Jump to content

सृष्टी कुलकर्णी

सृष्टी कुलकर्णी (१९९७ - ) या मराठी लेखिका आहेत यांनी १७ कथा असलेला कॅलिडोस्कोप हा मराठी लघुकथासंग्रह लिहिला.

कुलकर्णी यांना रक्ताचा कर्करोग असल्याचे निदान २०१६ सालच्या सुरुवातीला झाले. त्यांनंतर रोगावर मात करीत त्यांनी या कथा लिहिल्या व कथासंग्रह प्रकाशित करवून घेतला.

कुलकर्णी यांचे मूळ गाव महाराष्ट्राच्या सांगली जिल्ह्यात आहे. महाविद्यालयाच्या अभ्यासासाठी त्या नवी मुंबई येथे आपल्या आजीकडे राहतात. न्यू पनवेल शहरातील चंगू काणा ठाकूर काॅलेजात त्या रसायनशास्त्र हा विषय घेऊन बी.एससी. करीत आहेत.