Jump to content

सैकान बोगदा

सैकान बोगद्याचा मार्ग

सैकान बोगदा किंवा सैकान भुयार (जपानी: 青函トンネル) हे जपान देशाच्या होन्शूहोक्काइदो ह्या दोन बेटांना जोडणारे एक समुद्राखालील रेल्वे भुयार आहे. ५३.८५ किमी लांबीच्या ह्या भुयाराचा २३.३ किमी लांबीचा पट्टा सुगारू सामुद्रधुनीखालून जातो.

एकूण ५३८.४ अब्ज येन खर्च करून बांधल्या गेलेल्या व १३ मार्च १९८८ रोजी खुल्या करण्यात आलेल्या ह्या बोगद्यामुळे जपानच्या ओमोरी प्रभागापासून होक्काइदो बेटापर्यंत थेट रेल्वे वाहतूक शक्य झाली आहे. सध्याच्या घडीला सैकान हा जगातील सर्वात लांब व सर्वात खोल रेल्वे बोगदा आहे. स्वित्झर्लंडमधील गॉट्टहार्ड बेस रेल्वे बोगदा २०१७ मध्ये वाहतूकीस खुला झाल्यानंतर सर्वाधिक लांबीचा मान त्याला मिळेल. सैकान बोगदा समुद्राखालील सर्वात लांब बोगदा असला तरीही फ्रान्स व ब्रिटनला जोडणाऱ्या चॅनल टनेलच्या पाण्याखालील पट्ट्याची लांबी (३७.९ किमी) सैकानपेक्षा जास्त आहे.