सोलापूर
?सोलापूर महाराष्ट्र • भारत | |
— शहर — | |
प्रमाणवेळ | भाप्रवे (यूटीसी+५:३०) |
क्षेत्रफळ • उंची | १४,८८६ चौ. किमी • ४५७ मी |
जवळचे शहर | मोहोळ आणि अक्कलकोट |
जिल्हा | सोलापूर |
लोकसंख्या • घनता | ४३,१७,७५६ (२०११) • २९०/किमी२ |
भाषा | मराठी |
महापौर | |
सहकार मंत्री २०१४ ते २०१९ | सुभाष देशमुख |
पालक मंत्री | चंद्रकांत पाटील |
कोड • पिन कोड • दूरध्वनी • आरटीओ कोड | • 413001 • +०२१७ • एमएच-१३ |
संकेतस्थळ: सोलापूर महानगरपालिका संकेतस्थळ |
सोलापूर उच्चार शहर (इंग्रजीत Solapur/Sholapur) हे महाराष्ट्रातील ५ वे मोठे शहर असून ते पश्चिम महाराष्ट्र या विभागात येते. सोलापूर हे सोलापूर जिल्ह्याचे प्रशासकीय मुख्यालय आहे.
सोलापूरला कापड गिरण्यांचे शहर म्हणले जाते. या शहराला प्राचीन काळात सोन्नलागी किंवा सोन्नलापूर म्हणूनसुद्धा ओळखले जात असे. हे शहर भारतातील मुख्य अशा उत्तर-दक्षिण रेल्वे मार्गावर असल्याने त्यास महत्त्व प्राप्त झाले आहे. स्वातंत्र्यप्राप्तीपूर्वीच सोलापूर शहराने ९-११ मे इ.स. १९३० या काळात ३ दिवसांचे स्वातंत्र्य उपभोगले. या घटनेमुळे स्वातंत्र्य संग्रामादरम्यान मलप्पा धनशेट्टी, जगन्नाथ शिंदे, कुर्बान हुसेन व किसन सारडा यांना १२ जानेवारी १९३१ रोजी ब्रिटिशांनी सोलापूरमध्ये फाशी दिली. तेव्हापासून शहरास हुतात्म्यांचे शहर म्हणून ओळखले जाऊ लागले. विडी उत्पादनात सोलापूरचा महाराष्ट्रात वरचा क्रमांक आहे तर येथील 'सोलापूरी चादरी' प्रसिद्ध आहेत.[ संदर्भ हवा ]
सोलापूराचे प्राचीन म्हणजे १२व्या शतकातील रहिवासी "शिवयोगी सिद्धेश्वर" यांनी या परिसरात अडुसष्ट शिवलिंगांची स्थापना केली वीरशैव धर्माच्या (शैव पंथ) माध्यमातून समाज सुधारणांचे काम केले. सोलापूर तलाव बांधून त्यांनी सोलापूराची पाणी समस्या सोडवली.
पंढरपूर हे महाराष्ट्राचे कुलदैवत सोलापूर जिल्ह्यातच असून अक्कलकोटचे प्रसिद्ध स्वामी समर्थ मंदिर सोलापूर जिल्ह्यात आहे. बार्शी येथे भगवंताचे म्हणून ओळखले जाणारे विष्णूचे प्राचीन मंदिर आहे. येथील शिवगंगा मातेच्या मंदिराचा कळस शंभर तोळे सोन्यापासून बनलेला आहे, आणि दरवाजा ऐंशी किलो चांदीपासून बनलेला आहे. सोलापूर येथील भुईकोट किल्ला, सिद्धेश्वर मंदिर, मल्लिकार्जुन मंदिर, हुतात्मा बाग, इंद्रभुवन (महानगर पालिका इमारत), शुभराय आर्ट गॅलरी, स्मृती उद्यान ही भेट देण्यासारखी ठिकाणे आहेत. हुतात्मा स्मृती मंदिर येथे अनेक कला प्रदर्शन आणि नाट्यप्रयोग मोठ्या प्रमाणात होत असतात. सोलापूरमध्ये दरवर्षी सिद्धेश्वर यात्रा म्हणजेच" गड्डा " ही मोठी यात्रा असते. या यात्रेला कर्नाटक परिसरातून लोक येतात.
केंद्र सरकारच्या स्मार्ट सिटी प्रकल्पात सोलापूरचे नाव यादीत समाविष्ट झाले होते.
इतिहास
इ.स.पू. २००] या वर्षापासून सातवाहन, चालुक्य, राष्ट्रकूट, यादव, बहामनी, अहमदनगरची निजामशाही, आदिलशाही, मराठे-पेशवे व ब्रिटिश या सर्व राजवटी सोलापूर जिल्ह्याने अनुभवल्या.. मुघल राजवटीत यास संदलपूर असेही म्हणले जात होते. ब्रिटिश काळात सोलापूर हे नाव रूढ झाले असावे असा अंदाज व्यक्त केला जातो. सोलापूरचा इतिहास रोमांचक आहे. मुंबई-चेन्नई रेल्वे मार्गावरील महत्त्वाचे स्थानक असल्यामुळे स्वातंत्र्यपूर्व काळात राष्ट्रीय पातळीवरील सर्व राजकीय-सामाजिक घडामोडींचे पडसाद सोलापूमध्ये उमटत असत. पहिल्या महायुद्धानंतर भारतात कामगारांनी मोठा संप पुकारला. सोलापूरलाही जानेवारी, १९२० मध्ये कामगारांनी ब्रिटिश साम्राज्यशाहीच्या विरोधात संप पुकारला होता.१९३० च्या सविनय कायदेभंग चळवळीत सोलापूरकर हिरिरीने सहभागी झाले होते. या सत्याग्रहात दारुबंदीचा प्रचार करण्यासाठी काही तरुण कार्यकर्त्यांनी मोर्चा काढला. या वेळी शंकर शिवदारे हा तरुण तिरंगा हातात घेऊन पुढे धावला व ब्रिटिशांच्या गोळीबारात बळी पडला. हा शंकर शिवदारे सोलापूरचा पहिला हुतात्मा. या हौतात्म्यामुळे सोलापूरकर पेटून उठले. पण दि. ८,९ मे, १९३० या दोन दिवसांत तत्कालीन कलेक्टर नाईट याने जमावांवर अमानुष गोळीबार केला. अनेक नागरिक गोळीबारात बळी पडले. भारतातील (काही काळासाठी) ‘स्वतंत्र’ झालेला असा हा पहिला भाग..अश्या प्रेरणादायी क्रांतिपर्वांमुळेच सोलापूरला हुतात्म्यांचे शहर म्हणले जाते. पुतळ्यांच्या माध्यमातून आज या हुतात्म्यांची स्मृती सोलापूरात जतन करण्यात आली आहे. १९३०-३१ मधील या घटनांचे संदर्भ तत्कालीन ‘केसरी’ मध्ये आढळतात. १२ जानेवारी हा दिवस सोलापूरकर हुतात्मा दिन म्हणून पाळतात.[ संदर्भ हवा ]सोलापूर येथील भुईकोट किल्ला, सिद्धेश्वर मंदिर, मल्लिकार्जुन मंदिर, हुतात्मा बाग, इंद्रभुवन (महानगर पालिका इमारत), शुभराय आर्ट गॅलरी, स्मृती उद्यान ही भेट देण्यासारखी ठिकाणे आहेत. हुतात्मा स्मृती मंदिर येथे अनेक कला प्रदर्शन आणि नाट्यप्रयोग मोठ्या प्रमाणात होत असतात. सोलापूरमध्ये दरवर्षी सिद्धेश्वर यात्रा म्हणजेच" गड्डा " ही मोठी यात्रा असते. कर्नाटक परिसरातून लोक येतात.
