सोमयाचे कारंजे
सोमयाचे कारंजे या नावाने प्रसिद्ध असलेले एक गाव पुणे जिल्ह्यातल्या बारामती तालुक्यात आहे. येथील शंकराच्या देवळात दर श्रावण सोमवारी शंकराच्या पिंडीऐवजी प्रत्यक्ष जिवंत नागाची पूजा बांधली जाते. या आगळ्या वैशिष्ट्यामुळे हे मंदिर शंकरभक्तांमध्ये विशेष प्रसिद्ध आहे.
अधिक माहिती
श्री क्षेत्र सोमेश्वर,कारंजे Archived 2020-08-03 at the Wayback Machine.
परिसराचे नाव : कारंजे
तालुक्याचे नाव : बारामती
जिल्हा : पुणे
राज्य : महाराष्ट्र
प्रदेश : पश्चिम महाराष्ट्र
जिल्हा : पुणे
समुद्र सपाटीपासून ५५० मीटर
दूरध्वनी Subscriber trunk dialling Code क्रमांक ९१/०/ २११२
विधानसभा मतदारसंघ : बारामती विधानसभा मतदार संघ
विधानसभेचे आमदार : अजित अनंतराव पावर
लोकसभा मतदारसंघ : बारामती लोकसभा मतदारसंघ
खासदार : सुप्रिया सुळे
पिन कोड : ४१२३०६
पोस्ट ऑफिसचे नाव : सोमेश्वरनगर
कारंजे हे बारामती तालुक्यामधले एक छोटेसे गाव. हे मंदिर बारामती तालुक्यातल्या सोमेश्वरनगर साखर कारखान्यापासून तीन मैलांवर आहे. हे पुणे जिल्हा मुख्यालयापासून पूर्वेकडे ९३ कि.मी. अंतरावर आहे. राज्याची राजधानी मुंबई येथून २३२ कि.मी.अंतरावर आहे
कारंजे गावाच्या दक्षिणेकडे फलटण तालुका, उत्तरेकडे दौंड तालुका, पूर्वेकडे इंदापूर तालुका, पश्चिमेस पुरंदर तालुका आहे.
बारामती, फलटण, दौंड, सासवड ही शहरे ते कारंजेजवळ आहेत.
करंजे गावाची स्थानिक भाषा मराठी आहे. कारंजे गावाची एकूण लोकसंख्या १४१६ आहे आणि घरांची संख्या ३२२. महिलांची लोकसंख्या ४९.९% आहे. गावाचा साक्षरता दर ५२.५% आणि महिला साक्षरता दर ७२.७% आहे. १ जानेवारी १९६९ रोजी दत्ता धर्माधिकारी दिग्दर्शित 'सतीचं वाण' हा मराठी चित्रपट आलानी संपूर्ण राज्यभर हे ठिकाण चर्चेत आले. पर्यटन क्षेत्राचा बी दर्जा मिळालेले हे तीर्थक्षेत्र विविध सुविधांनी युक्त झाले असून सुमारे साडेचार कोटी रुपयांची कामे झाली आहेत. भाविकांसाठी निवास व्यवस्था, मंगलकार्यालय, पूजा साहित्याचीसाठी प्रशस्त दुकाने अंतर्गत रस्ते, वाहनतळ वगैरे झाले आहेत. हेमाडपंती बांधकामाचा उत्कृष्ट नमुना असलेले हे द्वापरयुगातील मंदिर चिंचेच्या वनात समुद्रसपाटीपासून अठराशे फुट उंचीवर आहे
श्री सोमेश्वराचे ऐतिहासिक माहात्म्य (दंतकथा)
एके काळी करंजे नावाच्या गावी मालुबाई नावाची सासुरवाशीण घरी राहत होती. महादू गवळीच्या कुटुंबात राहत असलेली मालुबाई मूलबाळ नसल्याने सासू व नणंदेच्या जाचातूनही नित्यनियाने पूजाअर्चा करीत असे. एके दिवशी दारात आलेल्या साधूने तिला शिवोपासनेचा मंत्र दिला. त्यानंतर दिवसभराच्या कामातून वेळ नसल्याने ती रात्री बारानंतर वालुकामय लिंग बनवून महादेवाची पूजा करू लागली. बारा वर्षानंतर शंकर भगवान तिला प्रसन्न झाले व तू सौराष्ट्रात येऊन पूजा कर असे तिला स्वप्नात सांगितले. मात्र मी संसारी स्त्री आहे, मला ते शक्य होणार नाही असे सांगितल्याने सौराष्ट्रातील महादेवांनी तिला मध्यरात्री सौराष्ट्रात येण्यास विमान पाठिवले. दररोज मध्यरात्री ती सौराष्ट्रात जाऊन पूजा करून परत येऊ लागली.
