Jump to content

सूरा

सूरा किंवा सूरह् (अरबी : سورة‎) म्हणजे कुराण या इस्लामी धर्मग्रंथातील विभाग अथवा प्रकरणे होय. सुरा (किंवा सूरः) याचा शब्दशः अर्थ 'कुंपणाने घेरलेली जागा' असा होतो. कुराणाच्या सुरा मक्की व मदीनी अश्या दोन भागांत विभागल्या असून मोहम्मदाच्या मदिनेकडील प्रस्थानाअगोदर अवतीर्ण झालेल्या सूरांना मक्की, तर त्यानंतर अवतरलेल्या सूरांना मदीनी असे म्हणतात. एका सूरेमधील प्रत्येक ओळीस आयत असे म्हणतात. कुराणात एकूण ११४ सुरा आहेत.