सोहा अली खान
सोहा अली खान | |
---|---|
जन्म | सोहा अली खान पटौडी ४ ऑक्टोबर, १९७८ नवी दिल्ली, भारत |
राष्ट्रीयत्व | भारतीय |
कार्यक्षेत्र | चित्रपट |
कारकीर्दीचा काळ | २००४ - चालू |
भाषा | हिंदी |
वडील | मन्सूर अली खान पटौदी |
आई | शर्मिला टागोर |
नातेवाईक | सैफ अली खान (भाऊ) |
सोहा अली खान पटौडी ( ४ ऑक्टोबर १९७८) ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. सोहा भारतीय क्रिकेट खेळाडू मन्सूर अली खान पटौदी व बॉलिवूड अभिनेत्री शर्मिला टागोर ह्यांची मुलगी व अभिनेता सैफ अली खान ह्याची बहीण आहे. सोहाचे वडील मन्सूर अली व आजोबा इफ्तिखार अली खान पटौडी हे दोघेही भारतीय क्रिकेट संघाचे भूतपूर्व कर्णधार आहेत.
२००६ मधील रंग दे बसंती हा सोहाने भूमिका केलेला आजवरचा सर्वात यशस्वी चित्रपट आहे.
बाह्य दुवे
- इंटरनेट मूव्ही डेटाबेस वरील सोहा अली खान चे पान (इंग्लिश मजकूर)
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत