Jump to content

सुलभा मंत्री

सुलभा मंत्री(जन्म : २७-११-१९५०; - कुडाळ, १२ मे, इ.स.२०१३) या एक मराठी गुजराती व हिंदी अभिनेत्री होत्या. त्यांचे नाट्यशिक्षण मुंबई मराठी साहित्य संघाच्या ’अमृत नाट्य भारती’तून झाले होते.

कारकीर्द

सुलभा मंत्री यांनी रमेश पवार यांच्या गुरू या नाटकाद्वारे रंगभूमीवर पदार्पण केले . या नाटकातील भूमिकेसाठी त्यांना राज्य नाट्य स्पर्धेत रौप्यपदक मिळाले. त्यांनी त्यानंतर अनेक मराठी नाटकांतून भूमिका केल्या. १९ जानेवारी २०१० रोजी झालेल्या आंतरमहाविद्यालयीन एकांकिका स्पर्धेच्या त्या परीक्षक होत्या.


सुलभा मंत्री यांनी मराठी नाटकांखेरीज हिंदी चित्रपटांत, गुजराती नाटकांत, आणि हिंदी-मराठी दूरचित्रवाणी मालिकांतही भूमिका केल्या होत्या.

कारकिर्दीतील नाट्यमय प्रसंग

महाराष्ट्र सरकारने १४ नोव्हेंबर ते २ डिसेंबर २०११ या कालावधीत पुणे शहरात भरलेल्या ५१व्या राज्य नाट्यस्पर्धेच्याही त्या परीक्षक होत्या. त्यांना आणि इतर दोन परीक्षकांना टिळक रोडवरच्या श्रीनाथ हॉटेलात उतरविले होते. महाराष्ट्र सरकारच्या समाज कल्याण खात्याने हॉटेलचे थकलेले २४०० रुपये न भरल्याने हॉटेल मालकाने सुलभा मंत्रींचे सामान ठेवून घेतले आणि त्यांना बाहेर काढले. एका सद्‌गृहस्थाने त्यांच्या राहण्याची सोय सुरुवातीला टिळक स्मारक मंदिरात, आणि नंतर डेक्कन जिमखान्यावरील एका हॉटेलात केली. (लेखाच्या तळाशी दिलेला संदर्भ पहा.)

कुडाळ येथे देवी दर्शनासाठी गेल्या असता तेथे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने त्यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात त्यांची मुलगी नेश्मा व मुलगा त्रियुग असा परिवार आहे.

सुलभा मंत्री यांची भूमिका असलेली नाटके आणि चित्रपट

  • अजब न्याय वर्तुळाचा (मराठी नाटक)
  • आता कसं वाटतंय (मराठी चित्रपट-२००२)
  • आधारस्तंभ (मराठी चित्रपट)
  • आमच्यासारखे आम्हीच (मराठी नाटक)
  • ज्याचा त्याचा प्रश्न (मराठी नाटक)
  • झपाटलेली (मराठी नाटक)
  • टपाल(मराठी चित्रपट)
  • तनमाजोरी (मराठी नाटक)
  • धुमशान (मराठी नाटक)
  • पूर्ण सत्य (हिंदी चित्रपट-१९९७)
  • प्रेमासाठी वाट्टेल ते (मराठी चित्रपट-१९८७)
  • बात प्यार की (हिंदी चित्रपट)
  • भोळा शंकर (मराठी चित्रपट)
  • मन पाखरू पाखरू (मराठी चित्रपट)
  • माझा मुलगा (मराठी चित्रपट )
  • युगपुरुष (मराठी नाटक)

दूरचित्रवाणी मालिका

  • आमची माती आमची माणसं(मराठी शेतीविषयक कार्यक्रम)
  • उतरन (हिंदी धारावाहिक)
  • कुछ खोया कुछ पाया (हिंदी धारावाहिक)
  • दामिनी(मराठी मालिका)
  • साराभाई वर्सेस साराभाई (हिंदी धारावाहिक)

संदर्भ

भरण्यास टाळाटाळ[मृत दुवा]