Jump to content

सेज (वनस्पती)

सेज, गार्डन सेज वा कॉमन सेज (शास्त्रीय नाव : Salvia officinalis) ही एक स्वयंपाकघरात वापरावयाची परदेशी औषधी वनस्पती आहे. मूळची भूमध्य समुद्राच्या आसपासच्या प्रदेशातली ही वनस्पती आता जगात अन्य देशांतही उगवली जाते. इंग्लिश तसेच इटालियन खाद्यपदार्थांमध्ये हिचा विपुल वापर होतो. सेजच्या पानांना विशिष्ट वास असतो, तसेच काहीशी तीक्ष्ण, तिखट चवही असते.

सेजच्या अनेक उपजाती असल्या तरी परंपरागत सेज वनस्पती जेमतेम दोन फूट उंचीची आणि तेवढीच पसरट असते. फुले लालसर फिकी जांभळी (लव्हेंडर रंगाची) असतात. पाने राखट हिरवी, अडीच इंच लांब आणि एखाद इंच रुद असतात. पाने वरच्या बाजूने किंचित खरखरीत आणि खालच्या बाजूने पांढरट असतात. सेजच्या कृत्रिम रीतीने पैदा केलेल्या अनेक आधुनिक जातींमध्ये या वनस्पतीची फुले पांढरी, गुलाबी किंवा जांभळी असू शकतात.

सेज आणि इतर परदेशी औषधी वनस्पतींसंबंधी ही जुनी कविता [१] प्रसिद्ध आहे. :-

Are you going to Scarborough Fair?
Parsley, sage, rosemary, and thyme;
Remember me to the one who lives there,
For once she was a true love of mine.
वगैरे.

औषधी उपयोग

  • सेजच्या पानांचा चहा पिण्याने सर्दी, घसादुखीव कसकस ही लक्षणे कमी होतात.
  • या चहाच्या गुळण्या करण्याने घसा लाल होणे, गिळताना त्रास होणे, घशात चिकटलेला असणे वगैरे आजार दूर होतात. सर्दी-खोकल्यामुळे डोके जड होऊन दुखते त्यावर सेजची पाने वाटून तयार केलेला लेप लावण्याचा उपयोग होतो.
  • सेजच्या पानाचा धूर धुपासारखा वापरता येतो. त्यामुळे हवा शुद्ध, सुगंधित होते.