Jump to content

सुधीर जोशी

सुधीर जोशी
जन्मइ.स. १९४८
मृत्यू १४ डिसेंबर, इ.स. २००५
मुंबई, महाराष्ट्र
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र अभिनय
भाषामराठी

सुधीर जोशी (इ.स. १९४८ - १४ डिसेंबर, इ.स. २००५) हे विनोदी ढंगातील भूमिकांसाठी नावाजले जाणारे मराठी अभिनेते होते. यांनी मराठी चित्रपट, नाटके, तसेच दूरचित्रवाणी मालिकांतून अभिनय केला.

जीवन

सुधीर जोशी यांचा जन्म मुंबईत दादर येथे झाला. मुंबईच्या कीर्ती कॉलेजातून त्यांनी अर्थशास्त्रात बी.ए. पदवी मिळवली. मुंबईतल्या ब्लॅकी अँड सन्स या प्रकाशन संस्थेत विपणन अधिकारी [] होते. कालांतराने नोकरी सोडून जोशी पूर्ण वेळ अभिनय क्षेत्राकडे वळले.

कारकीर्द

चित्रपट-कारकीर्द

वर्ष (इ.स.)चित्रपटभाषाभूमिकाटिप्पणी
इ.स. १९८५अनंतयात्राहिंदीगोडबोले
इ.स. १९८७गंमत जम्मतमराठी
प्रेमासाठी वाट्टेल तेमराठी
इ.स. १९८९भुताचा भाऊमराठी
बाळाचे बाप ब्रह्मचारीमराठी
आत्मविश्वासमराठीडॉ. बाळासाहेब सरपोतदार
इ.स. १९८८अशी ही बनवाबनवीमराठीसरपोतदार
इ.स. १९९१आयत्या घरात घरोबामराठी
इ.स. १९९४वझीरमराठी
इ.स. १९९५लिमिटेड माणुसकीमराठीॲड्व्होकेट भास्करराव
इ.स. २००६मातीच्या चुलीमराठीश्रीपाद दांडेकर

नाट्य-कारकीर्द

वर्ष (इ.स.)चित्रपटभाषाभूमिकाटिप्पणी
टुर टुरमराठी
हसता हसतामराठी

दूरचित्रवाणी-कारकीर्द

वर्ष (इ.स.)कार्यक्रमभाषाभूमिका/सहभागटिप्पणी
कॉमेडी डॉट कॉममराठी

मृत्यू

नोव्हेंबर, इ.स. २००५ मध्ये "हसता हसता" या नाटकाच्या बँकॉक दौऱ्यादरम्यान जोशी यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यांच्यावर बँकॉक येथेच बायपास शस्त्रक्रिया करण्यात आली []. तेथून मुंबईत परतल्यानंतर १४ डिसेंबर, इ.स. २००५ रोजी दुपारी त्यांना पुन्हा हृदयविकाराचा झटका आला. शिवाजी पार्क येथील शुश्रूषा इस्पितळात नेले जात असताना त्यांचे निधन झाले [].

या सुमारास "मातीच्या चुली" या जोशी यांचा अभिनय असलेल्या चित्रपटाचे चित्रीकरण चालू होते. सुधीर जोशी यांच्या निधनानंतर त्या भूमिकेचे उरलेले काम अभिनेते आनंद अभ्यंकर यांनी पुरे केले [].

संदर्भ व नोंदी

  1. ^ विपणन अधिकारी (इंग्लिश: Marketing Executive, मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह).
  2. ^ a b "अभिनेते सुधीर जोशी यांचे निधन". १३ ऑगस्ट २०१४ रोजी मूळ पान पासून संग्रहित. १५ ऑगस्ट, इ.स. २०१३ रोजी पाहिले. |ॲक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
  3. ^ "मराठी मनोरंजन क्षेत्रातील "अक्षय-आनंद' हरपला". 2016-03-05 रोजी मूळ पान पासून संग्रहित. १५ ऑगस्ट, इ.स. २०१३ रोजी पाहिले. |ॲक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)

बाह्य दुवे

  • इंटरनेट मूव्ही डेटाबेस वरील सुधीर जोशी चे पान (इंग्लिश मजकूर)