सुप्रिया पाठक
सुप्रिया पाठक (७ जानेवारी, १९६१:मुंबई, महाराष्ट्र - ) ही बॉलिवूड अभिनेत्री आहे. हिने मासूम, सरकार, सरकार राज, वेक अप सिड सह अनेक चित्रपटांत आणि दूरचित्रवाणी मालिकांमधून काम केलेले आहे. पाठकला तीन फिल्मफेर पुरस्कार सह अनेक पुरस्कार मिळाले आहेत.
कौटुंबिक माहिती
पाठक ही अभिनेत्री दीना पाठकची मुलगी आहे. तिने अभिनेता-दिग्दर्शक पंकज कपूरशी लग्न केले. हिची मुलगी सना कपूर आणि बहीण रत्ना पाठक सुद्धा चित्रपटांतून अभिनय करतात.