सोलापूर शहर उत्तर विधानसभा मतदारसंघ
सोलापूर शहर उत्तर विधानसभा मतदारसंघ - २४८ हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या २८८ मतदारसंघांपैकी एक आहे. हा सोलापूर जिल्ह्यातील मतदारसंघ आहे. लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ परिसीमन आदेश, २००८ नुसार केलेल्या मतदारसंघांच्या रचनेनुसार, सोलापूर शहर उत्तर मतदारसंघात सोलापूर उत्तर तालुक्यातील सोलापूर महसूल मंडळ आणि सोलापूर महानगरपालिकेच्या वॉर्ड क्र.१ ते ५, १५ ते २८, ४८ ते ४९, ५२ ते ६५ आणि ६८ ते ८८ यांचा समावेश होतो. सोलापूर शहर उत्तर हा विधानसभा मतदारसंघ सोलापूर लोकसभा मतदारसंघात मोडतो.[१][२]
भारतीय जनता पक्षाचे विजयकुमार सिद्रामप्पा देशमुख हे सोलापूर शहर उत्तर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत.[३]
आमदार
वर्ष | आमदार[४] | पक्ष | |
---|---|---|---|
२०१९ | विजयकुमार सिद्रामप्पा देशमुख | भारतीय जनता पक्ष | |
२०१४ | विजयकुमार सिद्रामप्पा देशमुख | भारतीय जनता पक्ष | |
२००९ | विजयकुमार सिद्रामप्पा देशमुख | भारतीय जनता पक्ष |
निवडणूक निकाल
महाराष्ट्र विधानसभा निवडणुक २००९ | ||
---|---|---|
सोलापूर शहर उत्तर | ||
उमेदवार | पक्ष | मत |
विजयकुमार सीद्रमप्पा देशमुख | भाजप | ६२,३६३ |
महेश विष्णूपंत कोथे | काँग्रेस | ५२,२७३ |
मनोहर गणपत सपाटे | अपक्ष | १४,६२४ |
मनोज सुमेरचंद जैन | बसपा | ४,७७० |
राम वामन सरवदे | रिपाई (लो) | ८४३ |
पारसनाथ सदाशिव नारायणकर | अभाहिंम | ५५९ |
बशीर इब्राहीम शेख | अपक्ष | ४५९ |
किसन जक्कन नागमणी | अपक्ष | ३७० |
राजशेखर मल्लिनाथ जेउरे | अपक्ष | २७४ |
चंदाप्पा नागप्पा केदार | अपक्ष | २२८ |
विजय कुमार देशमुख हे चालू आमदार आहेत व परिवहन राज्यमंत्री आहेत
संदर्भ
- ^ "भारत परिसीमन आयोग यांची अधिसूचना" (PDF). 2009-02-19 रोजी मूळ पानापासून संग्रहित (PDF). १२ October २००९ रोजी पाहिले.
- ^ "Delimitation of Parliamentary & Assembly Constituencies Order - 2008".
- ^ "१४ वी महाराष्ट्र विधानसभा २०१९ सदस्यांचा संक्षिप्त जीवन परिचय" (PDF).
- ^ "STATISTICAL REPORTS OF GENERAL ELECTION TO STATE LEGISLATIVE ASSEMBLY (VIDHANSABHA)".
बाह्य दुवे
- "भारतीय निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर सोलापूर शहर उत्तर विधानसभा मतदारसंघ निवडणुकांतील इ.स. १९७८ पासूनच्या निवडणुकांचे पक्षनिहाय मतदानाच्या टक्केवारीचे तुलनात्मक विश्लेषण" (इंग्रजी भाषेत). २२ जुलै २०१३ रोजी पाहिले.