सेंट्रल पार्क
सेंट्रल पार्क हे अमेरिकेच्या न्यू यॉर्क शहरातील एक प्रमुख उद्यान आहे. १८५९ साली उघडण्यात आलेले व मॅनहॅटन बेटावर १ वर्ग मैल क्षेत्रफळावर वसलेले हे उद्यान न्यू यॉर्क शहरातील प्रमुख पर्यटन स्थळांपैकी एक आहे. येथे दरवर्षी साधारण २.५ कोटी पर्यटक भेट देतात. सभोवताली गगनचुंबी इमारती असलेल्या या उद्यानात चार मोठी तळी आहेत.