सॅम बहादुर (चित्रपट)
दिग्दर्शन | मेघना गुलजार |
---|---|
निर्मिती | रोनी स्क्रूवाला |
कथा | मेघना गुलजार, भवानी अय्यर आणि शंतनू श्रीवास्तव |
प्रमुख कलाकार | फातिमा सना शेख, सान्या मल्होत्रा, नीरज काबी, एडवर्ड सोनेनब्लिक, मोहम्मद झीशान अय्युब, विक्की कौशल |
देश | भारत |
भाषा | हिंदी |
प्रदर्शित | १ डिसेंबर २०२३ |
एकूण उत्पन्न | ₹ १२८.१७ कोटी |
सॅम बहादुर (SAMबहादुर म्हणून शैलीबद्ध) हा २०२३ मधील हिंदी चित्रपट आहे. हा एक चरित्रपट असून, भारताचे पहिले फील्ड मार्शल, सॅम माणेकशॉ यांच्या जीवनावर आधारित आहे.[१] या चित्रपटाचे मेघना गुलजार यांनी दिग्दर्शन केले असून, याच सोबत त्यांनी याचे सहलेखन भवानी अय्यर आणि शंतनू श्रीवास्तव यांच्यासोबत केले आहे. आरएसव्हीपी मुव्हीज च्या बॅनरखाली रॉनी स्क्रूवाला हे या चित्रपटाचे निर्माते आहेत.[२] यात फातिमा सना शेख, सान्या मल्होत्रा, नीरज काबी, एडवर्ड सोनेनब्लिक आणि मोहम्मद झीशान अय्युब यांच्यासोबत विक्की कौशल माणेकशॉच्या मुख्य भूमिकेत आहेत.[३]
हा चित्रपट १ डिसेंबर २०२३ रोजी प्रदर्शित झाला आणि अल्पावधीत त्याने जगभरातून १२८.१७ कोटी (US$२८.४५ दशलक्ष) कमावले. ६९ व्या फिल्मफेअर पुरस्कारांमध्ये, या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपट (समीक्षक), सर्वोत्कृष्ट अभिनेता आणि सर्वोत्कृष्ट अभिनेता (समीक्षक) (दोन्ही कौशल साठी) यासह आठ नामांकन मिळाले.
कथानक
१९३४ मध्ये, कॅडेट सॅम माणेकशॉ हे भारतीय सैनिकी अकादमी, डेहराडून येथे प्रशिक्षण घेतलेल्या कॅडेट्सच्या पहिल्या तुकड्यांपैकी एक आहेत; त्याच्या बॅचमेट्समध्ये टिक्का खान देखील आहे. अकादमीतून पदवी घेतल्यानंतर, माणेकशॉ १२ व्या फ्रंटियर फोर्स रेजिमेंट, फिरोजपूर येथे सेकंड लेफ्टनंट म्हणून नियुक्त झाले. या नियुक्तीनंतर माणेकशॉ आणि 'सिलू बोडे' यांची भेट झाली आणि या जोडप्याने लवकरच लग्न देखील केले. १९४२ मध्ये, दुसऱ्या महायुद्धादरम्यान, माणेकशॉ यांना मेजरच्या रँकवर पदोन्नती द्वारे बर्मा मोहिमेत भाग घेण्यासाठी रेजिमेंटसह पाठवले गेले. सितांग ब्रिजच्या युद्धादरम्यान, ते गंभीर जखमी होतात आणि या शौर्यासाठी त्यांना मिलिटरी क्रॉस देण्यात येते.
१९४७ मध्ये, ब्रिटिश भारतीय सैन्याच्या फाळणीदरम्यान, मेजर माणेकशॉ यांना त्यांचे सहकारी, याह्या खान यांनी पाकिस्तानी सैन्यात सामील होण्यासाठी संपर्क साधला. परंतु माणेकशॉ यांनी भारतीय लष्कराची निवड केली. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर काश्मीरच्या सार्वभौमत्वावरून दोन्ही देशांत मतभेद निर्माण झाले. ऑक्टोबर १९४७ मध्ये, पाकिस्तानने जम्मू आणि काश्मीर प्रदेश ताब्यात घेण्यासाठी आपली लष्करी मोहीम सुरू केली. याला प्रत्युत्तर म्हणून भारताचे पंतप्रधान जवाहरलाल नेहरू आणि गृहमंत्री वल्लभभाई पटेल यांनी माणेकशॉ आणि व्हीपी मेनन यांना काश्मीरला पाठवले. या मोहिमे दरम्यान काश्मीर भारतात विलीन झाले.
१९५९ मध्ये, माणेकशॉ हे मेजर जनरल पदावर जातात. माणेकशॉ आणि डिफेन्स सर्व्हिसेस स्टाफ कॉलेज, वेलिंग्टनचे कमांडंट, संरक्षण मंत्री व्ही.के. कृष्ण मेनन आणि चीफ ऑफ जनरल स्टाफ लेफ्टनंट जनरल ब्रिज मोहन कौल यांनी लष्करप्रमुखांबद्दल आपले मत मांडले. माणेकशॉ, याबद्दल राजकीय हस्तक्षेप म्हणून अर्थ लावत त्यांना फटकारतात. तथापि, कौल यांनी कोर्ट-मार्शल करून माणेकशॉची आगामी पदोन्नती थांबवण्याचा प्रयत्न केला. परंतु माणेकशॉ यांना त्यांच्या वरिष्ठांनी या प्रकरणातून दोषमुक्त केले.
१९६२ मध्ये, भारत-चीन युद्ध सुरू झाले, ज्यात चिनी सैन्याद्वारे भारताचा पराभव झाला. यामुळे कौल यांनी राजीनामा दिला. हा राजीनामा नाकारत नेहरूंनी मेनन यांना बडतर्फ केले. इंदिरा गांधींच्या सल्ल्यानुसार, नेहरूंनी माणेकशॉ यांना लेफ्टनंट-जनरल म्हणून बढती दिली आणि त्यांना IV कॉर्प्स, तेजपूरचे कमांडिंग ऑफिसर म्हणून नियुक्त केले. माणेकशॉ यांनी भारत-चीन युद्धावर एक प्रस्ताव मांडला, पण पराभवामुळे दुःखी झालेल्या नेहरूंनी नकार दिला. यावर इंदिरा माणेकशॉच्या बाजूने मध्यस्थी करतात. १९६३ पर्यंत, माणेकशॉ नॉर्थ-ईस्ट फ्रंटियर एजन्सीमध्ये त्यांचे सैन्य पुन्हा एकत्रित करतात. १९६४ मध्ये, नेहरूंचे निधन होते आणि माणेकशॉ यांना पूर्व कमांडचे जनरल कमांडिंग ऑफिसर म्हणून बढती देण्यात आली. त्यानंतर दोन वर्षांनी इंदिराजींची पंतप्रधानपदी नियुक्ती होते. १९६५ आणि १९६७ च्या दरम्यान, माणेकशॉ यांनी मिझो नॅशनल फ्रंट विरुद्ध बंडखोरी विरोधी ऑपरेशन पार पाडले, ज्यासाठी त्यांना पद्मभूषण पुरस्कार मिळाला.
१९६९ मध्ये, तत्कालीन पूर्व पाकिस्तानातील बंगाली लोकांमध्ये पश्चिम पाकिस्तान विरुद्ध असंतोष वाढला. याकाळात जनरल याह्या खान हे पाकिस्तानचे राष्ट्राध्यक्ष बनले. इकडे, माणेकशॉ यांची भारतीय लष्कराच्या पुढील सीओएएस म्हणून नियुक्ती करण्यात आली आणि त्यांना जनरल म्हणूनही बढती देण्यात आली. १९७० मध्ये, पूर्व पाकिस्तान-आधारित अवामी लीगने पाकिस्तानच्या सार्वत्रिक निवडणुकीत मोठा विजय मिळवला, तथापि याह्याने त्यांना सत्ता देण्यास नकार दिला, परिणामी संपूर्ण पाकिस्तानमध्ये सरकारविरोधी निदर्शने झाली. प्रत्युत्तरादाखल, याह्या खान ने तत्कालीन लेफ्टनंट-जनरल टिक्का खान, यांना ऑपरेशन सर्चलाइट सुरू करण्याचे आदेश दिले. टिक्का खानने निर्दयीपणे याची अंमबजावणी केली. परिस्थिती लक्षात घेऊन इंदिराजी युद्धाला तयार होतात, पण माणेकशॉ त्याला विरोध करतात, लष्कराच्या परिस्थितीजन्य समस्यांवर प्रकाश टाकतात आणि काही काळ प्रतीक्षा करण्यास सांगतात. अमेरिकेने इंदिराजींना युद्धाविरुद्ध चेतावणी दिली, पण त्या बाधत नाहीत. शेवटी सैन्याची जमवाजमव झाली आणि मुक्ती वाहिनीला प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली.
