सुहास भालेकर
सुहास भालेकर | |
---|---|
जन्म | ११ ऑक्टोबर, इ.स. १९३१ |
मृत्यू | २ मार्च, इ.स. २०१३ मुंबई, महाराष्ट्र, भारत |
राष्ट्रीयत्व | भारतीय |
कार्यक्षेत्र | अभिनय (नाटक, चित्रपट, टीव्ही मालिका) |
भाषा | मराठी |
सुहास भालेकर (११ ऑक्टोबर, इ.स. १९३१ - २ मार्च, इ.स. २०१३; मुंबई, महाराष्ट्र) हे मराठी अभिनेते, दिग्दर्शक होते. यांनी मराठी नाटके, चित्रपट, दूरचित्रवाहिनी मालिका यांतून अभिनय केला.
कारकीर्द
सुहास भालेकरांनी कारकिर्दीची सुरुवात रंगभूमीपासून केली. नाटकांत कामे करण्यास त्यांच्या वडिलांचा विरोध असल्यामुळे, त्यांनी सुरुवातीस साबाजी या नावाने [१] लोकनाट्यांतून कामे केली. इ.स. १९६०-७६ या कालखंडात [२] शाहीर साबळे आणि पार्टीच्या अनेक लोकनाट्यांमधून भालेकर आणि राजा मयेकर या अभिनेत्यांची जोडगोळी गाजली [३]. शाहीर साबळे आणि पार्टीच्या अनेक लोकनाट्यांचे दिग्दर्शन त्यांनी केले [३].
व्ही. शांतारामांच्या चानी चित्रपटाद्वारे भालेकरांचा चित्रपटक्षेत्रात प्रवेश झाला [४].
कारकीर्द
नाट्यकारकीर्द
सुहास भालेकर यांची नाटके/लोकनाट्ये आणि त्यातील भूमिका :
वर्ष (इ.स.) | नाटक | भाषा | भूमिका/सहभाग | टिप्पणी |
---|---|---|---|---|
अजब न्याय वर्तुळाचा | मराठी | अजबदास | मूळ जर्मन नाटक ब्रेख्तचे द कॉकेशियन चॉक सर्कल | |
आतून कीर्तन वरून तमाशा | मराठी | |||
आंधळं दळतंय | मराठी | पाटीवाला | लोकनाट्य | |
एकच प्याला | मराठी | तळीराम | ||
एक तमाशा सुंदरसा | मराठी | सई परांजपे आणि लिहिलेले आणि दिग्दर्शित केलेल नाटक | ||
कशी काय वाट चुकलात | मराठी | लोकनाट्य | ||
कोंडू हवालदार | मराठी | लोकनाट्य | ||
तुझे आहे तुजपाशी | मराठी | वासूअण्णा | ||
फुटपायरीचा सम्राट | मराठी | तुक्या | ||
फुलाला सुगंध मातीचा | मराठी | गोविंदनाना | ||
बापाचा बाप | मराठी | लोकनाट्य | ||
बेबंदशाही | मराठी | खाशाबा | ||
माकडाला चढली भांग | मराठी | |||
मी मंत्री झालो | मराठी | लखोबा | ||
मृच्छकटिक | मराठी | मैत्रेय | ||
लग्नाची बेडी | मराठी | गोकर्ण | ||
सत्तेवरचे शहाणे | मराठी | पी.ए. | ||
यमराज्यात एक रात्र | मराठी | लोकनाट्य |
चित्रपट-कारकीर्द
सुहास भालेकर यांची भूमिका असलेले चित्रपट:
वर्ष (इ.स.) | चित्रपट | भाषा | भूमिका | टिप्पणी |
---|---|---|---|---|
चानी | मराठी | |||
इ.स. १९७६ | शक | हिंदी | भालेकर आडनावाचा माणूस | |
इ.स. १९८० | गहराई | हिंदी | ||
इ.स. १९८२ | दोन बायका फजिती ऐका | मराठी | बाबूराव | |
इ.स. १९८४ | सारांश | हिंदी | विश्वनाथ | |
इ.स. १९९८ | चायना गेट | हिंदी | ||
अर्थ | हिंदी | |||
चक्र | हिंदी | |||
झुंज | मराठी | |||
नीलांबरी | मराठी | |||
लक्ष्मी | मराठी | |||
सुशीला | मराठी |
दूरचित्रवाणी-कारकीर्द
वर्ष (इ.स.) | कार्यक्रम | भाषा | भूमिका/सहभाग | टिप्पणी |
---|---|---|---|---|
इ.स. २००८ | असंभव | मराठी | सोपानकाकाका | |
भाकरी आणि फूल | मराठी |
- सुहास भालेकर यांचे दिग्दर्शन
- शाहीर साबळे करीत असलेल्या लोकनाट्यांचे दिग्दर्शन बहुतेक वेळा सुहास भालेकर यांचे असे.
मृत्यू
२ मार्च, इ.स. २०१३ रोजी मुंबईतल्या बाँबे हॉस्पिटल येथे भालेकरांचा मृत्यू झाला [५]. फुप्फुसांच्या आजारामुळे त्यांना बाँबे हॉस्पिटलात दाखल करण्यात आले होते[५]. मृत्युसमयी ते ८३ वर्षांचे होते.
त्यांचा मुलगा हेमंत भालेकर हा अभिनेता आहे.
संदर्भ व नोंदी
- ^ "सुहास भालेकर काळाच्या पडद्याआड [[वर्ग:मृत बाह्य दुवे असणारे सर्व लेख]][[वर्ग:मृत बाह्य दुवे असणारे लेख ]][[[Wikipedia:Link rot|मृत दुवा]]]". ३ मार्च, इ.स. २०१३ रोजी पाहिले.
|ॲक्सेसदिनांक=
मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य); URL–wikilink conflict (सहाय्य) - ^ "सुहास भालेकर यांचं निधन [[वर्ग:मृत बाह्य दुवे असणारे सर्व लेख]][[वर्ग:मृत बाह्य दुवे असणारे लेख ]][[[Wikipedia:Link rot|मृत दुवा]]]". ३ मार्च, इ.स. २०१३ रोजी पाहिले.
|ॲक्सेसदिनांक=
मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य); URL–wikilink conflict (सहाय्य) - ^ a b "ज्येष्ठ रंगकर्मी सुहास भालेकर यांचे निधन". ३ मार्च, इ.स. २०१३ रोजी पाहिले.
|ॲक्सेसदिनांक=
मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य) - ^ "सुहास भालेकर यांचे निधन". ३ मार्च, इ.स. २०१३ रोजी पाहिले.
|ॲक्सेसदिनांक=
मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)[permanent dead link] - ^ a b "सुहास भालेकर कालवश". 2013-03-05 रोजी मूळ पान पासून संग्रहित. ३ मार्च, इ.स. २०१३ रोजी पाहिले.
|ॲक्सेसदिनांक=
मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
बाह्य दुवे
- इंटरनेट मूव्ही डेटाबेस वरील सुहास भालेकर चे पान (इंग्लिश मजकूर)