Jump to content

सोलापूरमधील जैवविविधता

सोलापूर शहर हे प्रामुख्याने कोरड्या हवामानाचा प्रदेश म्हणून ज्ञात आहे. या प्रदेशात पर्जन्यमान कमी असतांना सुद्धा येथील जैवविविधता थक्क करणारी आहे. जैवविविधतेच्या दृष्टीने महत्त्वाची स्थाने ३ आहेतच.

१) सोलापूर महानगर पालिका स्मृतीवन- स्मृतीवन सुरू करण्याची कल्पना पुणेकरांपासून मिळाली १९९६ साली महानगरपालिका व सामाजिक वनीकरण यांच्या संयुक्त प्रयत्नाने सुरू झाला. या प्रकल्पासाठी संभाजी तलावाशेजारील चौवीस (२४) हेक्टर उपलब्ध करून दिली. स्मृतीवन ही संकल्पना जनसामान्यात चांगल्या प्रकारे रुजलेली आहे या संकल्पनेचा वापर करून सामाजिक वनीकरण सहज शक्य आहे.

२) म.गांधी उद्यान (रेवणसिद्धेश्वर उद्यान) या बागेमध्ये विविध प्रकारचे प्राणी आहेत त्याबरोबरच वेगवेगळ्या वनस्पतींची चांगल्याप्रकारे जोपासना केली आहे. या वनस्पतींमध्ये प्रामुख्याने कैलासपती किंवा तोफगोळाचे झाड म्हणून ओळखले जाते.

३) सिद्धेश्वर वनविहार या प्रकल्पामध्ये विविध प्रकारच्या वनस्पतींचा अत्यंत उपयुक्त पद्धतीने वापर केलेला आहे. या प्रकल्पामध्ये अनेक औषधी वनस्पती व पूजेसाठी वापरली जाणारी फुले जोपासली गेलेली आहेत. या क्षेत्रात नक्षत्रवन ही संकल्पना अत्यंत चांगल्या प्रकारे लाभलेली आहे ज्याद्वारे वनस्पतींचे महत्त्व सर्वसामान्य व्यक्तीला समजू शकते. तसेच विविध औषधी वनस्पतींची तोंडओळख होणे हे गरजेचे आहे याकरिता स्वतंत्र दालन या ठिकाणी आहे. सोलापूर जिल्ह्यातील वनसंपदा, विविध वनक्षेत्र यांची सविस्तर माहिती या ठिकाणी उपलब्ध आहे. अभ्यासकांना निरीक्षण करण्यासाठी निरीक्षण मनोरे येथे ते तयार आहेत. सोलापूर शहरापासून अत्यंत जवळ असलेल्या हे क्षेत्र भविष्यकाळात पर्यटनासाठी अत्यंत महत्त्वाचे मानले जाईल यात शंका नाही. सोलापूर जिल्ह्याच्या वनक्षेत्र साठी एक संदर्भ म्हणून त्याचा नक्कीच वापर होईल.या शिवाय सोलापुरात काही ठिकाणी काही वनस्पती आढळतात ज्या इतरत्र नाहीत वालचंद महाविद्यालय सोलापूर उद्यानात आढळणारे काही वृक्ष महत्वाचे आहेत. फकीर का कटोरा तसेच रतनगुज,पुत्रंजिवा,माधवीलता हे सहजपणे इतरत्र आढळत नाहीत . दयानंद महाविद्यालय मध्ये आढळणारे गोरखचिंच खुप उपयोगी वनस्पती आहे.