३ डिसेंबर १९७१ रोजी, पाकिस्तानने प्रथम सुरुवात करत भारतीय भूभागावर हल्ले केले. पाकिस्तानच्या पश्चिम आणि पूर्वेकडील सेक्टरमध्ये भारताने ताबडतोब प्रत्युत्तर दिले. ज्यामध्ये पाकिस्तानची जमीन, समुद्र आणि हवाई क्षेत्रांमध्ये मोठी जीवितहानी झाली. १६ डिसेंबरपर्यंत, पूर्वेकडील पाकिस्तानी सैन्याने ईस्टर्न कमांडला शरणागती पत्करली आणि या युद्धाचा शेवट झाला. या निष्कर्षामुळे इंदिराजींचा राजकीय विजय झाला तर याह्याने पराभवाच्या अपमानाने राजीनामा दिला. माणेकशॉ यांची सेवानिवृत्ती जवळ आल्याने, इंदिराजींनी त्यांच्या युद्धकाळातील नेतृत्वाची जाण म्हणून त्यांना फील्ड-मार्शल या पदावर बढती दिली. जानेवारी १९७३ मध्ये माणेकशॉ निवृत्त झाले.
कलाकार
भारतीय सैन्य
- विकी कौशल - फील्ड मार्शल सॅम माणेकशॉ यांच्या भूमिकेत,
- जियाना कपाडिया - छोट्या सॅमच्या भूमिकेत,
- बॉबी अरोरा - मेजर ओ.एस. कालकट यांच्या भूमिकेत,
- मोनुज बोरकोटोकी - आसाम रायफल्स मधील मेजरच्या भूमिकेत,
- कृष्णकांत सिंग बुंदेला - सुभेदार गुरबक्ष सिंगच्या भूमिकेत,
- धनवीर सिंग - लेफ्टनंट दिलशेर सिंगच्या भूमिकेत
- राजवीर अंकुर सिंग - लेफ्टनंट जनरल देपिंदर सिंगच्या भूमिकेत,
- उज्ज्वल चोप्रा - लेफ्टनंट जनरल ब्रिजमोहन कौलच्या भूमिकेत
- सुधीर सिंग . परमशिव प्रभाकर कुमारमंगलमच्या भूमिकेत.
- पुष्पदीप सिंग - ब्रिगेडियर कुलवंत सिंगच्या भूमिकेत,
- जसकरण सिंग गांधी - सिपाही मेहर सिंगच्या भूमिकेत,
माणेकशॉ यांचे कुटुंब
- सान्या मल्होत्रा - माणेकशॉच्या पत्नी सिल्लू माणेकशॉच्या भूमिकेत,
- राजीव कचरू - माणेकशॉचे वडील होर्मुसजी माणेकशॉच्या भूमिकेत,
- प्रजेश कश्यप - हाजी इफ्तिखारच्या भूमिकेत,
भारत सरकार
- नीरज काबी - जवाहरलाल नेहरूच्या भूमिकेत,
- गोविंद नामदेव - वल्लभभाई पटेलच्या
- फातिमा सना शेख - इंदिरा गांधीच्या भूमिकेत,
- अंजान श्रीवास्तव - यशवंतराव चव्हाणच्या भूमिकेत,
- अतुल काळे - केबी लालच्या भूमिकेत,
- एलांगो कुमारवेल व्ही.के. कृष्ण मेनन च्या भूमिकेत,
- विवेक बहल - डॉ सर्वपल्ली राधाकृष्णनच्या भूमिकेत,
- संजय रॉय - झाकीर हुसेनच्या भूमिकेत,
- वरुण नारंग - शेख अब्दुल्लाच्या भूमिकेत
पाकिस्तानी लष्कर
- मोहम्मद झीशान अय्युब - जनरल याह्या खानच्या भूमिकेत,
- मनीष बोंबा - जनरल अब्दुल हमीद खानच्या भूमिकेत,
- उपेन चौहान - लेफ्टनंट जनरल टिक्का खानच्या भूमिकेत,
- रोहन वर्मा - लेफ्टनंट जनरल अत्तिकुर रहमानच्या भूमिकेत
ब्रिटिश राजवट
- एडवर्ड सोनेनब्लिक - लॉर्ड लुई माउंटबॅटनच्या भूमिकेत,
- पॉल ओ'नील - मेजर जनरल डेव्हिड कोवानच्या भूमिकेत
- रिचर्ड मॅडिसन - लेफ्टनंट कर्नल डॉनी एडवर्डच्या भूमिकेत,
- सॅमी जोनास हेनी - कॅप्टन मॅकलरेनच्या भूमिकेत,
- एड रॉबिन्सन - लेफ्टनंट डीएडी आयकिनच्या भूमिकेत
कॅमिओ देखावा
- "दम है तो आजा" गाण्यात कल्की केकला विशेष भूमिकेत.