तसेच पूर्वीचे गिरणगाव, हुतात्म्यांचे गाव, सध्याचे ज्वारीचे कोठार, तेलगू, कन्नड व मराठी असा भाषा-त्रिवेणी संगम झालेला बहुभाषिक जिल्हा आणि टॉवेल, चादरी निर्माण करणारा जिल्हा म्हणून सोलापूर प्रसिद्ध आहे. पर्यटन, फलोत्पादन, कृषी प्रक्रिया उद्योग, शिक्षण, आरोग्यसेवा व कापड उद्योग (हातमाग, यंत्रमाग) या क्षेत्रांमध्ये जिल्ह्याचा विकास साधण्याची क्षमता निश्चितच आहे. सोलापूर जिल्हा हा दुष्काळी भाग म्हणून ओळखला जातो .[१] हुतात्मा जगन्नाथ शिंदे हे सोलापूर शहरात दक्षिण कसबा येथे शिंदे चौकात राहत होते. सोलापूर शहराचे भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात मोठे योगदान असल्याचे दिसून येते. हुतात्मा शिंदे ज्या वास्तूमध्ये राहत होते ती वास्तू आज मोडकळीस आली आहे. तेथे आज कोणी वास्तव्यास नाही. त्यांना मुले नव्हती. त्याच्या भगिनी ताराबाई ह्या शिक्षिका होत्या. १९३७ साली स्वतंत्र मजूर पक्षाच्या प्रचारासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर सोलापूरात आले होते. तसेच सोलापूर हे आंबेडकर चळवळीचे केंद्र आहे असे मानले जाते.
सोलापूर जिल्हा वेगवेगळ्या कालखंडात आंध्रभृत्य, चालुक्य, राष्ट्रकूट, यादव व बहामनी घराण्यांच्या अधिपत्याखाली होता. सोलापूर हे नाव सोळा म्हणजे सोळा व पूर म्हणजे गाव असे तयार झाले ही धारणा आहे. सध्याचे सोलापूर शहर हे अहमदपूर, चपळदेव, फतेपूर, जामदारवाडी, काळजापूर, खादरपूर, खांडेकरवाडी, महमदपूर, राणापूर, संदलपूर, शेखपूर, सोलापूर, सोन्नलगी, सोनपूर व वैदकवाडी या सोळा गावांच्या एकत्रीकरणाने बनले आहे. से समजले जाते.
पण नवीन संशोधनानुसार सोलापूर हे नाव सोळा गावांच्या एकत्रीकरणाने बनलेले नाही, असे सांगितले जाते. शिवयोगी श्री सिद्धेश्वर लिखित शिलालेखानुसार गावाला सोन्नलगे हे नाव होते. कालांतराने सोन्नलगेचे सोन्नलगी असे रूपांतर झाले. आणि यादव वंशापर्यंत सोलापूरचे लेखन सोन्नलगी असे होते.
मोहोळ तालुक्यातील कामती येथे सापडलेल्या शके १२३८ च्या संस्कृत शिलालेखानुसार सोलापूर नगरीला सोनलपूर असे म्हणत. सोलापूर भुईकोट किल्ल्यात सापडलेल्या एका शिलालेखानुसार सोनलपूर असा उल्लेख होतो. तर त्याच किल्ल्यातील दुसऱ्या भिंतीवर सापडलेल्या शिलालेखानुसार या नगरीचा उल्लेख संदलपूर असे केलेले आहे.
मुस्लिम काळात या शहराला सोनलपूर असे संबोधण्यात येत होते. काळाच्या ओघात सोनलपूर मधील ‘न’ गाळला जाऊन सोलपूर नंतर सोलापूर असे नाव प्रचलित झाले असावे. त्यानंतर ब्रिटिश शासकांनी सोलापूर ऐवजी शोलापूर असे स्पेलिंग केले.
सध्याचा सोलापूर जिल्हा हा पूर्वी अहमदनगर, पुणे व सातारा या जिल्ह्याचा भाग होता. इसवी सन १८३८ला अहमदनगरचा उपजिल्हा बनला. त्यामध्ये बार्शी, मोहोळ, माढा, करमाळा, इंडी, हिप्परगी आणि मुद्देबिहाळ हे उपविभाग होते. इसवी सन १८६४ मध्ये हा उपविभाग काढून टाकण्यात आला. इसवी सन १८७१ मध्ये सोलापूर, बार्शी, मोहोळ, माढा आणि करमाळा हे उपविभाग व सातारा जिल्ह्यातील पंढपूर, सांगोला उपविभाग एकत्र करून सोलापूर जिल्ह्याची निर्मिती करण्यात आली व इसवी सन १८७५ मध्ये माळशिरस हे उपविभाग देखील सोलापूर जिल्ह्याला जोडण्यात आले. १९५६ मध्ये राज्य पुनर्रचनेनुसार सोलापूरचा समावेश मुंबई राज्यात करण्यात आला. व इसवी सन १९६०मध्ये महाराष्ट्राचा एक परिपूर्ण जिल्हा म्हणून जाहीर झाला.
स्वातंत्रपूर्व काळापासून स्वातंत्र मिळवण्याआधी सोलापूरचे महत्त्व भारताच्या इतिहासात अद्वितीय आहे. सोलापूरच्या नागरिकांना इ.स. १९३० मधील तारखा ९-१०-११ असे तीन दिवस स्वातंत्र्य मिळाले. मे १९३० रोजी महात्मा गांधींना अटक झाली. संपूर्ण भारतभर लोक ब्रिटिशांवर क्षुब्ध झाले. सोलापूरात मोर्चे व आंदोलने झाली. पोलिसांच्या गोळीबारात अनेक नागरिकांना जीव गमवावा लागला. यामुळे प्रक्षुब्ध जमावाने चपळ स्टेशनवर हल्ला केला. पोलीस आणि अन्य अधिकारी सोलापूर शहराच्या बाहेर पळत होते. या काळात कायदा सुव्यवस्थेची जबाबदारी आणि नागरिकांच्या सुरक्षेची जबाबदारी काँग्रेस पक्षाच्या नेत्याच्या खांद्यावर होती. त्यानंतर इतर काँग्रेसचे नेते रामकृष्ण जाजू यांनी १९३० मधील तारखा ९-१०-११ या तीन दिवसांच्या काळात कायदा व सुव्यवस्था राखली.
स्वातंत्र्यापूर्वीच इस वी सन १९३० मध्ये महापालिकेच्या इमारतीवर सर्वप्रथम राष्ट्रीय ध्वज फडकवणारी भारतातील एकमेव नगरपालिका होती. याचा थोडक्यात इतिहास म्हणजे – महात्मा गांधी यांच्या दांडी यात्रेची प्रेरणा घेऊन सोलापूरमधील स्वातंत्र सैनिकांनी सोलापूर पालिकेवर राष्ट्रध्वज फडकवण्याचा निर्णय घेतला त्याप्रमाणे ६ एप्रिल १९३० रोजी पुण्याचे ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक अण्णासाहेब भोपटकर यांनी सोलापूर पालिकेवर राष्ट्रध्वज फडकावला. संपूर्ण देशभरात ही पहिली व एकमेव घटना होती. या घटनेने संतापून ब्रिटिश राज्यकर्त्यांनी सोलापूर येथे मार्शल लाँ घोषित केला. अनेक नेत्यांना व निर्दोष नागरिकांना खोट्या आरोपाखाली अटक केली. स्वातंत्र्यसैनिक मल्लप्पा धंनशेट्टी, कुर्बान हुसेन, जगन्नाथ शिंदे व किसन सारडा यांना मंगळवार पोलीस ठाण्यात दोन पोलिसांच्या हत्यांच्या आरोपाखाली अटक करण्यात आली. निम्न न्यायालयाने या स्वातंत्र्यसैनिकांना मरेपर्यंत फाशीची शिक्षा सुनावली. उच्च न्यायालयानेपण वरील शिक्षा कायम ठेवली व या चार स्वातंत्र्यसैनिकांना १२ जानेवारी १९३१ रोजी फाशीची शिक्षा देण्यात आली. या स्वातंत्र्यसैनिकांचा आदर म्हणून शहराच्या मध्यवर्ती भागात पुतळे बसवण्यात आले व त्या स्थानाला हुतात्मा चौक असे नाव दिले.
