Jump to content

सॅटर्डे क्लब



मराठी उद्योजकांना एकत्र आणण्यासाठी ‘सॅटर्डे क्लब‘ या संस्थेची १७ डिसेंबर २००० रोजी गोरेगाव पूर्व येथे स्थापना झाली.[]

मराठी उद्योजकांनी कमीत कमी महिन्यातून एकदा शनिवारच्या संध्याकाळी एकत्र यावे, उद्योगाविषयी गप्पा माराव्यात, सहकार्याची भावना परस्परात रुजवावी, मैत्रीचे पूल बांधावेत व नवीन मराठी उद्योजकांना सहकार्य करण्यासाठी ठोस पावले उचलावीत हे या ‘सॅटर्डे क्लब‘चे मुख्य उद्दिष्ट आहे. माधवराव भिडे यांनी सुरू केलेली ही संकल्पना आहे. सध्या या क्लबची गिरगाव, दादर, मालाड, गोरेगाव, ठाणे, बोरिवली, कल्याण, डोंबिवली, वाशी, नाशिक, पुणे, हैदराबाद, चेन्नई, अहमदाबाद, सांगली, कोल्हापूर, मिरज येथे स्थापना झाली आहे.[] सॅटर्डे क्लब - मराठी व्यवसायिकांचे व्यासपिठ सॅटर्डे क्‍लबचे संस्थापक माधव भिडे


बाह्य दुवे

संदर्भ