सूर्यवंशी क्षत्रिय
हा लेख क्षत्रिय वंश याबद्दल आहे. या शब्दाच्या इतर उपयोगांसाठी पाहा, सूर्यवंशी (निःसंदिग्धीकरण).
सूर्यवंशी हा भारतातील तीन क्षत्रिय वंशांपैकी एक आहे.
सोमवंशी व अग्निवंशी हे इतर दोन क्षत्रिय वंश आहेत.
सूर्यवंशी हे भारतातील राजे होते.
भौगोलिक पार्श्वभूमी
पालघर तालुक्यातील कोरे व जवळपासच्या गावातील सूर्यवंशी समाजातील लोक ब्रिटिशसत्तेच्या काळात मुंबईत दादर, प्रभादेवी, माहीम, माटुंगा येथे आले.ह्यामध्ये कवळी, धुरू,चुरी, ठाकूर, पाटील, कोरे, सुर्यवंशी वैद्य, पुरव चौधरी अशी आडनावे आढळतात.हा समाज मुंबई ते विरार,पालघर, डहाणू पर्यंत पसरलेला आहे. अनेक गुणांमध्ये पारंगत असलेला हा समाज एक आदर्श आहे. ह्यांच्या समाजात लग्न समारंभ दोन दिवसांचा असतो. सणासुदीला फडाची करंजी, टोपाची भाकरी, पाणगा असे अनेक पदार्थ ते बनवितात.
संदर्भ
१.महाराष्ट्र टाईम्स १७/०१/२०२०.