Jump to content

सुनीता पुरुषोत्तम देशपांडे

सुनीता देशपांडे
जन्म नाव सुनीता पुरुषोत्तम देशपांडे
जन्मजुलै ३, इ.स. १९२५/इ.स. १९२६
रत्नागिरी, महाराष्ट्र, भारत
मृत्यूनोव्हेंबर ७, इ.स. २००९
पुणे, महाराष्ट्र, भारत
राष्ट्रीयत्वभारत भारत
कार्यक्षेत्रसाहित्य
भाषामराठी
प्रसिद्ध साहित्यकृती आहे मनोहर तरी
वडील सदानंद महादेव ठाकूर
आई सरला सदानंद ठाकूर
पती पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे
अपत्ये मानसपुत्र दिनेश ठाकूर

सुनीता देशपांडे (जुलै ३, इ.स. १९२५/इ.स. १९२६; रत्‍नागिरी, महाराष्ट्र - नोव्हेंबर ७, इ.स. २००९; पुणे, महाराष्ट्र), पूर्वाश्रमीचे नाव सुनीता ठाकूर, या मराठी लेखिका व सामाजिक कार्यकर्त्या होत्या. मराठी साहित्यिक पु. ल. देशपांडे त्यांचे पती होते.

पु. ल. देशपांडे आणि सुनीताबाईंचे लग्न जून १२, इ.स. १९४६ रोजी झाले. पु.ल. आणि सुनीताबाई यांनी ओरिएंटल हायस्कुलात शिक्षक म्हणून काम केले होते. त्यांनी पुलंबरोबर अनेक नाटकांत काम केले. तसेच 'वंदेमातरम्' या राम गबाले दिग्दर्शित चित्रपटातील त्यांची भूमिका अतिशय गाजली होती. 'राजमाता जिजाबाई' हा एकपात्री प्रयोगही त्यांनी रंगवला होता. पुलंच्या 'सुदर मी होणार' मधील दीदीराजे ही मध्यवर्ती भूमिका सुनिताबाईंनी साकारली होती.

पुरस्कार

सुनीता देशपांडे यांना जी.ए.कुलकर्णी यांच्या स्मरणार्थ दिला जाणारा पहिला ’प्रिय जीए पुरस्कार’ इ.स. २००८मध्ये मिळाला होता.

प्रकाशित साहित्य

नाव साहित्यप्रकार प्रकाशन प्रकाशन वर्ष (इ.स.)
आहे मनोहर तरीआत्मचरित्रमौज प्रकाशन१९९०
प्रिय जी.ए.पत्रसंग्रहमौज प्रकाशन गृह२००३
मण्यांची माळललितमौज प्रकाशन२००२
मनातलं अवकाशमौज प्रकाशन
समांतर जीवनअनुवादित लेखसन पब्लिकेशन१९९२
सोयरे सकळव्यक्तिचित्रणमौज प्रकाशन१९९८