नाव
"सोलापूर" ह्या नावाचा उगम 'सोला (सोळा) आणि पूर (गावे)' या दोन शब्दापासून झाला आहे. असे मानले जाते की, सध्याचे सोलापूर शहर हे अहमदपूर, आदिलपूर, काळजापूर, खडारपूर, खान्देरवाडी, चपळदेव, जामदारवाडी, फतेहपूर, मुहम्मदपूर, राणापूर, शेखपूर, सन्दलपूर, सोनापूर सोन्नलगी, सोलापूर आणि वैदकवाडी ह्या सोळा गावांपासून बनले आहे.[ संदर्भ हवा ] पूर्वीचे गिरणगाव, हुतात्म्यांचे गाव, सध्याचे ज्वारीचे कोठार, तेलगू, कन्नड व मराठी असा भाषा-त्रिवेणी संगम झालेला बहुभाषिक जिल्हा आणि टॉवेल, चादरी निर्माण करणारा जिल्हा म्हणून सोलापूर प्रसिद्ध आहे. पर्यटन, फलोत्पादन, कृषी प्रक्रिया उद्योग, शिक्षण, आरोग्यसेवा व कापड उद्योग (हातमाग, यंत्रमाग) या क्षेत्रांमध्ये जिल्ह्याचा विकास साधण्याची क्षमता निश्चितच आहे. सोलापूर जिल्हा हा दुष्काळी भाग म्हणून ओळखला जातो.[१] हुतात्मा जगन्नाथ शिंदे हे सोलापूर शहरात दक्षिण कसबा येथे शिंदे चौकात राहत होते. सोलापूर शहराचे भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात मोठे योगदान असल्याचे दिसून येते.सोलापूरला एक ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे. इ.स.पू. २०० वर्षापासून सातवाहन, चालुक्य, राष्ट्रकूट, यादव, बहामनी, अहमदनगरची निजामशाही, आदिलशाही, मराठे-पेशवे व ब्रिटिश या सर्व राजवटी सोलापूर जिल्ह्याने अनुभवल्या. यादवांच्या काळात या भागाला सोन्नलगी म्हणले जात होते. मुघल राजवटीत यास संदलपूर असेही म्हणले जात होते. ब्रिटिश काळात सोलापूर हे नाव रूढ झाले असावे असा अंदाज व्यक्त केला जातो. सोलापूरला सोन्नलगिरी, गिरणगाव अशा नावानेही ओळखले जाते.
भूगोल
सोलापूर जिल्ह्याचे एकूण क्षेत्रफळ १५ हजार चौरस किलोमीटर आहे. सोलापूरातील सरासरी पर्जन्यमान ५४५ मिलिमीटर (महाराष्ट्रातील सर्वात कमी) आहे. जिल्ह्याची लोकसंख्या ३८,४९,५४३(इ.स. २००१) आहे. भीमा नदी जिल्ह्यातील प्रमुख नदी आहे. जिल्ह्यात डोंगराळ भाग जवळजवळ नाही.
सोलापूर जिल्ह्याच्या उत्तरेस अहमदनगर व उस्मानाबाद; पूर्वेला उस्मानाबाद , दक्षिणेस सांगली व विजापूर जिल्हा व (कर्नाटक) तर पश्चिमेस पुणे,सांगली,सातारा हे जिल्हे आहेत. जिल्ह्याच्या उत्तर, ईशान्य व पूर्व भागात बालाघाटच्या डोंगररांगा आहेत. तसेच पश्चिम व नैर्ॠत्य या भागांत महादेवाचे डोंगर आहेत. जिल्ह्याचा इतर भाग सपाट, पठारी आहे. या जिल्ह्याचे हवामान सर्वसाधारणपणे उष्ण व कोरडे आहे. काही भागांत उन्हाळ्यात कमाल तापमान ४२ ते ५० अंश सेल्सिअसपर्यंत जाते.
जिल्ह्यात वायव्येकडून आग्नेयेकडे वाहणारी भीमा नदी जिल्ह्याचे दोन भाग करते. भीमेची जिल्ह्यातील लांबी सुमारे २९० कि.मी. आहे. भीमा पंढरपूर येथे चंद्रभागा या नावाने ओळखली जाते. नीरा-भीमा संगम माळशिरस तालुक्यात, तर भीमा-सीना संगम दक्षिण सोलापूर तालुक्यात हत्तरसंग-कुडल येथे होतो. जिल्ह्यातून सीना, नीरा, भोगावती, हरणी, बोटी, माण या छोट्या-मोठ्या नद्या वाहतात.
सोलापूर-पुणे जिल्ह्यांच्या सीमेवर माढा तालुक्यात उजनी येथे भीमा नदीवर धरण बांधण्यात आलेले आहे. या धरणामुळे सोलापूर शहरासह जिल्ह्यातील्या पश्र्चिम व मध्य भागांत सुलभतेने पाणीपुरवठा होतो. १९८० मध्ये बांधून पूर्ण झालेल्या उजनी धरणाच्या जलाशयाला यशवंतसागर असे म्हणले जाते. शेतीसाठी सिंचन, पिण्यासाठी पाणी, उद्योगांना पाणी, साखर कारखान्यांना पाणी, विद्युतनिर्मिती असे अनेक उद्देश साध्य करणारा हा बहुउद्देशीय प्रकल्प आहे. या धरणाच्या परिसरात फ्लेमिंगो (रोहित) पक्षी आढळतात. भीमा-सीना जोडकालव्यामुळे जिल्ह्यातील सात तालुक्यांना लाभ होतो. भीमा-सीना बोगदा हा आशिया खंडातील सर्वांत मोठा(?) बोगदा आहे. उजनी धरणातून या बोगद्याद्वारे सीना नदीत पाणी सोडले जाते. याचबरोबर जिल्ह्यात सहा (६) मध्यम पाणीप्रकल्प आहेत. उत्तर सोलापूर तालुक्यात एकरूखे (हिप्परगी) तलाव आहे. याचाही फायदा आसपासच्या भागांतील लोकांना होतो. सोलापूर हा जिल्हा ज्वारी या धान्याचे कोठार आहे.[ संदर्भ हवा ]
सोलापूर जिल्ह्यातील तालुके
हवामान
Solapur साठी हवामान तपशील | |||||||||||||
---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|
महिना | जाने | फेब्रु | मार्च | एप्रिल | मे | जून | जुलै | ऑगस्ट | सप्टें | ऑक्टो | नोव्हें | डिसें | वर्ष |
सरासरी कमाल °से (°फॅ) | ३०.९ | ३४.४ | ३७.४ | ३९.७ | ४०.१ | ३५.० | ३१.७ | ३१.० | ३१.८ | ३२.५ | ३१.० | ३०.० | — |
सरासरी किमान °से (°फॅ) | १६.० | १८.० | २१.६ | २४.८ | २५.३ | २३.४ | २२.४ | २१.९ | २१.६ | २०.९ | १७.९ | १४.९ | — |
सरासरी वर्षाव मिमी (इंच) | २.२ | ४.६ | ३.८ | ११.२ | ३६.९ | १११.५ | १३८.८ | १३७.३ | १७९.८ | ९७.४ | २३.२ | ४.८ | — |
स्रोत: IMD |
जैवविविधता
भारतीय डाळिंबे जगाच्या बाजारपेठेत तोरा मिरवत असताना सोलापूरच्या मातीत पिकलेल्या डाळिंबांना 'सोलापूर डाळिंब' असा विशेष भौगोलिक निर्देशांक मिळाल्याने सोलापूरची डाळिंबे आंतरराष्ट्रीय बाजारात आता वेगळा तोरा मिरवणार आहेत. सोलापूरच्या डाळिंबांना एक वेगळी प्रतिष्ठा मिळाली असून त्यामुळे निर्यातीला मोठा मिळाला आहे.
