सुमैरा अब्दुलअली (२२ मे, १९६१) ह्या मुंबईतील एक पर्यावरणवादी सामाजिक कार्यकर्त्या आहेत. बिनसरकारी संस्था आवाज फाऊंडेशनच्या त्या संस्थापिका आहेत. भारतात ध्वनी प्रदूषण नियंत्रण कायदा पारित होण्यात त्यांचे विशेष योगदान आहे.