सेल्लप्पन रामनाथन
सेल्लप्पन रामनाथन (तमिळ: செல்லப்பன் ராமநாதன்; रोमन लिपी: Sellapan Ramanathan ;) (३ जुलै, इ.स. १९२४ - हयात), लघुनाम एस.आर. नाथन (रोमन लिपी: S. R. Nathan ;) हे तमिळवंशीय सिंगापुरी राजकारणी असून ते सिंगापूरचे ६वे राष्ट्राध्यक्ष होते. त्यांनी १ सप्टेंबर, इ.स. १९९९ रोजी राष्ट्राध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतली. इ.स. १९९९ व इ.स. २००५ सालांतील अध्यक्षीय निवडणुकींत ते बिनविरोध निवडून आले.
राष्ट्राध्यक्षपदावर आरूढ होण्याआधी नाथन यांनी सिंगापूरच्या नागरी सेवेत अनेक वर्षे काम केलीत. ते मलेशियामध्ये सिंगापूरचे उच्चायुक्त, तर अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांमध्ये राजदूत होते.
बाह्य दुवे
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत
- "अधिकॄत चरित्र" (इंग्लिश भाषेत). 2011-09-30 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2011-09-05 रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)