Jump to content

सेवाग्राम

  ?सेवाग्राम

महाराष्ट्र • भारत
—  ग्राम पंचायत  —
Map

२०° ४४′ ०५.९७″ N, ७८° ३९′ ४५.२५″ E

प्रमाणवेळभाप्रवे (यूटीसी+५:३०)
जवळचे शहरवर्धा
भाषामराठी
संसदीय मतदारसंघवर्धा
ग्राम पंचायतसेवाग्राम
कोड
पिन कोड
दूरध्वनी
• आरटीओ कोड

• ४४२१०२
• +०७१५२
• MH-३२

सेवाग्राम हे महाराष्ट्रातील वर्धा जिल्ह्यातील गाव आहे.

येथे महात्मा गांधी यांचा सेवाग्राम आश्रम आहे. आहे. ३०० एकर जमिनीवर हा आश्रम वसलेला आहे. सेवाग्राममध्ये अनेक प्रकारच्या झोपड्या आहेत. त्यात स्वतः गांधी व त्यांचे सहकारी वास्तव्य करीत होते. त्यात गांधींची त्या काळातील जीवनशैली दिसून येते. तेथे असणारी बापू कुटी आणि बा कुटी प्रसिद्ध आहेत. सेवाग्राम येथे देशातूनच नव्हे तर परदेशातूनही लोक भेट द्यायला येतात. सेवाग्रामचे पहिले नाव सेगाव होते, पण महात्मा गांधींनी ते बदलून सेवाग्राम असे केले.

येथून जवळ पवनारला विनोबा भावे यांचा आश्रम आहे. सेवाग्राम हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील वर्धा जिल्ह्यातील वर्धा तालुक्यातील एक गाव आहे.

भौगोलिक स्थान

हवामान

येथील हवामान वर्षभर कोरडे असते. उन्हाळ्यात अतिउष्ण असते.हिवाळा व उन्हाळा हे दोन्ही ऋतू तीव्र असतात. उन्हाळ्यात दिवसाच्या व रात्रीच्या तापमानात मोठा फरक असतो.मे हा अतिउष्णतेचा आणि जानेवारी हा कडाक्याच्या थंडीचा महिना असतो. वार्षिक सरासरी पर्जन्यमान १०५ सेंमी.पर्यंत असते.

लोकजीवन

प्रेक्षणीय स्थळे

नागरी सुविधा

==जवळपासची गावे== kaji karanji, bhoge karanji,Wardha,tuljapur

इतिहास

१९३० मध्ये 'मिठाचा सत्याग्रह' करण्यासाठी साबरमती आश्रमातून आपल्या साथीदारासोबत गांधींनी 'दांडी यात्रा' काढली होती. स्वातंत्र्य मिळविल्याशिवाय आश्रमात परतणार नाही, असा त्यांचा संकल्प होता. ब्रिटिश सरकारने मिठावर लादलेल्या कराविरुद्ध गांधीनी गुजरातच्या समुद्रकिनाऱ्यावर दांडी येथे मीठ तयार केले. या सत्याग्रहानंतर त्यांना अटक करून पुण्याच्या येरवडा येथील तुरुंगात ठेवण्यात आले.

१९३३ मध्ये तरूंगातून बाहेर आल्यानंतर गांधीजीनी देशव्यापी हरिजन यात्रा काढली. तोपर्यंत स्वातंत्र्य न मिळाल्याने गांधीजी साबरमती आश्रमामध्ये परतले नाहीत. १९३४ मध्ये जमनालाल बजाज तसेच त्यांच्या साथीदारांच्या आग्रहास्तव महाराष्ट्रातील वर्धा जिल्ह्यातील मगनवाडी येथे गांधींनी वास्तव्य केले. त्यांनतर दोन वर्षांनी १९३६ मध्ये गांधीजी पहिल्यांदा मगनवाडीहून सेगाव (सेवाग्राम) येथे आले व तेथेच त्यांनी राहण्याचा निर्णय घेतला. गांधीजी आणि कस्तुरबा यांचासाठी आश्रमामध्ये छोटे घर बांधले. व जातिभेद मोडण्यासाठी हरिजन समाजातील महिलांना स्वयंपाकासाठी ठेवले. गांधीजीनी सेवाग्राममध्ये असताना अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले.

सेवाग्राम आश्रमात महात्मा गांधींचे पहिले निवास आदी निवास

महात्मा गान्धि यान्नि पुर्विचे शेगाव् असलेल्या गावाचे नाव बदलवुन् सेवग्राम् आसे थेवले

भारत छोडो आंदोलनाची पहिली सभा

१९४२ मध्ये भारत छोडो आंदोलनची पहिली सभा सेवाग्राम आश्रमातच झाली होती.

गांधी चित्र प्रदर्शन

सेवाग्राम आश्रमाच्या पश्चिमेला मुख्य रस्त्याच्या पलीकेडे 'महात्मा गांधी चित्र प्रदर्शन' आहे. त्यात गांधींचा संपूर्ण जीवनपट चित्राच्या माध्यमातून दर्शविण्यात आला आहे.

हे सुद्धा पहा

  • सेवाग्राम रेल्वे स्थानक

संदर्भ

  1. http://marathi.webdunia.com/article/mahatma-gandhi-marathi/mahatma-gandhi-109100100032_1.html
  2. http://www.marathi-unlimited.in/2013/10/sevagram-wardha/
  3. https://divyamarathi.bhaskar.com/news/MAH-VID-NAG-sevagram-ashram-news-in-marathi-mahatma-gandhi-divya-marathi-4599783-NOR.html
  4. https://villageinfo.in/
  5. https://www.census2011.co.in/
  6. http://tourism.gov.in/
  7. https://www.incredibleindia.org/
  8. https://www.india.gov.in/topics/travel-tourism
  9. https://www.mapsofindia.com/