इ.स. ११५७मध्ये त्याने ईंग्लंडचा राजा हेन्री दुसऱ्याबरोबर चेस्टरचा तह केला.
धार्मिक वृत्तीचा व दीन स्वभावाचा माल्कम वयाच्या २४व्या वर्षी निःसंतान मृत्यू पावला. त्याच्यानंतर त्याचा भाउ विल्यम पहिला राजा झाला.
मागील: हेन्री तिसरा | स्कॉटलंडचे राज्यकर्ते इ.स. ११५३ – डिसेंबर ९, इ.स. ११६५ | पुढील: विल्यम पहिला |