अर्थकारण
बाजारपेठ
सोलापूरला एक ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे.सोलापूराचे प्राचीन म्हणजे १२व्या शतकातील रहिवासी "श्री.शिवयोगी सिद्धेश्वर" यांनी या परिसरात अडुसष्ट शिवलिंगांची स्थापना केली वीरशैव धर्माच्या (शैव पंथ) माध्यमातून समाज सुधारणांचे काम केले. सोलापूर तलाव बांधून त्यांनी सोलापूराची पाणी समस्या सोडवली. सोलापूर शहरात हातमागावर नऊ वारी साडी तयार करण्याची प्रथा आहे. या साडीचा पोत हा इतका सुंदर असतो की प्रत्येक स्त्रीला हवाहवासा वाटतो. येथील नऊवारी साडीला मोठ्या प्रमाणावर मागणी आहे. त्यामुळे सोलापूरची बाजारपेठ आजही प्रसिद्ध असल्याचे दिसून येते. सोलापूर शहर हे कामगारची वस्ती म्हणून ओळखले जाते.याचे मुख्य कारण म्हणजे पूर्वीपासून चालत आलेला हातमाग व्यवसाय आणि आता सुरू असलेला पाॅवर लूमचा व्यवसाय मोठ्या प्रमाणात चालू असून आज त्याबरोबरच महिला बिडी उद्योग यामुळे सोलापूरला ही ओळख प्राप्त झाली.
सोलापूर जिल्हा हा ज्वारीचे कोठार म्हणून ओळखला जातो. बार्शी तालुक्यासह आजूबाजूच्या खेड्यातून मोठ्या प्रमाणातून ज्वारीची आयात केली जाते. यासाठी मंगळवेढा हा तालुका प्रसिद्ध आहे.
सोलापूर जिल्ह्यामधील बार्शी तालुक्यामध्ये डाळीचे उत्पादन मोठ्या प्रमाणात होते.
प्रशासन
मतदारसंघांच्या पुनर्रचनेनुसार सोलापूर जिल्ह्यात एकूण २ लोकसभा मतदारसंघ व ११ विधानसभा मतदारसंघ आहेत. तसेच ६८ जिल्हा परिषद मतदारसंघ व १३६ पंचायत समिती मतदारसंघ आहेत. लोकसभा मतदारसंघ (२) : सोलापूर व माढा. माढा लोकसभा मतदारसंघात सोलापूर जिल्ह्यातील करमाळा, माढा, माळशिरस, सांगोले या विधानसभा मतदारसंघांचा समावेश असून सातारा जिल्ह्यातील माण व फलटण या विधानसभा मतदारसंघांचा समावेश होतो. बार्शी हा जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघ उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघात येतो. विधानसभा मतदारसंघ (११) : अक्कलकोट, उत्तर सोलापूर शहर, करमाळा, दक्षिण सोलापूर शहर, मध्य सोलापूर शहर, माढा, माळशिरस, मोहोळ, पंढरपूर, बार्शी, सांगोले, .
नागरी प्रशासन
जिल्हा प्रशासन
सोलापूर वाहतूक व्यवस्था
सोलापूर शहरातील अंतर्गत वाहतूक व्यवस्थेची समस्या जटिल आहे. ही समस्या बसस्थानक परिसरात अधिकच दिसून येते. तेथे अनेकदा वाहतुकीची कोंडी होते. सोलापूर शहरातून 5 प्रमुख महामार्ग जातात. १) सोलापूर - पुणे, २) सोलापूर - विजापूर, ३) सोलापूर - हैद्राबाद, ४) सोलापूर - धुळे,५) सोलापूर - सांगली. त्याच प्रमाणे सोलापूर हे वाहतूक व्यवस्थेमध्ये खूपच विखुरलेले शहर म्हणून ओळखले जाते.
लोकजीवन
सोलापूर शहरात म्हशी पळवण्याची परंपरा अनेक वर्ष पासून सुरू आहे. कसब्यातील वीरशैव गवळी समाजाच्या वतीने दिवाळीमध्ये याचे आयोजन दरवर्षी केले जाते.भास्कर घराण्याच्या म्हशीला यावेळी पहिला मान असतो. म्हशी पळवण्याचा कार्यक्रम सोलापूर पंचक्रोशीत प्रसिद्ध आहे. माळशिरस तालुक्यातील अकलूज या गावात खूप मोठा घोडा बाजार भरला जातो.
संस्कृती
संगीत महोत्सव
रंगभूमी
सोलापूर मध्ये "हुतात्मा स्मृति मंदिर" हे नाट्यगृह आहे. शहराच्या केंद्र स्थानी असलेल्या या नाट्यगृहात वेगवेगळे नाटकाचे तसेच सांस्कृतिक कार्यक्रम होत असतात.त्या ठिकाणी विविध नाटकाचे प्रयोग त्या सोबतच विविध हास्य कार्यकार्माचे आयोजन केले जाते. मोठ मोठ्या कलाकारांची नाटक या ठिकाणी होत राहतात. राज्य नाट्य स्प्रधेचे आयोजन देखील केले जाते . त्या साठी लोकांचा प्रतिसाद हा खूप मोठ दिसून येतो. हुतात्मा स्मृती मंदिर सोलापूर महानगर पालिकेच्या मालकीचे आहे. याशिवाय छत्रपती शिवाजी महाराज रंगभवन याठिकाणी देखील सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. याचे व्यवस्थापन सोलापूर जिल्हा परिषदेकडे आहे. पूर्वी भागवत चित्रमंदिर येथे नाट्यप्रयोग होत असत. सात रस्ता येथे दमाणी सभागृह होते,सध्या त्याठिकाणी दुचाकी वाहनाचे शोरूम आहे.
चित्रपट
सोलापूर हे कर्नाटक व आंध्र प्रदेशच्या सीमेवर असल्यामुळे येथे मराठी बरोबरच तेलगू व कन्नड चित्रपट पण प्रदर्शित होतात. सोलापूर हे बहुभाषिक शहर आहे. 'सैराट' हा २०१६ मध्ये प्रदर्शित झालेला बहुचर्चित चित्रपट ज्याने संपूर्ण महाराष्टाला तसेच संपूर्ण बॉलीवुडला वेड लावले त्याची निर्मिती सोलापूरातच नागराज मंजुळे या दिग्दर्शकाने केलेली आहे. या चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार मिळालेला आहे.
धर्म-अध्यात्म-भाषा
सोलापूर शहर हे कर्नाटक व आताचे तेलंगण व पूर्वीचे संयुक्त आंध्र प्रदेश यांच्या सीमेलगत असल्याने येथे विविध धर्मांचे व भाषां बोलणारे लोक राहतात.
- मुख्य भाषा : मराठी, कन्नड, तेलुगू, .
