सूर्योदय साहित्य संमेलन
सूर्योदय साहित्य संमेलन हे जळगावला होणारे एक एकदिवसीय मराठी साहित्य संमेलन आहे. जळगावची सूर्योदय सर्वसमावेशक मंडळ ही संस्था हे संमेलन भरवते. प्रा. डॉ. दत्ता भोसले, प्रा.डॉ. तारा भवाळकर, डॉ. बोल्ली लक्ष्मीनारायण, वामन होवाळ, प्रा. डॉ. रवींद्र शोभणे, सुधाकर गायधनी, डॉ. रा.रं. बोराडे, लक्ष्मण गायकवाड, रेखा बैजल, प्रा. डॉ. यशवंत पाठक, फादर फ्रान्सिस दिब्रिटो, संगीता बर्वे, इ. लेखक या संमेलनाचे माजी अध्यक्ष आहेत.
पूर्वीची संमेलने
- ५वे सूर्योदय साहित्य संमेलन (७-८ नोव्हेंबर २००९) : अध्यक्षस्थानी डॉ. रवींद्र शोभणे.
- ६वे सूर्योदय साहित्य संमेलन (नोव्हेंबर २०१०) : अध्यक्षस्थानी नागपूरचे महाकवी सुधाकर गायधनी..
- ७वे सूर्योदय साहित्य संमेलन (२१ ऑगस्ट २०११) : अध्यक्षस्थानी डॉ. रा.रं. बोराडे.
- १०वे सूर्योदय साहित्य संमेलन (१७ ऑगस्ट २०१४) : अध्यक्षस्थानी डॉ. यशवंत पाठक. या संमेलनात गिरीजा कीर यांना साहित्यभूषण पुरस्कार प्रदान झाला.
- ११व्या सूर्योदय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष फादर फ्रान्सिस दिब्रिटो होते.
- १२वे सूर्योदय मराठी साहित्य संमेलन (१३ ऑगस्ट २०१६). अध्यक्षस्थानी डॉ.संगीता बर्वे.
- १३वे सूर्योदय मराठी साहित्य संमेलन (२० ऑगस्ट २०१७). अध्यक्षस्थानी वसंत आबाजी डहाके.
- १४वे सूर्योदय मराठी साहित्य संमेलन (१५ ऑगस्ट २०१८). अध्यक्षस्थानी प्रा. डाॅ. नागनाथ कोत्तापल्ले
- भवरलाल जैन साहित्य संमेलन, (जळगांव, २४ फेब्रुवारी २०१९), अध्यक्षस्थानी डाॅ. किशोर सानप
- १५वे सूर्योदय साहित्य संमेलन (१८ ऑगस्ट २०१९) रोजी जळगाव येथे होणार आहे. या संमेलनात कवी सुधाकर गायधनी यांना 'अखिल भारतीय दलुभाऊ जैन मराठी साहित्यभूषण' हा पुरस्कार देण्यात येईल.
- सूर्योदय बालकुमार साहित्य संमेलन. (नोव्हेंबर २०१९). अध्यक्षस्थानी डाॅ. सुरेश सावंत.
- पहिले अखिल भारतीय सूर्योदय मराठी साहित्य संमेलन जळगाव. (७ व ८ मे २०२२). अध्यक्षस्थानी प्रभा गणोरकर, उद्घाटक डॉ. विश्वनाथ शिंदे .