सेंट्रल इंटेलिजन्स एजन्सी
सेंट्रल इंटेलिजन्स एजन्सी (सी.आय.ए.) (इंग्लिश: Central Intelligence Agency) ही अमेरिकन सरकारची आंतरराष्ट्रीय हेरगिरी करणारी गुप्तहेर संस्था आहे. इ.स. १९४७ साली स्थापन झालेल्या ह्या सरकारी संस्थेचे मुख्यालय व्हर्जिनिया राज्याच्या लँग्ली ह्या शहरामध्ये आहे. सी.आय.ए.चे जगभर सुमारे २०,००० कर्मचारी व हेर कार्यरत आहेत.