सुरेश तळवलकर
पंडित सुरेश तळवलकर (जन्म : चेंबूर-मुंबई, इ.स. १९४८ - हयात) हे हिंदुस्तानी संगीतातील एक मराठी तबलावादक आहेत. त्यांच्या पत्नी पद्मा तळवलकर या गायिका आहेत आणि कन्या सावनी तबलावादक आहेत. सुरेश तळवलकर यांचे व्यावसायिक असलेले चिरंजीव सत्यजित हेही तबला वाजवतात.
सुरेश तळवलकर यांनी सुरुवातीला आपले वडील दत्तात्रेय तळवलकर यांच्याकडून तबला वादनाचे धडे घेतले. पुढचे शिक्षण त्यांनी तबलावादक पंढरीनाथ नागेशकर आणि विनायकराव घांग्रेकर यांच्याकडून घेताले. सुरेश तळवलकर यांनी हिंदुस्तानी संगीताबरोबरच कर्नाटक संगीताचाही अभ्यास केला आहे.
तळवलकर यांनी सारंगीवादक राम नारायण यांना आणि शास्त्रीय संगीत गायक उल्हास कशाळकर यांना अनेकदा तबल्याची साथ केली आहे. त्यांच्याबरोबर त्यांनी अमेरिका, युरोप आणि आफ्रिकेत संगीताचे कार्यक्रम केले आहेत.
विजय घाटे, पंडित रामदास पळसुले आणि इतर अनेक देशी परदेशी विद्यार्थी पंडित सुरेश तळवलकरांचे शिष्य आहेत..
सुरेश तळवलकरांनी लिहिलेली पुस्तके
सुरेश तळवलकरांना मिळालेले सन्मान आणि पुरस्कार
- अमेरिकेतील ब्रॅडले विद्यापीठातील सेंट्रल इलिनॉइस येथील भारतीय विद्यार्थ्यांकडून सन्मान (२००८)
- आकाशवाणी संगीत स्पर्धेत मिळालेला पहिला क्रमांक व पारितोषिक (१९६६)
- आंध्र प्रदेश सरकारचा पुरस्कार (१९९८)
- इंदूरच्या अभिनव कला समाजाकडून मिळालेले सन्मानपत्र (२००५)
- करवीर पीठाच्या शंकराचार्यांकडून मिळाली ताल-योगी ही पदवी (२००१)
- कलकत्त्याच्या इंडियन टॉबॅको कंपनीच्या संगीत संशोधन ॲकॅडमीचा पश्चिमी भारतातील कलावंतांसाठी ठेवलेला पुरस्कार (२००९)
- पुण्याच्या गांधर्व महाविद्यालयाकडून मिळालेला विष्णू दिगंबर पलुसकर पुरस्कार (२००४)
- डोंबिवलीच्या कऱ्हाडे ब्राह्मण सेवा मंडळाचा पुरस्कार (२००९)
- थायलंडच्या राजकन्येच्या हस्ते मिळालेला ’की ऑफ थायलंड’ हा सन्मान (२००६)
- नाशिक येथे मिळालेला पार्वती पुरस्कार (२०१०)
- पद्मश्री पुरस्कार (२०१३)
- पूर्णवाद वर्धिष्णू विष्णू महाराज पारनेरकरांकडून मिळालेला संगीत पूर्णाचार्य पुरस्कार (२००८)
- भारत गायन समाज संस्थेचा पंडित राम मराठे पुरस्कार (२००९)
- भारताच्या दळणवळण मंत्र्यांच्या हस्ते मिळालेले जायंट’स इंटरनॅशनल अवॉर्ड (२००७)
- मधुरिता सारंग स्मृती पुरस्कार (२००९)
- मध्य प्रदेशच्या मुख्य मंत्र्यांच्या हस्ते मिळालेला मधुबन संस्थेचा श्रेष्ठ कला आचार्य पुरस्कार (२००८)
- महाराष्ट्र सरकारचा वसंतराव नाईक पुरस्कार (२००५)
- मुंबईच्या स्वरसाधना संस्थेकडून मिळालेला रत्न पुरस्कार (२००८)
- मुंबईमधील चेंबूरच्या नाद-ब्रह्म संस्थेकडून मिळालेला त्यागराज पुरस्कार (२००२)
- तालविश्व उस्ताद मेहबूबखान साहेब मिरजकर पुरस्कार (२०१५)
- पुण्यात मिळालेला लक्ष्मी माता कला संस्कृती पुरस्कार (२००७)
- भारताच्या राष्ट्रपतींच्या हस्ते मिळालेला संगीत नाटक अकादमी पुरस्कार (२००४)
- नाशिकच्या कैलास मठ ट्रस्टतर्फे सरस्वती पुरस्कार (२०१०)
- पंढरपूरच्या स्वरसाधना संस्थेकडून सन्मान (२००९)
- पुणे महापालिकेतर्फे स्वरभास्कर पुरस्कार (२०१७)
बाह्य दुवे
- अधिकृत संकेतस्थळ (इंग्लिश मजकूर)