सुरेखा दीक्षित
जन्म - २० फेब्रुवारी १९५४
श्रीमती सुरेखा दीक्षित या अभ्यासक, लेखिका, प्रयोगशील शिक्षिका, विवेकानंद केंद्राच्या जीवनव्रती आहेत.
सुरेखा दीक्षित | |
---|---|
जन्म | खानगाव, वर्धा जिल्हा |
निवासस्थान | बोरी, गोवा |
राष्ट्रीयत्व | भारतीय |
शिक्षण | एम.ए. (इंग्रजी), बी.एड |
पेशा | शिक्षिका, लेखिका, जीवनव्रती |
मूळ गाव | विदर्भ |
धर्म | हिंदू |
जोडीदार | कै. प्रभाकर विष्णु दीक्षित |
कार्य
स्वामी विवेकानंदांच्या प्रेरणेने वयाच्या अवघ्या एकविसाव्या वर्षी विवेकानंद केंद्र या संघटनेच्या 'जीवनव्रती' प्रशिक्षणासाठी त्या कन्याकुमारीला गेल्या. या दरम्यान एकनाथ रानडे यांच्याकडून त्यांना समाजकार्याचे मार्गदर्शन मिळाले.
१९७४ ते १९८६ पर्यंत त्यांनी जीवनव्रती म्हणून पूर्णवेळ काम केले. या बारा वर्षांत अरुणाचल प्रदेश, आसाम, गुजरात येथे प्रामुख्याने शिक्षण क्षेत्रात त्या कार्यरत होत्या.
पती श्री. प्रभाकर दीक्षित (१९७८ ते १९९०) यांच्यासोबत आसाममधील तिनसुकिया येथे विवेकानंद केंद्र विद्यालयाचे पायाभूत कार्य केले. पतीनिधनानंतर त्यांनी तिनसुकिया शाळेच्या प्राचार्यपदाची धुरा सांभाळली.
१९९० पासून त्यांनी फोंडा येथील बोरी गावातील विवेकानंद विद्यालयात इंग्रजी व संस्कृत विषयांचे अध्यापन केले. 'गोमंतक बालशिक्षण परिषदे'च्या (गोव्यातील स्वयंसेवी संघटना) अध्यक्षपदावर श्रीमती सुरेखा दीक्षित २००७ पासून २०१९ पर्यंत कार्यरत होत्या.
पुदुच्चेरी येथील श्रीअरविंद आश्रमातील तत्त्वज्ञानावर आधारित समग्र शिक्षण प्रणालीच्या त्या अभ्यासक आहेत. सेवानिवृत्तीनंतर त्यांनी 'श्रीमीरविंद समग्र अध्ययन केंद्रा'ची (SMILE) स्थापना केली. त्या संस्थेच्या माध्यमातून श्रीमती दीक्षित या पूर्व प्राथमिक आणि प्राथमिक शाळेतील मुलांच्या बोधात्मक आणि भाषाविकासाची विविध शैक्षणिक साधने व पुस्तकांच्या निर्मितीचे काम करत असतात.
लेखन
०१) एकनाथजी रानडे: एक जीवन, एक ध्येय (चरित्रपर पुस्तक)
०२) गोमंतक बालशिक्षण परिषदेतर्फे प्रकाशित होणाऱ्या बालकनीती या त्रैमासिकामध्ये स्फुट लेखन
०३) 'तरुण भारत' मध्ये प्रकाशित झालेली लेखमालिका पुढे 'फुलायचे दिवस' या पुस्तकाच्या रूपाने प्रकाशित करण्यात आली. [१]
संदर्भ
- ^ सुरेखा दीक्षित (नोव्हेंबर २०२२). फुलायचे दिवस. गोवा: SMILE - Sri Miraravinda Integral Learning Experience.