चित्रीकरण
या चित्रपटाचे मुख्य छायाचित्रण ८ ऑगस्ट २०२२ रोजी सुरू झाले.[४][५] सॅम माणेकशॉ यांच्या आयुष्यातील चार दशकांचा समावेश असलेल्या भारतातील १३ ठिकाणी दोन वर्षांत या चित्रपटाचे चित्रीकरण करण्यात आले.[६] मुंबई, पुणे, जोधपूर, पतौडी, चंदिगढ, उटी, डेहराडून, कोलकाता,[७] पटियाला,[८] श्रीनगर, पहेलगाम,[९] आणि दिल्ली येथे चित्रीकरण झाले.[१०] १४ मार्च २०२३ रोजी शूटिंग पूर्ण झाली.[११][१२]
प्रदर्शन
चित्रपटगृह
या चित्रपटाचा पहिला टीझर १ डिसेंबर २०२२ रोजी प्रसारित करण्यात आला.[१३] १३ ऑक्टोबर २०२४ रोजी RSVP प्रॉडक्शनद्वारे अधिकृत टीझर रिलीज करण्यात आला.[१४]
हा चित्रपट १ डिसेंबर २०२३ रोजी रणबीर कपूरच्या ॲनिमल या चित्रपटास टक्कर देत थिएटरमध्ये प्रदर्शित झाला.[१५]
होम मीडिया
चित्रपटाचा प्रीमियर OTT प्लॅटफॉर्म झी फाईव्ह वर २६ जानेवारी २०२४ रोजी झाला.[१६][१७]
हा चित्रपट १ डिसेंबर २०२३ रोजी ॲनिमलसोबत प्रदर्शित झाला. ॲनिमलच्या तुलनेत याची प्रसिद्धी आणि कमाई संथ झाली होती, परंतु लवकरच चर्चेच्या झोतात येऊन या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर गती मिळवली. पहिल्या दिवशी, चित्रपटाने ₹६.२५ कोटी, दुसऱ्या दिवशी ₹ ९ कोटी आणि तिसऱ्या दिवशी ₹ १०.३० कोटीची कमाई केली. या चित्रपटाने एकूण ११०.६९ कोटी (US$२४.५७ दशलक्ष) पेक्षा जास्त कमाई केली आहे भारतात आणि १७.४८ कोटी (US$३.८८ दशलक्ष) १२८.१७ कोटी (US$२८.४५ दशलक्ष) च्या जगभरातील एकूण संकलनासाठी परदेशात.[१८] [१९]
प्रशंसा
पुरस्कार | समारंभाची तारीख | श्रेणी | प्राप्तकर्ते | परिणाम | संदर्भ |
---|---|---|---|---|---|
फिल्मफेर पुरस्कार | २८ जानेवारी २०२४ | सर्वोत्कृष्ट चित्रपट (समीक्षक) | मेघना गुलजार | नामांकन | [२०][२१] |
सर्वोत्कृष्ट अभिनेता | विकी कौशल | नामांकन | |||
सर्वोत्कृष्ट अभिनेता (समीक्षक) | नामांकन | ||||
सर्वोत्कृष्ट गीतकार | "इतनी सी बात" साठी गुलजार | नामांकन | |||
सर्वोत्तम उत्पादन डिझाइन | सुब्रत चक्रवर्ती आणि अमित रे | विजयी | |||
सर्वोत्तम ध्वनी डिझाइन | कुणाल शर्मा | विजयी | |||
सर्वोत्तम पार्श्वभूमी स्कोअर | केतन सोढा | नामांकन | |||
सर्वोत्तम पोशाख डिझाइन | सचिन लवळेकर, दिव्या गंभीर आणि निधी गंभीर | विजयी | |||
सर्वोत्तम कृती | परवेझ शेख | नामांकन |
संदर्भ
- ^ "Vicky Kaushal completes filming for Sam Bahadur: So much I got to live, so much I got to learn". Filmfare (इंग्रजी भाषेत). 15 March 2023. 7 July 2023 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 7 July 2023 रोजी पाहिले.
- ^ "Sam Bahadur Movie (2023) | Release Date, Review, Cast, Trailer". Gadgets 360 (इंग्रजी भाषेत). 7 July 2023 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 7 July 2023 रोजी पाहिले.
- ^ "Vicky Kaushal's 'Sam Bahadur' to hit screens next December". The Hindu (इंग्रजी भाषेत). PTI. 1 December 2022. 7 July 2023 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 7 July 2023 रोजी पाहिले.
