Jump to content

सुबल सरकार

सुबल सरकार
आयुष्य
जन्म स्थान बांगलादेश
मृत्यू १२, नोव्हेंबर, २०११
मृत्यू स्थान मुंबई, महाराष्ट्र
व्यक्तिगत माहिती
धर्म हिंदू
नागरिकत्व भारतीय
देश भारत
संगीत कारकीर्द
पेशा नृत्य दिग्दर्शक

सुबल सरकार (अंदाजे १९३५ - १२ नोव्हेंबर, इ.स. २०११; मुंबई, महाराष्ट्र) हे बंगाली नृत्यदिग्दर्शक होते. त्यांनी चार दशकांच्या कारकिर्दीत सुमारे ९५ मराठी, हिंदी, पंजाबी, बंगाली, भोजपुरी, नेपाळी चित्रपटांसाठी नृत्यदिग्दर्शन केले[].

सरकारांचा जन्म बांग्लादेशात झाला. नंतर त्यांचे कुटुंबीय कोलकात्यास हलले. कलाकार म्हणून कारकीर्द घडवायचे स्वप्न उराशी घेऊन सुबल सरकार मुंबईत आले. मुंबईत आल्यावर आरंभी त्यांनी फळविक्रीचा व्यवसाय केला[]. या काळात नृत्यदिग्दर्शक सचिन शंकर यांच्याशी त्यांची ओळख झाली[]. सचिन शंकरांकडून सरकारांनी नृत्यप्रशिक्षण घेतले. ते सचिन शंकरांच्या नृत्यपथकातून काही काळ काम करत होते[]. काही काळाने त्यांनी स्वतःचे नॄत्यपथक स्थापून भारतभर दौरे करण्यास सुरुवात केली. इ.स. १९७५ साली सोयरीक या मराठी चित्रपटाद्वारे त्यांनी नृत्यदिग्दर्शक म्हणून पदार्पण केले[]. त्यांनी नॄत्यदिग्दर्शन केलेले माहेरची साडी, पांडू हवालदार, रामराम गंगाराम हे मराठी चित्रपट खूप गाजले.

१२ नोव्हेंबर, इ.स. २०११ रोजी मुंबई, महाराष्ट्र येथील परळ उपनगरातल्या निवासस्थानी त्यांचा मॄत्यू झाला[].

संदर्भ

  1. ^ "ज्येष्ठ नृत्य दिग्दर्शक सुबल सरकार यांचे निधन". 2016-03-05 रोजी मूळ पान पासून संग्रहित. १३ नोव्हेंबर, इ.स. २०११ रोजी पाहिले. |अ‍ॅक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
  2. ^ a b c d "सुबल सरकार यांचं निधन". 2011-11-13 रोजी मूळ पान पासून संग्रहित. १३ नोव्हेंबर, इ.स. २०११ रोजी पाहिले. |अ‍ॅक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
  3. ^ "कॉरिओग्राफर सुबल सरकार डेड (नृत्यदिग्दर्शक सुबल सरकार मृत)" (इंग्लिश भाषेत). १३ नोव्हेंबर, इ.स. २०११ रोजी पाहिले. |अ‍ॅक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)CS1 maint: unrecognized language (link)