Jump to content

सौमित्र चॅटर्जी

सौमित्र चटर्जी
जन्म १९ जानेवारी, १९३५ (1935-01-19) (वय: ८९)
कोलकाता, पश्चिम बंगाल, भारत
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र चित्रपट
भाषाबंगाली

सौमित्र चटर्जी, अर्थात सौमित्र चट्टोपाध्याय (बंगाली: সৌমিত্র চট্টোপাধ্যায়, रोमन लिपी: Soumitra Chatterjee) (१९ जानेवारी, इ.स. १९३५ - हयात) हे भारतीय चित्रपटसृष्टीतील व रंगभूमीवरील अभिनेते आणि कवी आहेत. इ.स. २००४मध्ये भारत सरकारने यांना पद्मभूषण पुरस्कार देऊन गौरवले.

कारकीर्द

चित्रपट-कारकीर्द

वर्ष (इ.स.)चित्रपटभाषासहभागटिप्पणी
इ.स. १९५९अपूर संसारबंगालीअभिनयभूमिका: अपूर्ब कुमार राय.
इ.स. १९६९अरण्येर दिन रात्रीबंगालीअभिनयभूमिका: अशीम.
इ.स. १९७४शोनार केल्लाबंगालीअभिनयभूमिका: प्रदोषचंद्र मित्र ऊर्फ फेलूदा.
इ.स. १९७८जोय बाबा फेलुनाथबंगालीअभिनयभूमिका: प्रदोषचंद्र मित्र ऊर्फ फेलूदा.
इ.स. १९८४घरे बाहिरेबंगालीअभिनयभूमिका: संदीप.
इ.स. १९८९गणशत्रूबंगालीअभिनयभूमिका: अशोक गुप्ता.

पुरस्कार व गौरव

इ.स. २००४मध्ये भारत सरकारने पद्मभूषण पुरस्कार देऊन सौमित्र चटर्जींचा गौरव केला. त्यांना इ.स. २०१२ साली भारतीय चित्रपट क्षेत्रात सर्वोच्च मानल्या जाणाऱ्या दादासाहेब फाळके जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. अभिनेता म्हणून त्यांनी दोन राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार जिंकले असून बंगाली रंगभूमीवरील अभिनयाबद्दल त्यांना इ.स. १९९८ मध्ये संगीत नाटक अकादमी पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

बाह्य दुवे