- इतर भाषा : हिंदी, गुजराती, सिंधी, पंजाबी, तामिळ, मल्याळम,उर्दू
- बोली भाषा : पारधी, गोरमाटी (बंजारा किंवा लमाण), राजस्थानी, मारवाडी.
सोलापूरातील सिद्धेश्वराचे मंदिर प्रसिद्ध आहे. दरवर्षी १२ जानेवारी रोजी मल्लिकार्जुन मंदिरापासून यात्रेस सुरुवात होते. सिद्धरामेश्वराच्या योग दंडाचे प्रतीक म्हणून नंदीध्वज उभारले जातात. चार दिवस चालणाऱ्या या यात्रेस महाराष्ट्रासह कर्नाटक, आंध्रप्रदेश येथून लोक येतात. यात्रेत सहभागी होणारे भक्त हे पाढऱ्या बाराबंद्या परिधान केलेले असतात.१२ जानेवारीला सिद्धरामेश्वरानी स्थापन केलेल्या ६८ लिगाना तैलाभिषेक केला जातो.१३ जानेवारीला अक्षता सोहळा पार पडला जातो आणि नंतर पुन्हा ६८ लिंगांना प्रदक्षिणा घातले जाते.१४ जानेवारी रोजी रात्री होम मैदानवरील होमकट्टा येते होमविधी सोहळा होतो.१५ जानेवारी रोजी किंक्रांत असून या दिवशी रात्री शोभेच्या दारूकामाची आतषबाजी होते.१६ जानेवारी रोजी रात्री मल्लिकार्जुन मंदिरात नंदीध्वजाच्या वस्त्रविसर्जनाने (कप्पडकाळी) यात्रेतील धार्मिक कार्यक्रमाची सांगता होते.
सिद्धदरामेश्वर हे १२व्या शतकातले एक युग पुरुष होते. एके दिवशी कुंभार कन्येने सिद्धरामेश्वर यांना तिचा मानस सांगितला की ती सिद्धरामेश्वर याबरोबर विवाह करू इच्छिते. सिद्धरामेश्वर यांनी तिला सागितले की ' माझा विवाह महादेवाशी झाला आहे. तरीही ती कुंभार कन्या ऐकत नव्हती. त्यावर सिद्धरामेश्वर तिला आपल्या योगदंडाशी विवाह करण्यास सांगितले. १३ जानेवारीला विवाह झाला आणि १४ जानेवारीला कुंभार कन्येने देहत्याग केला.[ संदर्भ हवा ]
सोलापूर शहरातील विजापूर रस्त्यास लागून कंबर तलाव आहे.या तलावाच्या पश्चिमेस समोरील बाजूस हे मंदिर आहे.
सोलापूर जिल्ह्यातील प्रसिद्ध देवस्थाने
- जागृत मारूती मंदिर, शेळगी
- श्री नागनाथ नागनाथ मंदिर वडवळ मोहोळ सोलापूर सोलापूर पुणे महामार्ग रोडवर
- श्री भैरवनाथ भैरवनाथ मंदिर तांबोळे मोहोळ सोलापूर मोहोळ पंढरपूर रोडवर
- श्री मेसाई देवी मंदिर आढेगाव. मोहोळ पंढरपूर रोडवर
- मरीआई देवस्थान चिखली मोहोळ सोलापूर मोहोळ पुणे रोडवर
- श्री विठ्ठल विठ्ठल मंदिर पंढरपूर सोलापूर मोहोळ कोल्हापूर रोडवर
- श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ मंदिर अक्कलकोट सोलापूर
- श्री खंडोबा खंडोबा मंदिर बाळे सोलापूर सोलापूर-पुणे रोडवर
- यमाई देवी यमाई देवी मंदिर मार्डी उत्तर सोलापूर सोलापूर मार्डी रोडवर
- श्री भगवंत मंदिर बार्शी सोलापूर (जगातील एकमेव भगवंत मंदिर)
- मल्लिकार्जुन मंदिर - माचनूर
- राम मंदिर - (होळकर वाडा) पंढरपूर
- हरीहरेश्वर मंदिर - कुडल(हत्तरसंग जवळ) शैव व वैष्णव पंथाचे एकत्रीकरण दाखवणारे व मराठी शिलालेख असणारे एकमेव मंदिर
- जुने दत्त मंदिर (दत्त चौक).
१५) श्री मल्लिकार्जुन मंदिर - दहिटणे अक्कलकोट
१६) श्री वीरभद्रेश्वर मंदिर - दहिटणे अक्कलकोट
१७) श्री मल्लिकार्जुन मंदिर - चपळगाव अक्कलकोट 18 पुरातन काळापासून श्री काशी विश्वेश्वर मंदिर जेऊर येथे आहे. त्या ठिकाणी काशीवरून पाणी वर्षाला श्रावण महिन्यामध्ये येते. हे स्थान अक्कलकोट पासून सात किलोमीटर अंतरावर आहे.
१८) आनंदी गणेश मंदिर —अकलूज
प्रसारमाध्यमे
सोलापूर शहरात सर्व प्रसार माध्यमे प्रकाशित होत असून त्यात जनमत, तरुण भारत, दिव्य मराठी, पुढारी, माणदेश नगरी, लोकमत, सकाळ, संचार, सुराज्य, पुण्य नगरी मंथली विजय प्रताप मंथली, आनंद लोखंडे वृत्त नालंदा एक्सप्रेस अशा प्रकारचे अनेक वृत्तपत्रे प्रकाशित होतात. तसेच पुण्याहून येणारे लोकसत्ता,टाईम्स ऑफ इंडिया,द हिंदू,महाराष्ट्र टाईम्स,मुंबई चौफेर,संध्यानंद, डेक्कन क्रोनिकल इत्यादी वृत्तपत्रांनाही पसंती आहे.[ संदर्भ हवा ]
सोलापूरातील वृत्तपत्राचा इतिहास
१८७८ साली सोलापूर येथेही सुदर्शन नावाचे एक वृत्तपत्र असल्याचे आढळते मुंबईच्या नेटिव्ह ओपिनियन पत्राने सुदर्शनचे दोन अंक मिळाल्याची पोच त्यांनी आपल्या अंकात १ सप्टेंबर १८७८ च्या अंकात दिली होती ,पंढरपुरातून गोविंद सखाराम बिडकर यांचे पांढरी मित्र नावाचे पत्र निघत असे पुण्याच्या उद्योगवृधी पत्रात तसा उल्लेख आढळतो १८८३ च्या सुमारास माला नावाचे पत्र निघत असे असे दिसते पण त्याच कालखंडातील सध्या चालू असलेले सोलापूर समाचार हे पत्र होय या पत्राचे संस्थापक नरसय्या जक्कल हे नगरहून सोलापूरला आले तेव्हा ते नगर समाचार हे पत्र नगरहून काढीत असे त्याच धर्तीवर त्यांनी सोलापूरला आल्यावर सोलापूर समाचार हे पत्र ३ फेबुर्वारी १८८३ साली सुरू केले .नरसय्या यांना छायाचित्रणाचीही कला अवगत होती तसेच नरसय्या यांना स्वतचा छापखाना व पत्राची स्वताची इमारत होती .
सोलापूर समाचारचे धोरण सर्वाशी मिळते जुळते होते त्यामुळ त्यांना अडचणी आल्या नाहीत पुढे १९१४ साली नरसय्या हे कालवश झाले साधारण पणे २८ वर्षे त्यांनी सांभाळलेली सोलापूर समाचारची धुरा त्यांचे चिरंजीव विठ्ठलराव जक्कल हे सांभाळू लागले ते ही वडिलासारखे स्वभावाचे असल्याने आणि जनमानसात मिसळू लागल्याने आणि त्यांच्या कार्यामुळे त्यांना सरकारने रावसाहेब ही उपाधी देऊन सन्मानित केले विठ्ठल रावच्या कारकिर्दीतच सोलापूर समाचारचे रूपांतर दैनिकात झाले.
