Jump to content

सूरज भान

सूरज भान (ऑक्टोबर १, इ.स. १९२८- ऑगस्ट ६, इ.स. २००६) हे भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते होते. ते इ.स. १९६७, इ.स. १९७७, इ.स. १९८० आणि इ.स. १९९६च्या लोकसभा निवडणुकीत हरियाणा राज्यातील अंबाला लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले. ते अटलबिहारी वाजपेयी यांच्या तेरा दिवसांच्या सरकारमध्ये कृषीमंत्री होते. वाजपेयी सरकार पडल्यावर ते ११ व्या लोकसभेचे उपाध्यक्ष म्हणून निवडून गेले. त्यांचा इ.स. १९९८च्या लोकसभा निवडणुकीत पराभव झाला. त्यानंतर ते एप्रिल इ.स. १९९८ ते नोव्हेंबर इ.स. २००० या काळात उत्तर प्रदेश राज्याचे आणि नोव्हेंबर २००० ते मे इ.स. २००३ या काळात हिमाचल प्रदेश राज्याचे राज्यपाल होते. त्यांनी इ.स. १९९९ मध्ये काही काळ बिहार राज्याच्या राज्यपालपदाचा अतिरिक्त कार्यभार स्विकारला.