- ^ "Vicky Kaushal's film on Field Marshal Sam Manekshaw, Sam Bahadur, begins filming, see a riveting BTS look". 8 August 2022. 7 September 2023 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 7 September 2023 रोजी पाहिले.
- ^ Chowdhury, Titas (20 January 2023). "Vicky Kaushal, Meghna Gulzar Shoot for Sam Bahadur in Same Spot as Raazi, Actor Calls it 'Most Magical Journey'". CNN-News18 (इंग्रजी भाषेत). 7 July 2023 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 7 July 2023 रोजी पाहिले.
- ^ "Vicky Kaushal starrer Sam Bahadur was extensively shot across 13 Indian locations for THIS reason". PINKVILLA. 23 October 2023. 24 October 2023 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 23 October 2023 रोजी पाहिले.
- ^ Sen, Srijita (22 November 2022). "Vicky Kaushal Asks 'Kemon Achen' as He Lands in Kolkata For Sam Bahadur's Shoot, See Pic". CNN-News18 (इंग्रजी भाषेत). 3 September 2023 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 3 September 2023 रोजी पाहिले.
- ^ Arya, Prachi (20 January 2023). "Vicky Kaushal shoots for Sam Bahadur in Punjab, reveals how he manifested Meghna Gulzar's directorial". India Today (इंग्रजी भाषेत). 20 January 2023 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 3 September 2023 रोजी पाहिले.
- ^ Khan, M Aamir (7 September 2022). "'Lights, Camera, Action': Emraan Hashmi, Vicky Kaushal start shooting for 'Ground Zero', 'Sam Bahadur' in Kashmir - The Kashmir Monitor". Kashmir Monitor. 3 September 2023 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 3 September 2023 रोजी पाहिले.
- ^ Lohana, Avinash (12 September 2022). "EXCLUSIVE: Vicky Kaushal shoots Sam Bahadur in Kashmir, Neeraj Kabi plays Jawaharlal Nehru; Next stop Delhi". Pinkvilla (इंग्रजी भाषेत). 3 September 2023 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 3 September 2023 रोजी पाहिले.
- ^ "Vicky Kaushal is filled with gratitude after completing Sam Bahadur: 'So much I got to live'". Hindustan Times (इंग्रजी भाषेत). 14 March 2023. 7 July 2023 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 7 July 2023 रोजी पाहिले.
- ^ "Vicky Kaushal announces wrap of 'Sam Bahadur' shoot; Meghna Gulzar directorial to be released on December 1". Mid-Day (इंग्रजी भाषेत). 14 March 2023. 7 July 2023 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 7 July 2023 रोजी पाहिले.
- ^ Arya, Prachi (1 December 2022). "Sam Bahadur teaser out. Vicky Kaushal's realistic portrayal of Sam Manekshaw will leave you intrigued". India Today (इंग्रजी भाषेत). 12 July 2023 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 12 July 2023 रोजी पाहिले.
- ^ "Vicky Kaushal on Sam Bahadur's clash with Ranbir Kapoor's Animal: 'Great day for the audience'". The Indian Express. 13 October 2023. 14 October 2023 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 13 October 2023 रोजी पाहिले.
- ^ "Sam Bahadur: Vicky Kaushal's Film To Release On This Date". NDTV.com. 6 January 2024 रोजी पाहिले.
- ^ "Vicky Kaushal's Blockbuster". Bru Times News (इंग्रजी भाषेत).
- ^ "Sam Bahadur OTT release: X users hail Vicky Kaushal's 'pitch-perfect' performance". Hindustan Times (इंग्रजी भाषेत). 26 January 2024.
- ^ "Sam Bahadur Box Office Collection Day 3: "Stands On Its Feet Despite A Hurricane Called Animal"". NDTV.com. 4 December 2023 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 4 December 2023 रोजी पाहिले.
- ^ "Sam Bahadur Box Office Collection". Pinkvilla (इंग्रजी भाषेत). 20 October 2023. 25 December 2023 रोजी पाहिले.
- ^ "Nominations for the 69th Hyundai Filmfare Awards 2024 with Gujarat Tourism: Full list out". filmfare.com (इंग्रजी भाषेत). 21 January 2024 रोजी पाहिले.
- ^ "Winners of the 69th Hyundai Filmfare Awards 2024 with Gujarat Tourism: Full list out". Filmfare. 29 January 2024. 30 January 2024 रोजी पाहिले.
बाह्य दुवे
- इंटरनेट मुव्ही डेटाबेस वरील सॅम बहादुर (चित्रपट) चे पान (इंग्लिश मजकूर)
- बॉलिवूड हंगामा वर सॅम बहादुर (चित्रपट)