Jump to content

सोनमुशी

सोनमुशी या माशाच्या प्रकाराचा समावेश काँड्रिक्थीज (Chondrichthyes उपास्थिमीन) वर्गाच्या सेलेची उपवर्गातील कॅरकॅनिडी कुलात होतो. त्याचे शास्त्रीय नाव स्कॉलिडान सॉरकोव्ह किंवा कॅरकॅरिअस लॅटिकॉडस आहे. तो भारत, श्रीलंका, फिलिपीन्स व वेस्ट इंडीज येथील समुद्रांत आढळतो. त्यास मुशी, यलो डॉग शार्क व ब्लॅक शार्क अशी सर्वसामान्य नावे आहेत. त्याच्या शरीराची लांबी ६० सेंमी. असते.तो मांसाहारी असून लहान मासे, खेकडे व इतर कवचधारी प्राणी हे त्याचे अन्न आहे. तो खादाड असून घ्राणेंद्रियामुळे त्याला लांब अंतरावरून भक्ष्याची चाहूल लागते. त्याची शरीरचना शार्क माशाप्रमाणे असते.

नर व मादी वेगवेगळे असून त्यांच्या शरीराची लांबी ३८-४६ सेंमी. झाल्यावर ते जननक्षम होतात. ते जरायुज असून नर मादीचे मिलन पाण्यात होते. अंड्यांचे निषेचन मादीच्या शरीरात होते. मादी पिलांना जन्म देते. या माशाचा उपयोग खाद्य म्हणून करतात. तसेच त्याच्या यकृतापासून तेल काढतात.

संदर्भ

[]

  1. ^ http://mr.vikaspedia.in/rural-energy/environment/91c94893593593f93593f92792493e-92e93e938947/93894b92892e941936940