मुंबई बाहेरील जिल्ह्याच्या ठिकाणाहून निघणारे आणि रायटर्सच्या बातम्या छापणारे पहिले दैनिक म्हणून सोलापूर सामाचारणे स्वताची ओळख निर्माण केली अन् १९३६ साली वित्थ्ल्रावांचे निधन झाले विठ्ठलरावा नंतर त्यांचे बंधू बाबुराव जक्कल यांनी सोलापूरची धुरा आपल्या खांद्यावर घेतली पूर्वीपासूनचा पत्रकात काम करणारे बाबुराव जक्कल यांनी टेलीप्रिंटर द्वारा बातम्या मिळण्याची सोय करून आणखी एक पूल पुढे टाकले.[ संदर्भ हवा ]
बाबुरावाचा पिंड शांतता प्रिय सर्वाशी मिळता जुळता घेणारा असल्याने आणि ते जिल्हयातील सर्वच गोष्टीत रस घेऊ लागल्याने सोलापूर समाचर पत्राची प्रतिष्ठा आणि प्रसार झपाट्याने वाढत असतानाच बाबूरावांनी सामाचारचा सोलापूर जिल्ह्यावरील माहितीचा जूबली अंक काढला या पत्राला १९१५ साली पन्नास वर्षे पूर्ण झाली होती बाबूरावांनी त्यांच्या वृद्धापकाळात म्हणजे सन १९७६ साली विश्व सामाचारची सुरुवात केली बाबुरावांचे समाचारचे सहकारी प्रभाकर नूलकर हे विश्वसमाचारचे कार्यकारी संपादक होते सोलापूर समाचार हे सोलापूरातील पत्र व्यवसायाची शिक्षण शाळाच होती आणि याच शाळेत रंगा वैद्य (रंगनाथ माधव ) ,वसंत एकबोटे ,डी एस कुलकर्णी ,बुवा इत्यादींनी आपल्या पत्र व्यवसायाचा श्री गणेशा सोलापूर समाचार पत्रातच गिरविला याच वेळी सोलापूर समाचार मध्ये १९४९ ते १९६१ पर्यंत सहसंपादक म्हणून काम करणारे रंगा वैद्य (रंगनाथ माधव ) यांनी आणि अप्पासाहेब काडादी यांच्या पाठींब्याने आणि सहकार्याने तसेच सोलापूर समाचारचे व्यवस्थापक के आय गोगटे ,सोलापूरातील मुद्रण तंत्रज्ञ रमण गांधी यांच्या सहकार्याने संगम पेपर्स कार्पोरेशन ही संस्था रंगा वैद्य (रंगनाथ माधव ) यांनी स्थापन केली आणि १९६१ साली दैनिक संचारची सुरुवात केली पुढे १९६७ साली दैनिक संचार ने हायस्पीड रोटरी मशीन खरेदी केली अन् स्वताची इमारतही उभी केली .
करमाळा येथून सल्ला नावाचे साप्ताहिक शंकरराव येवले यांनी १९६९ साली सुरू केले त्याचा पहिला अंक २० ऑक्टोबर १९६९ रोजी प्रसिद्ध झाला त्या आधी स्वातंत्र्याच्या उंबरठ्यावर म्हणजे १ ओगस्ट १९४७ रोजी चक्रपाणी मनोहर कांबळे यांनी कर्मयोगी नावाचे साप्ताहिक सोलापूर येथून सुरू केले रामभाऊ राजवाडे यांच्या स्मरणार्थ हे साप्ताहिक सुरू करण्यात आले होते .
सोलापूरातील दीर्घ काल चालणारे आणि श्रीनिवास नारायण काकडे यांचे कल्पतरू आणि मनोविहार १० जानेवारी १८८८ रोजी सुरू झाले याच कालावधीत म्हणजे १९८५ साली बार्शी येथून प्रबोधनरत्न ,पंढरपुरातून १८८७ साली पांढरी भूषण ,सोलापूर शहरातून १८८८ साली सोलापूर वृत्त ,१८९२ साली व्यापारी सोलापूर ,१८९९ साली चिंतामणी ,१९०५ साली सहस्त्रकर ,१९०५ साली विद्या वैभव ,१९०९ साली शिवाजी विजय ,वारकरी ही पत्रके सोलापूर जिल्ह्यातून निघाली याच दरम्यान लोकमत आणि भांडारे यांचे लोकनिर्णय तसेच हरी नारायण रहाटकर यांचे दि ऑडिट हिशोब हे पत्रक निघत असे .
लोकमान्य टिळकांच्या केसरी ,मराठा तसच झहाल मतवादाने प्रेरित झालेले आणि पुण्यातून शिक्षण घेत असताना चाफेकर बंधूचे संपर्कात असलेले बळवंत शंकर लिमये यांनी १९०७ साली स्वराज्य हे पत्रक सुरू केले , पंढरपुरातून १ ऑगस्ट १९२२ पासून दतात्रय त्रिंबक आराध्ये यांनी राष्ट्रीय पक्षाचे साप्ताहिक म्हणून समर्थ हे साप्ताहिक सुरू केले १९२९ च्या सुमारास गजनफर नावाचे एम बी पठाण यांनी पत्रक सुरू केले ,विष्णू विठ्ठल लिमये यांनी वारकरी संप्रदाया करिता वारकरी हे पत्रक १९२९ साली सुरू केले तरच रा वांगी यांनी आंबनप्पा शहजाळे व व्य ग आंदूरकर यांनी विजय नावाचे दैनिक १९३० साली सोलापूरातून सुरू केले .
१९३३ साली कर्मयोगीची सरकारने जप्त केलेली छापखाना कल्याण शेट्टी यांनी विकत घेतला अन् सुदर्शन साप्ताहिक सुरू केले काही वर्षे दैनिक म्हणून ते पत्रक निघाले आणि ते साधरण पणे २१ वर्षे ते चालू होते , १९२९ च्या कायदे मंडळाच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून भाई बेके यांनी धनुर्धारी हे साप्ताहिक सुरू केले .
काँग्रेसच्या ध्येय धोरणाचा पुरस्कार करण्याच्या दृष्टीने ए के भोसले यांनी १९३६ साली जनसत्ता सुरू केले तर प रे कोसंदर यांनी १९३६ साली नमस्कार हे पत्रक सुरू केले , काँग्रेसचा प्रचार आणि प्रसार करण्याच्या दृष्टीने १९३७ साली तुळशीदास जाधव यांनी लोकसेवा हे पत्रक सुरू केले शंकरराव साळुंखे हे या पत्रकाचे कार्यकारी संपादक होते पुढे जाऊन १९४९ साली हे पत्रक शेकापचे मुखपत्र बनले .
