Jump to content

सोमाटणे

  ?सोमाटणे

महाराष्ट्र • भारत
—  गाव  —
Map

१८° ४१′ ४२.२१″ N, ७३° ४०′ ५५.८१″ E

प्रमाणवेळभाप्रवे (यूटीसी+५:३०)
जवळचे शहरमावळ
जिल्हापुणे जिल्हा
भाषामराठी
सरपंच
बोलीभाषा
कोड
• आरटीओ कोड

• एमएच/

सोमाटणे हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील एक गाव आहे. या गावात मुऱ्हे हे आडनावे असलेली मराठा घराणी मोठ्या संख्येनीं आहेत. गावची ग्रामदेवता चौराई देवीचं डोंगरावर रेखीव आणी आकर्षक असे मंदिर आहे.सोमाटणे आणी तळेगाव दाभाडे खिंड ही ऐतिहासिक वारसा लाभलेली खिंड आहे .या खिंडीपर्यंत पहिली मराठा इंग्रज लढाई झाली असे बोलले जाते. या खिंडीत नवसाला पावणाऱ्या मारुतीचे मंदिर आहे.आणी या मारुतीला विजय मारुती असे संबोधले जाते.मराठ्यांनी इंग्रजांविरुध् या लढाईत विजय मिळवल्यामुळे या मारुतीला विजय मारुती म्हणले जाऊ लागले अशी अख्यायिका आहे.तसेच सोमाटणे या गावात पवना नदी वाहते.त्यामुळे गावाला १२महिने पाणी कमतरता भासत नाही.सोमाटणे हे गाव पवन मावळ मध्ये मोडते. सोमाटणे गावठाणात श्री चौराई देवीचे मंदिर आहे.व मुख्य मंदिर तळेगाव सोमाटणे डोंगर रांगेवर आहे.गावाच्या पूर्वेला टेकडीवर गणपती बाप्पाची मोठी मूर्ती विराजमान आहे.सोमाटणे गावची यात्रा दरवशी चैत्र लक्ष्मी पंचमीला असते. या यात्रेत शेकडो लोक सहभागी होतात.

भौगोलिक स्थान

हवामान

येथील सर्वसाधारण हवामान उष्ण व कोरडे आहे. हवामानातील बदलानुसार प्रत्येक वर्षात मुख्यतः तीन ऋतू असतात.मार्च ते मे पर्यंत उन्हाळा, जून ते ऑक्टोबर पर्यंत पावसाळा आणि नोव्हेंबर ते फेब्रुवारी पर्यंत हिवाळा असतो. हिवाळ्यात शीतल वातावरण असते. तालुक्यातील वार्षिक सरासरी पर्जन्यमान १,२५० मिमी पर्यंत असते.

लोकजीवन

प्रेक्षणीय स्थळे

नागरी सुविधा

जवळपासची गावे

संदर्भ

  1. https://villageinfo.in/
  2. https://www.census2011.co.in/
  3. http://tourism.gov.in/
  4. https://www.incredibleindia.org/
  5. https://www.india.gov.in/topics/travel-tourism
  6. https://www.mapsofindia.com/
  7. https://www.weather.gov/dvn/climategraphics?n=climategraphics
  8. https://www.weather-atlas.com/en/india-climate