मात्र एके दिवशी तिच्या पतीला तिच्या शीलाचाच संशय आला त्याने तिला पाठलाग केला व विमानाला पकडून ती कोठे जाते हे पाहण्यासाठी तो सौराष्ट्रात गेला. तिच्यासाठी मंदिराचे दरवाजे उघडले गेले. गावात महादू गायब झाल्याची चर्चा सुरू झाली व मालूनेच त्याला गायब केले असा आळ तिच्यावर घेतला गेला. मग महादेवांनी तिच्या स्वनात जाऊन तू सौराष्ट्रात येण्याची गरज नाही मी तुला सर्परूपाने गायीच्या कासेला पिताना दिसेन त्यावेळी तू माझे दर्शन कर असे सांगितले. मात्र मालू हे स्वप्न विसरली. मात्र खोमणे आडनावाच्या गुराख्याला सर्प दिसला व त्याने कुऱ्हाडीचा घाव घातला. मालूच्या हे लक्षात आले. तिने महादेवाची माफी मागितली. त्यानंतर महादेवांनी मी लिंगरूपात प्रकट होईल असे स्वप्नात सांगितले, इकडे महादू गवळी परत न आलयाने मालूला जाळण्याची तयारी झाली. मात्र तिने आपले स्वप्न सांगून अखेरची इच्छा म्हणून त्या ठिकाणी खोदण्यास सुरुवात केली तर तिथे पाण्याची धार लागली व वालुकामय लिंगही सापडले दरम्यान महादू गवळी पण परत आला व ती सौराष्ट्रात पूजा करणेस गेली होती याची प्रचिती झाली. मालू त्याच ठिकाणी गुप्त झाली. म्हणून मंदिरात जाताना प्रथम मालुबाईचे दर्शन घेतले जाते. तसेच जिथे पाण्याची धार निघाली ती विहीर तीर्थाची विहीर म्हणून समजली जाते आजही तेथे खरे खोटेची शपथ घेतली जाते व खोटे बोलण्याऱ्याला चाणाक्ष (?) दिला जातो. तर दर श्रावणात तिसऱ्या सोमवारी निघणाऱ्या पालखीमध्ये कुऱ्हाडीचा वार करण्याऱ्या खोमण्याला पहिले सोमनाथाचे दर्शन झाले म्हणून खोमणे आडनावाच्या गुराख्याला दर्शनाचा मान पहिला दिला जातो. दर महाशिवरात्रीला व श्रावण महिन्यात तेथे मोठी यात्रा भरते. श्रावण महिन्यात येथे सर्परूपी महादेव भाविकांना दर्शन देतात.
इथले मंदिर इतर मंदिरासारखे साधेच दिसत असले तरी स्वतःचे वैशिष्ट्य जपून आहे. श्रावण महिना हा इतरांसारखाच इथेही महत्त्वाचा. प्रत्येक सोमवारी मंदिरात मोठी यात्रा भरते. बेल, सुंगधी फुले, हार, नारळ यांची रेलचेल असते. मंदिरात प्रवेश केल्यावर मात्र आपण क्षणभर दचकतो. कारण पिंडीऐवजी इथे एक जिवंत नागराज आरामात पहुडलेले दिसतात आणि सर्वांच्या पूजा आनंदाने स्वीकारत असतात. या नागाला स्थानिक लोक 'स्वारी येणे' असे म्हणतात. सौराष्ट्रातल्या सोरटी सोमनाथ येथून प्रत्यक्ष महादेवच नागाच्या रूपात इथे येतो असे मानले जाते. या नागाच्या डोक्यावर कुऱ्हाडीने घाव घातल्याची खूण आहे. तशीच खूप मंदिरात असलेल्या बाजूच्या शाळुंकेच्या डोक्यावरही आहे.
या नागाचे आणखी एक वैशिष्ट्य सांगितले जाते, ते म्हणजे प्रत्येक वेळी नागाचा रंग, आकार, अवतरण्याची वेळ ही वेगवेगळी असते. या साऱ्यांवरून ज्येष्ठ मंडळींनी अनुभवाने हवामान, पाऊस, रोगराई व शेती उत्पादनाबाबतचे अंदाज बांधले आहेत. या नागाच्या रंगावरून ते वर्ष कसे असेल याबाबतची चर्चा मंदिर परिसरात नेहमीच झडताना दिसतात.
दिवसभर या मंदिरात नागाची पूजा चालते. त्यानंतर गावातच वाफ्याची आळी म्हणून प्रसिद्ध असलेल्या मंदिरात त्याला सोडून देतात. दर श्रावण सोमवारी अशाप्रकारे नाग येत असल्यामुळे भाविकांना प्रत्यक्ष शंकराचे दर्शन होते.
करंजे गावाला कसे पोहोचायचे?
रेल्वेने
बारामती हे रेल्वे स्थानक करंजेपासून अगदी जवळचे रेल्वे स्थानक आहे. बारामती जवळचे काटफळ रेल्वे स्थानकही करंजे गावाला जवळचे आहे.
रस्त्याने
निरा, मोरगाव, मुरटी आणि बारामती या ठिकाणाहून कारंजे या गावाला जाण्यासाठी बसेसची व्यवस्था आहे.