सुहासिनी मुळगावकर
सुहासिनी मुळगावकर | |
---|---|
जन्म | सुहासिनी मुळगावकर |
राष्ट्रीयत्व | भारतीय |
कार्यक्षेत्र | अभिनय |
भाषा | मराठी |
'
सुहासिनी मुळगावकर' (? - जून १४, १९८९) या मराठी अभिनेत्री होत्या. मुंबई दूरदर्शनवर होणाऱ्या संगीतविषयक कार्यक्रमांच्या त्या निर्मात्या असत.
सुहासिनी मुळगावकर हे नाव १९७० च्या दशकामध्ये सांस्कृतिक संदर्भात वारंवार ऐकू येत असे. दाजी भाटवडेकरांच्या संस्कृत नाटकांमधून त्यांनी कामे केली तसेच त्यांनी स्वतः केलेली एकपात्री 'सौभद्र' आणि एकपात्री 'मानापमान' ही खूप गाजली होती. 'दूरदर्शन' वर फार चांगले असे काही कार्यक्रम पहायला मिळत त्यांपै़की 'प्रतिभा आणि प्रतिमा' हा रविवारी सकाळी मुंबईहून होणारा मराठी कार्यक्रम एक होता आणि सुहासिनीबाई त्याच्या निर्मात्या होत्या. साहित्य-संगीत-नाटय क्षेत्रातील प्रसिद्ध व्यक्तींच्या एक तासाच्या मुलाखती असा हा कार्यक्रम असे आणि बरेच कलाकार-लेखक-विद्वान लोक पाहण्यास मिळाले,
जर तो कलाकार गायक असला तर त्या कलाकाराला सुहासिनी बाई गाणं सादर करण्याचा आग्रह करत. त्यांची आमंत्रित कलाकाराला आग्रह करायची पद्दत काही और होती. जरा लाडात आणि कलाकाराच नाव घेऊन त्या नेहमी आग्रह करीत असत. उदाहरण द्यायचं झालं तर “गाणार ना गंधर्वजी” अस म्हणत त्यांनी कुमार गंधर्व ना गाण्याचा आग्रह केला होता.
एकदा त्यांच्या कार्यक्रमात प्रभुदेव सरदार पाहुणे म्हणून आले होते. नेहमी प्रमाणे मुलाखतीनंतर सुहासिनी बाई नी आपल्या नेहमीच्या पद्धतीने , गाण्याची फ़र्माईश करत प्रभुदेव सरदार ना म्हणाल्या, “गाणार ना सरदारजी “.
‘रत्नपारखी योजना’ नावाचा उपक्रम सुहासिनी मुळगावकर तेव्हा चालवत असत ,या मध्ये सध्याच्या ‘सारेगमा’ स्पर्धा आहे, तसा कार्यक्रम त्या सादर करत होत्या.सुहासिनी मुळगावकर यांनी शतरंगी संगीत किंवा गोविंदराव टेंबेंवरील कार्यक्रम सादर केले.
सुहासिनी मुळगावकर यांनी एक आठवण सांगितली होती कि कॉलेजला असताना वडील रोज गीतेतील श्लोक बेस्टच्या तिकिटाच्या मागे लिहून द्यायचे, बस येई पर्यंत मी तो पाठ करत असे,यातून कॉलेज संपेपर्यत माझी भगवतगीता पाठ झाली.
सुहासिनी बाईंनी शतरंग,सदाफुली,सफारी, मनमोकळं ही पुस्तके लिहिली आहेत.
दाजी भाटवडेकरांच्या संस्कृत नाटकांमधून त्यांनी कामे केली तसेच त्यांनी स्वतः केलेली एकपात्री 'सौभद्र' आणि एकपात्री 'मानापमान' ही खूप गाजली होती. सुहासिनी मुळगावकर यांनी सौभद्र व मानापमान या जुन्या लोकप्रिय संगीत नाटकांतील भिन्न पात्रांचे संवाद एकटीनेच म्हणून दाखविण्याची नवीनच प्रथा सुरू केली. या नाट्यप्रयोगात त्यांचा सर्व भर संवाद आणि अभिनय यांवरच असायचा.
मुंबई 'दूरदर्शन' वर फार चांगले असे काही कार्यक्रम पहायला मिळत त्यांपै़की 'प्रतिभा आणि प्रतिमा' हा रविवारी सकाळी होणारा मराठी कार्यक्रम एक होता आणि सुहासिनीबाई त्याच्या निर्मात्या होत्या. साहित्य-संगीत-नाटय क्षेत्रातील प्रसिद्ध व्यक्तींच्या एक तासाच्या मुलाखती असा हा कार्यक्रम असे आणि बरेच कलाकार-लेखक-विद्वान लोक त्या मधे हजेरी लाऊन त्या कार्यक्रमाची उंची वाढवत असत
राहून राहून आठवण येते ती सुहासिनी मुळगावकर यांची . या बाई केवळ ग्रेट होत्या.. स्वतः एक विदुषी..नेहमी सुहास्यवदनी..कर्करोगाने अकाली गेल्या.. जे जे उत्तम, उदात्त, म्हणजे सुहासिनीबाई आणि सुहासिनीबाई म्हणजे सगळं काही उत्तम, उदात्त, उन्नतच.. असं ते अद्वैत होत.