Jump to content

सौर वादळ

सौर वादळ हे सूर्यावरील चुंबकीय क्षेत्रातील अनियमिततेमुळे तयार होणारे वादळ आहे.

सूर्यावर दिसणारे डाग कालांतराने मोठे होतात. सूर्याचं चुंबकीय क्षेत्र जेव्हा जास्त बलवान असतं तेव्हा सौर डागांची संख्या वाढते, मोठे झालेल्या डागाच्या ठिकाणी विस्फोट होऊन सौरवादळांची निर्मिती होते. साधारणत: ११ वर्षांनी सौर डागांची संख्या जास्तीत जास्त होते. यालाच सौर डागांचे 'एकादश वर्षीय चक्र' असे म्हणतात. सौर वादळाचा मानवी शरीरावर प्रत्यक्ष परिणाम आढळत नसला तरी पृथ्वीवरील संदेशवहन यंत्रणा व वीजपुरवठा पूर्णपणे निकामी करण्याची ताकद सौरवादळांमध्ये असते. सौर वादळे सूर्याच्या पृष्ठभागावर निर्माण झाल्यानंतर त्याच्या लहरी बाहेर फेकल्या जातात. या लहरींच्या प्रसारणाच्या मार्गात पृथ्वी आल्यावर त्याचे परिणाम पृथ्वीवर होतात. जितके सौर डाग जास्त, तितकी सौर वादळे जास्त व परिणामी सुर्याकडून पृथ्वीकडे येणारी ऊर्जा जास्त असे ढोबळमानाने म्हणता येईल. यांना विश्वकिरण असेही म्हणतात.