Jump to content

सुलक्षणा महाजन

सुलक्षणा महाजन या एक मराठी लेखिका आणि अनुवादिका आहेत.

लिहिलेली/अनुवादित केलेली पुस्तके

  • एक डॉक्टर असलेला इंजिनिअर ((डाॅ. चिं.मो. पंडित यांचा गौरवग्रंथ, संपादन : सुलक्षणा महाजन, मूळ संकल्पना : जयंत कुलकर्णी)
  • काँक्रीटची वनराई : प्रगत, सुनियोजित, सुंदर शहरांचं स्वप्न (मुंबई सकाळ या दैनिकामध्ये 'नागर जागर' या सदरात प्रसिद्ध झालेल्या पर्यावरणविषयक लेखांचा संग्रह)
  • जग बदललं (सामाजिक) : आपल्या आजुबाजूला रोज घडणाऱ्या गोष्टींतून बदलत्या जगाचा शोध घेण्याचा प्रयत्न.
  • तुम्ही बी घडाना : बार्सेलोनाला एक सर्वोत्तम शहर बनवण्याचा ध्यास घेतलेल्या राजकारण्याचे अनुभवकथन (अनुवादित, मूळ लेखक - अंतोनी व्हिक्स, सहलेखिका करुणा गोखले)
  • लंडननामा : जडणघडण पहिल्या 'ग्लोबल सिटी'ची
  • स्मार्ट सिटी सर्वांसाठी