सोलापूरचे कवी कवी कुंजविहारी यांनी १९२७ साली सांस्कृतिक विचार डोळ्यासमोर ठेवून सारथी आणि राजश्री ही पत्रके सुरू केली , १९३८ च्या सुमारास चंदा वांगी यांनी दिव्यशक्ती हे पत्रक सुरू केले तर कम्युनिस्ट विचांराचे गो द साने , कऱ्हाडकर ,भाई छ्नुसिंह चंदेले यांनी कामगारांच्या प्रश्नाला वाचा फोडण्यासाठी १९३५ साली एकजूट हे पत्र सुरू केले ,१९३८ साली बार्शी येथून वीरशैव गर्जना तर काझी यांनी सोलापूरातून अनसार व तुफान ही पत्र १९३९ साली सुरू केली तर पंढरपुरातून १९४० साली भागवत धर्म ही धार्मिक पत्रही निघाले . कर्मयोगी वृत्तपत्र १९३० सालच्या सोलापूरातील मार्शल लोच्या काळात विशेष कामगिरी धडाडीने बजावणारे पत्र कर्मयोगी या सोलापूरच्या साप्ताहिकाची विशेष दखल घेणे जरूर आहे या पत्राला सतत ब्रिटिश सरकारशी सामना देतच मार्ग काढावा लागला शेवटी हे पत्र सरकारी रोष आलाच बळी पडले स्वातंत्र्यपूर्व काळात वृत्तपत्रांना सरकारी बडग याच्या काळात कसा सतत सहन करावा लागत असे त्याचे एक ज्वलंत उदाहरण म्हणजे सोलापूरचा कर्मयोगी या पत्राचे संपादक रामचंद्र शंकर राजवाडे यांच्यामुळे त्या पत्राची कारकीर्द विशेष गाजली.
' कर्मयोगी' पत्र सुरू करावयाला विशेष चालना मिळाली ती १९२० साली न चि केळकर यांच्या अध्यक्षतेखाली सोलापूर येथे झालेल्या विसाव्या प्रांतिक परिषदेमुळे त्या परिषदेला लोकमान्य टिळक उपस्थित होते ब्राह्मणेतर व मवाळ यांनी सहकार्य करून परिषद उधळून लावण्याचा प्रयत्न केला होता परिषद यशस्वी करण्याकरिता शेठ गुलाबचंद हिराचंद भाऊसाहेब खडकिकर देगावकर वकील गोविंद देव डॉ. गोगटे रामचंद्र शंकर राजवाडे गाडगे वकील इत्यादी मंडळी झटली होती परिषदेच्या संघटनेतूनच राष्ट्रीय विचार प्रसारक मंडळाची स्थापना करण्यात आली स्वातंत्र्य चळवळीचे कार्य करण्याच्या उद्देशाने अस्तित्वात आलेल्या या संस्थेच्या कार्याच्या प्रचारासाठी स्वतःचे ऐक वर्तमानपत्र असावे अशी कल्पना पुढे येऊन वृत्तपत्र काढण्याचा विचार हे निश्चित झाला या उपक्रमाचा एक भाग म्हणून रामभाऊ राजवाडे यांना संपादकीय कामाची माहिती घेण्यासाठी काही दिवस पुण्यात केसरी कार्यालयात पाठविण्यात आले होते पत्र काढण्याचा असा योजनापूर्वक प्रयत्न झाला होता.[ संदर्भ हवा ] रामभाऊ राजवाडे यांनी संपादकीय कामाची पुण्यात जाऊन माहिती घेतली असली तरी कर्मयोगी पत्राचे पहिले संपादक प्र बा बर्वे वकील हे होते पत्राचा पहिला अंक २६ नोव्हेंबर १९२४ रोजी प्रसिद्ध झाला लोकल बोर्ड नगरपालिका व राजकीय प्रश्न हे त्या वेळचे विशेष महत्त्वाचे चर्चा विषय असत १९२५ झाली कार्तिकी रथ मिरवणुकीच्या वेळी सोलापूरात जातीय दंगल झाली यामुळे कर्मयोगी पत्राला एका बाजूला सरकारी रोप व दुसऱ्या बाजूला जातीय भावना यातून मार्ग काढावा लागला पण हिंदूंच्या संघटनेच्या दृष्टीने कर्मयोगी ने निर्भयतेने कार्य केले कर्मयोगी काढण्यात पुढाकार घेणारी सारी मंडळी राष्ट्रीय वृत्तीची व टिळक केळकर पंतांची होती यामुळे कर्मयोगी पत्राने तोच बाणा कायम राखला पत्राची जबाबदारी पुढे रामभाऊ राजवाडे यांच्याकडे देण्यात आली ज्या ज्या देशाभिमान अन्यायाची चीड व निर्भिड विचार ही कर्मयोगी पत्राची वैशिष्ट्ये होती यामुळे लवकरच त्याचा सर्वत्र प्रसार होऊन सरकार दरबारीही त्याची जरब निर्माण झाली. कायदेभंगाची चळवळ १९३० झाली सुरू झाल्यावर पाच मे रोजी गांधीजींना अटक झाल्याचा निषेध म्हणून सोलापूरात सभा मिरवणुका इत्यादी मार्गांनी लोकांनी आपल्या भावना व्यक्त केल्या तसेच शिंदेंची झाडे तोडून लोकांनी कायदे भंगही केला त्यातून दंगल उसळून पोलिसांनी गोळीबार केल्या व त्यात शंकर शिवदारे नावाचा इसम मारला गेला अनेक लोक ही जखमी झाले यामुळे लोक प्रक्षुब्ध होऊन त्यांनी चाटी गल्ली पोलीस चौकीवर हल्ला केला व जुने कोर्ट जाळले यानंतर पोलीस अधिकाऱ्यांनी मोटारीतून शहरभर गोळीबार केला व त्यात अनेक निरपराधी माणसे मारली गेली पोलिसांच्या या अत्याचाराची चीड येऊन कर्मयोगीचे संपादक रामभाऊ राजवाडे यांनी दोन दिवस अहोरात्र परिश्रम करून माहिती मिळवली व ती सर्व नावाने शिवार कर्मयोगीचा ज्यादा अंक काढून त्यात प्रसिद्ध केली सरकारच्या अन्याय आणि अत्याचारी वागणूकचे दर्शन कर्मयोगिनी लोकांना घडविले अंकाच्या अक्षरशा हजारो प्रति खपल्या राजवाडे यांनी ऐनवेळी धैर्य दाखवून सरकारी अन्याय सविस्तर पुराव्यास पुढे मांडला लोकांची बाजूही मांडण्यात आली होती ते एक धाडसच होते राजवाडे व कर्मयोगी या दोघांनाही त्यांची जबरदस्त जव झळ लागण्याचा संभव होता कसोटी पाहणारा तो प्रसंग होता पण लोकांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या पत्राला कर्तव्य टाळता येऊ शकत नाही पोलिसी अत्याचाराला वाचा फोडण्याची गरज निसंशय होती कर्मयोगीने आपले कर्तव्य केले अनेक वृत्तपत्रांनी कर्मयोगी वरून पोलिसी अत्याचाराची माहिती प्रसिद्ध करून सरकार पुढे एक आव्हान उभे केले यामुळे चिडून जाऊन सरकारी अधिकाऱ्यांनी मार्शल लो पुकारण्यास वरिष्ठांना भाग पडले राजवाडे यांना अटक होऊन लष्करी कोर्टापुढे त्यांना उभे करण्यात आले सात वर्षे सक्तमजुरी व १०००० रुपये दंड अशी कडक शिक्षा त्यांना ठोठावण्यात आली राजवाडे यांना पकडल्यानंतर कर्मयोगी पत्र ५-६ महिने बंद राहिले १९३० च्या नोव्हेंबरमध्ये डॉ जगदेवराव देशमुख यांच्या संपादकत्वाखाली पत्रा काही दिवस देण्याचाही प्रयत्न झाला लष्करी कायद्याच्या काळात कर्मयोगी काही दिवस दैनिक स्वरूपातही निघत असे. पुढे गांधी अर्विन समेट होऊन सर्व राज बंद्यांची