सुरवंट
सुरवंट हा फुलपाखराचा (किंवा पाकोळीचा) अळी अवस्थेतील किड्याचा प्रकार आहे.
पावसाळच्याचे आगमन होते तेव्हा सुरुवातीच्या पावसासोबत सुरवंट तयार होतात, शहरी भागापेक्षा ग्रामीण भागात याचे प्रमाण जास्त असते. एका घरात त्यांची संख्या १००- १००० सुद्धा असू शकते. सुरवंट ही केसाळ अळी प्रमाणे असते. सुरवंटांत खूप सारे प्रकार, आकार व रंग आढळतात. काळा पांढरा हिरवा किंवा मिश्रित रंग हे सामान्य आहेत.|
सुरवंटची लांबी साधारणपणे ५ मिमी पासून ३५ मिमी एवढी असते, अंगावर पोटाखालची बाजू सोडली तर सर्वत्र केस आढळतात. यांचा जीवन काल कमी असतो, दीड ते दोन महिने ते अळी या रूपात वावर करून हे पावसाळ्याच्या शेवटी समाधिस्थ होतात. यावेळी ते स्वतःभोवती कोष्ट्याच्या जाळ्यासारखा धागा गुंडाळून कवच बनवतात. एका आठवड्यामध्ये त्या कवचातून काळ्या पिवळ्या/काळ्या केशरी रंगाच्या फुलपाखराचा जन्म होतो.
९८% सुरवंटाचे केस हे विषारी असतात. मानवी शरीराला यांचा नकळत स्पर्श जरी झाला तरी त्वचेची आग होते, खाजवेल तेवढा हा दाह वाढतो. सलग दोन ते तीन दिवस ही आग राहू शकते. संक्रमित त्वचा ही लालसर होऊन त्यावर थोडी सूज पण येते. या खाजेवर कोणतेही मेडिसिन नाही, परंतु देशी उपाय आहेत. उदाहरण द्यायचे झाले तर, तुळशीची पाने संक्रमित त्वचेवर रस निघेपर्यंत रगडावी. रॉकेल/घासलेटचे थेंब सोडावे.