सूर्य नारायण मंदिर
सूर्य नारायण मंदिर हे महिकावती ऊर्फ माहीम गावात (पालघर जिल्हा) माहीम शिरगाव रस्त्यावर आगर बसथांब्याच्या थोडेसे पुढे आहे. या सूर्यनारायण देवाची प्रतिष्ठापना मिती आषाढ शुद्ध पौर्णिमा शके १८२८ (इ.स.१९०६) रोजी झालेली आहे.[१]
ऐतिहासिक पार्श्वभूमी
मुंबई करीरोड येथील पद्मनाभ स्वामी श्री दत्तमंदिरात धर्मोपदेशकाचे कार्य करीत असत. त्यांचे शिष्य रामानंदस्वामी सफाळे जवळील आगरवाडी गावात व्यापारासाठी येत असत. इ.स.१९०१ मध्ये दसआगरी समाजातील श्री. मंगळ्या कबु पाटील आणि इतर समाजबांधवांनी रामानंदस्वामी तर्फे श्रीमत् पद्मनाभ स्वामींना आगरवाडी गावात येण्यासाठी विनंती केली.
संदर्भ
- श्री सूर्यनारायण मंदिर शतक महोत्सव स्मरणिका : श्री सूर्यनारायण सेवा संघ, रजि. नं.ए११३ ठाणे, श्रीक्षेत्र के.माहीम, ता.जि.पालघर ४०१४०२.०४/०२/२००६.
- ^ श्री सूर्यनारायण मंदिर शतक महोत्सव स्मरणिका :श्री सूर्यनारायण सेवा संघ, रजि. नं.ए११३ ठाणे, श्रीक्षेत्र के.माहीम, ता.जि.पालघर ४०१४०२.०४/०२/२००६.