सुटका झाली राजवाडे यांचीही बिनशर्त सुटका झाली सुटून आल्यावर राजवाडे यांनी पत्राची सूत्रे पुन्हा आपल्या हाती घेतली पण कर्मयोगी सरकारच्या डोळ्यात सतत खूपच असल्याने काहीतरी कारण काढून पत्राला अडचणीत टाकण्याचा अधिकार यांचा प्रयत्न असे १९३१ च्या जूनमध्ये कर्मयोगी कडे सहा हजारांच्या जामीन मागण्यात आला चालक जा मीना बाबत विचार करीत असतानाच काँग्रेसची तडजोड झाल्याने जामीन कीचे गंडांतर टळले. कर्मयोगी पत्र संपादन व व्यवस्थापन या दोन्ही दृष्टीने सुरळीत चालू लागले होते एक आदर्श जिल्हा साप्ताहिक असे स्वरूप या पत्राला प्राप्त झाले होते संपादक राजवाडे यांच्या जोडीला बाही बिके गो वा पाध्ये इत्यादी मंडळी काम करीत होते व्यवस्थापन पंडित व इतर मंडळींकडे होते छापखाना व पत्रे एकमेकांना पूरक ठरत होती पण पुढे लवकरच पत्रावर प्राणांतिक आपत्ती कोसळली.[ संदर्भ हवा ]पंढरपूर]] हे महाराष्ट्राचे कुलदैवत सोलापूरजवळ असून अक्कलकोटचे प्रसिद्ध स्वामी समर्थ मंदिर सोलापूर जिल्ह्यात आहे. बार्शी येथे भगवंताचे म्हणून ओळखले जाणारे विष्णूचे प्राचीन मंदिर आहे येथील शिवगंगा मातेच्या मंदिराचा कळस शंभर तोळे सोन्यापासून बनलेला आहे, आणि दरवाजा ऐंशी किलो चांदीपासून बनलेला आहे. सोलापूर येथील भुईकोट किल्ला, सिद्धेश्वर मंदिर, मल्लिकार्जुन मंदिर, हुतात्मा बाग, इंद्रभुवन (महानगर पालिका इमारत), शुभराय आर्ट गॅलरी, स्मृती उद्यान ही भेट देण्यासारखी ठिकाणे आहेत. हुतात्मा स्मृती मंदिर येथे अनेक कला प्रदर्शन आणि नाट्यप्रयोग मोठ्या प्रमाणात होत असतात. सोलापूरमध्ये दरवर्षी सिद्धेश्वर यात्रा म्हणजेच" गड्डा " ही मोठी यात्रा असते. कर्नाटक परिसरातून लोक येतात. सरकारच्या स्मार्ट सिटींमध्ये सोलापूरचे नाव यादीत समाविष्ट झाल्याने आता सोलापूरही स्मार्ट शहर बनण्याकडे वाटचाल करताना दिसते आहे.
शिक्षण
आज सोलापूर शहर शैक्षणिकदृष्ट्या एक उत्तम केंद्र बनू पाहत आहे. एक जिल्हा-एक विद्यापीठ या योजनेतील विद्यापीठ सोलापूर येथे निर्माण करण्यात आले आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाची स्थापना ऑगस्ट, २००४ मध्ये झाली. या अंतर्गत आज जिल्ह्यात एकूण ६१ विविध प्रकारची महाविद्यालये आहेत. त्यांपैकी सुमारे ३५ महाविद्यालये सोलापूर शहरात आहेत. शहरात वैद्यकीय, अभियांत्रिकी, कला व शास्त्र, व्यवस्थापन, विधी, समाजसेवा, उद्यानविद्या, स्थापत्यशास्त्र, शिक्षणशास्त्र, व वस्त्रविद्या - अशा सर्व शाखांमधील शिक्षण उपलब्ध आहे. संपूर्ण सोलापूर जिल्ह्यातून, तसेच मराठवाड्यातील बीड, उस्मानाबाद या भागांतून आणि कर्नाटकातील बिदर, गुलबर्गा व विजापूर या जिल्ह्यांतून शिक्षणासाठी विद्यार्थी सोलापूरला येत असतात.[ संदर्भ हवा ]
दयानंद शिक्षण संस्था, सोलापूर या संस्थेची स्थापना १७ जून १९४० रोजी झाली. दयानंद अँग्लो-वैदिक कॉलेज ट्रस्ट आणि व्यवस्थापन सोसायटी, न्यू दिल्ली हे सदर संस्था चालवितात. दयानंद शिक्षण संस्थेची एकूण 65 एकर जागा असून या जागेमध्ये कला व शास्त्र महाविद्यालय वाणिज्य महाविद्यालय विधी महाविद्यालय आणि शिक्षण शास्त्र महाविद्यालय ही चार महाविद्यालय आहेत.
वैद्यकीय सेवा
छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय (शासकीय) असून तसेच सोलापूर महानगरपालिकेचे पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर प्रसूती गृह, जिजामाता प्रसूती गृह असे विविध हॉस्पिटलच्या माध्यमातून सोलापूर मध्ये वैद्यकीय सेवा नागरिकांना मिळते.
खेळ
दिवंगत क्रिकेट खेळाडू पॉली उम्रीगर यांच्या कारकिर्दीची सुरुवात सोलापूरात झाली पुढे ते राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकले. नुकतीच (२००८ मध्ये) कु. अनघा देशपांडे हिची भारतीय महिला क्रिकेट संघात निवड झाली आहे. कु. अनघाने नुकत्याच झालेल्या आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत चमकदार कामगिरी केली आहे. तसेच येथे आजकल एक नाही अनेक प्रकारचे खेळ खेळले जातात.
प्रसिद्ध व्यक्ती
- डॉ. द्वारकानाथ कोटणीस- १९३८ मध्ये सैन्याबरोबर चीनला पाठवलेले डाॅक्टर. (दुसरे सिनो - जपानी युद्ध)
- सुशीलकुमार शिंदे
- विजयसिंह मोहिते पाटील
- नागराज मंजुळे (दिग्दर्शक)
- रिंकु राजगुरू (अभिनेत्री)
- शंकरराव येवले, करमाळा (स्वातंत्र्यसैनिक, ज्येष्ठ पत्रकार)
पर्यटन स्थळे
- भुईकोट किल्ला-,सोलापूर शहर
- सिद्धेश्वर मंदिर,-सोलापूर शहर
- डॉ. द्वारकानाथ कोटणीस यांचे स्मारक
- धर्मवीर संभाजी (कंबर) तलाव-,सोलापूर शहर[२]
- प्रेरणा भुमी-,सोलापूर
- स्मृती वन- सोलापूर
- सिद्धेश्वर वनविहार- सोलापूर
- संत दामाजी मंदिर-,मंगळवेढा
- हत्तरसंग कुडल- ,ता.दक्षिण सोलापूर.
- स्वामी समर्थ मंदिर-,अक्कलकोट
- श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर-,पंढरपूर
- सयाजीराजे पार्क,शिवसृष्टी-अकलूज
- अर्धनारी नटेश्वर मंदिर - वेळापूर,अकलूज
- होळकर वाडा - पंढरपूर
- शिंदे वाडा - पंढरपूर
- इंद्र भवन सोलापूर महानगरपालिकेची इमारत
- हत्तरसंग कुडल तालुका दक्षिण सोलापूर
- कैकाडी महाराज मठ पंढरपूर
- नागनाथ मंदिर वडवळ
- संत सावतामाळी समाधी मंदिर अरण तालुका माढा
- कमलाभवानी मंदिर, करमाळा
हे सुद्धा पहा
संदर्भ
- ^ a b ऐतिहासिक महत्त्व सोलापूर ,www.solapur.gov.in
- ^ सोनवणे, विजयकुमार (४ डिसेंबर २०१९). "कालकुपी:कंबर तलाव". सकाळ. 2019-12-20 रोजी मूळ पान पासून संग्रहित. २० डिसेंबर २१०९ रोजी पाहिले.
|access-date=
मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)