सेवाग्राम जंक्शन रेल्वे स्थानक
सेवाग्राम जंक्शन मध्य रेल्वे स्थानक | |
---|---|
स्थानक तपशील | |
पत्ता | सेवाग्राम, वर्धा जिल्हा |
गुणक | 20°44′21.7″N 78°37′05.9″E / 20.739361°N 78.618306°E |
समुद्रसपाटीपासूनची उंची | २७९ मी |
फलाट | ५ |
इतर माहिती | |
विद्युतीकरण | होय |
संकेत | SEGM |
मालकी | रेल्वे मंत्रालय, भारतीय रेल्वे |
विभाग | नागपूर विभाग, मध्य रेल्वे |
स्थान | |
सेवाग्राम जंक्शन |
सेवाग्राम जंक्शन हे भारत देशाच्या वर्धा जिल्ह्यामधील एक मुख्य रेल्वे स्थानक आहे. भारतीय रेल्वेचा पूर्व-पश्चिम धावणारा हावडा−नागपूर−मुंबई रेल्वेमार्ग या स्थानकावरून जातो. हे स्थानक वर्धा स्थानकापासून फक्त ३ किमी अंतरावर आहे. सेवाग्राम रेल्वे स्थानक हे दिल्ली-चेन्नई रेल्वेमार्गावरही आहे. येथून रेल्वेचा एक फाटा मुंबईकडे जातो तर एक चेन्नईकडे. येथे ८२ गाड्या थांबतात. येथून कोणत्याही गाड्या सुरू होत नाहीत अथवा येथे समाप्त होत नाहीत.[१]
महात्मा गांधींचा सेवाग्राम आश्रम येथून जवळच स्थित आहे.
सेवाग्रामवरून जाणाऱ्या महत्त्वाच्या गाड्या
मुंबईकडे
- पुणे नागपूर गरीब रथ एक्सप्रेस
- गोंदिया-कोल्हापूर महाराष्ट्र एक्सप्रेस
- मुंबई-नागपूर सेवाग्राम एक्सप्रेस
- गोंदिया-छत्रपती शिवाजी टर्मिनस विदर्भ एक्सप्रेस
- पुणे-हावडा आझाद हिंद एक्सप्रेस
- मुंबई-हावडा गीतांजली एक्सप्रेस
- लोकमान्य टिळक टर्मिनस-हावडा समरसता एक्सप्रेस
- अहमदाबाद-चेन्नई नवजीवन एक्सप्रेस
- मुंबई-नागपूर नंदीग्राम एक्सप्रेस
- केरळ एक्सप्रेस
- ग्रँड ट्रंक एक्सप्रेस
चेन्नईकडे
- अंदमान एक्सप्रेस
- चेन्नई सेंट्रल एक्सप्रेस
- नवयुग एक्सप्रेस एक्सप्रेस
- गोरखपूर यशवंतपूर एक्सप्रेस
- केरळ एक्सप्रेस
- नंदीग्राम एक्सप्रेस
- दक्षिण एक्सप्रेस
संदर्भ
- ^ M, Yash. "Sewagram Station - 82 Train Departures CR/Central Zone - Railway Enquiry". indiarailinfo.com. 2018-12-29 रोजी पाहिले.