Jump to content

सौराष्ट्र एक्सप्रेस

सौराष्ट्र एक्सप्रेस
सौराष्ट्र एक्सप्रेसचा फलक
माहिती
सेवा प्रकार एक्सप्रेस
प्रदेशमहाराष्ट्र, गुजरात
शेवटची धाव अद्याप सुरू
चालक कंपनी पश्चिम रेल्वे, भारतीय रेल्वेचा विभाग
मार्ग
सुरुवात मुंबई सेंट्रल
थांबे ६२ (१९०१५) ६४ (१९०१६)
शेवटपोरबंदर
अप क्रमांक १९०१६
निघायची वेळ (मुंबई सेंट्रल) ०९:२०
पोचायची वेळ (पोरबंदर) ०५:३०
डाउन क्रमांक १९०१५
निघायची वेळ (पोरबंदर) २१:२०
पोचायची वेळ (मुंबई सेंट्रल) १९:३०
अंतर ९५५ किमी
साधारण प्रवासवेळ २० तास १० मिनिटे (१९०१५), २२ तास १० मिनिटे (१९०१६)
वारंवारिता रोज
प्रवासीसेवा
प्रवासवर्ग वातानुकुलित ३, शयनयान ३, सर्वसाधारण
अपंगांसाठीची सोय नाही
बसण्याची सोय १२ आसनांचा कंपार्टमेंट
झोपण्याची सोय ८ शायिकांचा कंपार्टमेंट (वा.३ आणि श.३)
खानपान नाही
सामान ठेवण्याची सोय प्रवासी कंपार्टमेंटमध्येच
तांत्रिक माहिती
डबे, इंजिने, इ.

डब्ल्यु.ए.पी-४ इंजिन
१ एस.एल.आर
३ वातानुकुलित ३
७ शयनयान ३
४ अनारक्षित

२ सामान
गेज ब्रॉडगेज
विद्युतीकरण पूर्ण मार्ग
सौराष्ट्र एक्सप्रेसचा प्रवासी डबा

सौराष्ट्र एक्सप्रेस ही भारतीय रेल्वेची एक प्रवासी सेवा आहे. पश्चिम रेल्वेद्वारे चालवली जात असलेली ही रेल्वे मुंबईला गुजरातच्या पोरबंदर शहराला जोडते. ही गाडी मुंबई सेंट्रल व पोरबंदर स्थानकांदरम्यान रोज धावते व मुंबई ते पोरबंदर दरम्यानचे ९५५ किमी अंतर २० तास १० मिनिटांत पूर्ण करते. सौराष्ट्र एक्सप्रेस गाडीला सहसा तीन ३-टियर वातानुकुलित शयनयान, ७ शयनयान ४ अनारक्षित आणि दोन सामानाचे डबे असतात.

या गाडीचा संपूर्ण रेल्वेमार्ग विद्युत असल्यामुळे वलसाडचे डब्ल्यू.ए.पी.-४ हे विद्युत इंजिन सौराष्ट्र एक्सप्रेसची वाहतूक करते.

तपशील

वेळापत्रक

गाडी क्रमांक मार्ग प्रस्थान आगमन कधी
१९०१५मुंबई सेंट्रल – पोरबंदर०९:२००५:३०रोज
१९०१६पोरबंदर – मुंबई सेंट्रल२१:२०१९:३०रोज

मार्ग

हे सुद्धा पहा

बाह्य दुवे